आदिवासी पाटा (गीत)
रे रे लोया रे रे ला रेला रेला रेला
रे रे लोया रे रे ला रेला रेला रेला...........||धृ||

अव्वल बाबल लोहतो रे
शाळा वेने करियी रे
पेकाल शाळा करयीरे
सायबल तेला आयीरे
रे रे लोया.................||1||

लेवांग कोतांग इतोरे
उपास पोटांग उंजतोरे
हैकोंग मोकोंग क्याहतोरे
शाळा तगा लोहतोरे
रे रे लोया....................||2||

अतेक वातेक वेहतोरे
तिंदा उंडा वावो रे
गुरजीन पोलो केंजाटे
ओरे अवल बाबले
रे रे लोया....................||3||

v रे रे लोया.................रेला रेला रेला.... याला आम्ही धृवपद असे म्हणतो,मात्र याचा उपयोग compulsory नाही आहे.

पाटा(गीत) याचा अर्थ


अर्थ-1:आई बाबा मुलाला शाळेत शाळा शिकून मोठा साहेब
   होण्यासाठी पाठवतात.


अर्थ-2:आई बाबा त्यांचा मुलाला नसलेले पैसे देऊन उपाशी पोटी झोपवतात,नंतर त्याला शाळेत फाटके-फुटके कपळे घालवून शाळेत पाठवतात.

अर्थ-3: आई बाबा येता जाता त्यांचा मुलाला सांगतात की तू सरांचा 
ऐक तेच तुझे आई बाबा आहेत.



                             रोशन.पी.पुंगाटी
                               वर्ग-१० वी

माझा गाव मरमपल्ली
माझा गाव लोक बिरादरी प्रकल्प वरुन ३० कि.मी वर आहे.
माझ्या गावात एकुन १९० घरं आहेत. व मी लोक बिरादरी
प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळेत शिकतो. आणि तिथ
१ ली ते १२ वी पर्यंत आहे.मी माझा गावाला फक्त दोन
ते तीन महिने राहतो.बाकी महिने शाळेत राहतो.
माझ्या बाबा घरी शेती करतो. व आम्हाला पैसे पुरवतो.
आम्ही तीन भाऊ असल्यामुळे एकटाला दिला की एकटाला
राग येतो.म्हणुन सारका देतो.  माझ्या गावात गोंड हा भाषा बोलला
 जातो.आम्हचा समाज गोंड आहे.माझ्या गावात कोणत्याही सण असल्यास
सर्व गावकरी एकात्रीत जमतात.व आप आपल्या बोलतात.गावातला पाठील हा तिथलं मुक्या असतो. तो सांगितल्या प्रमाणे ऐकतात. आणि लोटात
पाणी गेऊन गावतला गोटुलमध्ये येऊन बसतात. सकाळी ६.००
ते ७.०० वाजता आप आपल्या घरी जातात. आणि लोटातला पाणी
सर्वांना देतात. घरातला मोठा माणुस स्वतः बालटीत पाणी आणुन
आंघोळ करतात,व जेवायला बसतात. जेवन झाला की स्वतःचा कामी
लागतात.कुणी शेतात झातो,कुणी नदीत मासे पकडायला जातात.
सायंकाळी ४.३० दरम्यान घरी परत येतात.व हात-पाय धुऊन जेवन
करुन आपल्या विश्रांती घेतात.
अजय मडावी (वर्ग ९ वा)


आदिवासी समाज
                आदिवासी समाज म्हटलं की आपल्याला आठवतं,जंगलात राहणारी दुर्गम भागातील लोक. त्यांचा राहणीमान ,पोशाख व अन्न एकदम शहरी लोकांपेक्षा थोडं वेगळं असतं, पण आता थोडफार विकास झालेलं दिसतं. आदिवासी लोक जास्त प्रमाणात धानाची शेती करतात, पण तेही एकच वेळी जुलै ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर पर्यंत.इतर पिक म्हणून मका ,मिरची, मुंग व इतर भाजीपाला फक्त खान्या पुरता लावतात,पण काहीकाही विकतात सुद्धा.
                                                                               आदिवासी समाजात काही फळ असो वा धान खाण्यापूर्वी सर्वप्रथम पंडूम करतात आणि खातात.पंडूमच्या वेळी मग कोंबळे,बकरे या वस्तू देवाला अर्पन करतात. गावातले सर्व लहान मुलं ते म्हाताऱ्यापर्यंत सर्व पुरूष एकत्र येतात व साजरा करतात. त्यात नोवा पंडूम असोवा जाटा पंडूम. एखादी दिवस सर्व गावकरी एकत्र येतात व शिकारीला जातात.त्यात मिळालेल्या एखादी जंगली प्राण्याचा पर्टी म्हणून सर्व गावकरी आनंदाने खातात व राहतात.
                           इतर सणांच्या वेळी ते वेगनेगळे पदार्थ बनवतात व थोडं थोडं एक दुसऱ्या कुठूंबाला देतात.रात्रीच्या वेळी सर्व गावकरी एकत्र येतात व नाचतात. स्त्रिवर्ग रेला नृत्य करतात तर पुरूषवर्ग ढोलीवर नृत्य करतात. असा संपुर्ण रात्रभर चालतं मग सकाळी आपापल्या कामाले निघुन जातात.कुणी शेतावर जात तर कुणी जंगलात जातात. संध्याकाळी परत गोटूलात(समाज मंदिर) गप्पा मारण्यासाठी जमा होतात.                                                                                                                रोशन.पी.पुंगाटी
                                                    वर्ग९वी  
रोशन.पी.पुंगाटी
    वर्ग९वी

                                                       

पुस्तकातील जग


पुस्तकातील  जग  हे  अनोखे असते.  पुस्तके  वाचण्यात  जितकी  आनंद  मिळते  तेवढं  बघण्यात  मिळत  नाही.  पुस्तक  वाचतांना  तिथे  दिलेली  दृश्य  आपल्या  मनात  त्याची  आपण  कल्पना  करतो  जर  तेच  दृश्य  डोळ्यांसमोर  दिसलं  तर   त्यात  काय  मजा? 

माझा गावातील जातीभेद


नियाम आहे की, पक्त शिकालेले मुला ठरवातात की,  गावात काय नियाम असयाल पाहिजे आणि काय नाही तेचा ठरवात असतात. त्यांचा जर नाही ऐक्याला तर पैसे मागतात. शिकालेले मुला अस भेदभाव करतात असतात. मुलींना त्याचा पंसदचे कापडे घालयाला नाही देतात. माझा गावाचा नाव मन्नेराजाराम आहे. माझा गावातले काही लोक शेती करतात. व काही लोक दुसरा व्यवसाय करतात. माझा गावात गोंडी, तेलगु, महार, हलबी, बांगली इत्यादी भाषा बोलणारे लोक राहतात. मी त्यांच्या बद्दल व गावातले वेगवेगळी भाषा बोलणारे लोकं कसा जातीभेद करतात. त्यांच्या बद्दल मी थोडक्यात लिहाली आहे.
 गोंडी मुलं जेव्हा ढोल वाजविणाऱ्या मुलींना घरात आणतात. तेव्हा मुलांचे आई-वडील तिच्यांशी चांगला वागतात. आणि आजूबाजूचे लोक पण तीच्याशी चांगला वागतात. ती बनवलेली पदार्थ आजूबाजूचे लोक खातात पण जेव्हा काही कार्यक्रम वैगरे असतात. तेव्हा ती जर घरातले काम करते व भात, भाजी बनवते. तेव्हा ती बनवलेले भात, भाजी, गोड पदार्थ, हात लावलेले पाणी सुद्धा ते लोक पीत नाहीत, भात खात नाहीत व घरात बसत नाही. ते पक्ता दुरूनंच बघता असतात. मुलाचे व मुलीचे मिटींग ठेवतात तेव्हा मुलाचे आई-वडीलना संगतात कि या दोघांना घरात ठेवयचा नाही. त्यांनी दुसरा घर बांधून रहायचा आणि दुसऱ्या गावातल्या  लोकांना बोलावून त्यांना जेवण द्या असे सांगतात. त्या मुलांचे आई-वडील काही म्हटलं तर गावातले लोक त्यांना त्यांचे कुठल्याच कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही असं संगितलं जातं. ते कुटुंब काहीच करू शकत नाहीत. जे गावातले लोक सांगतात ते त्यांना ऐकावे लागते. ख्रिश्चन मध्ये काही लोक जातात. म्हणून गावातले काही लोक त्यांच्याशी बोलत व काही बोलत नाहीत. त्यांना कोणीच मदतील जात नाहीत. गावात जर कोणी मारण पावला तर जे लोक ख्रिश्चन मध्ये जातात त्यांनी जर त्या कार्यक्रमात मदत केला तर गावतले लोक त्यांना म्हणतात की तुमच्या मुळे हा मारण  पावला आहे. तुम्हीच काहीतरी केले असं म्हणतात. ते लोक पण माणस आहे, ते लोकांना माहित असून तरी अस का करतात. ते ख्रिश्चन मध्ये जातात म्हणून का?. भामरागडतालुक्यात काही गावामध्ये ख्रिश्चनत जाणारे लोकचा पण हेच परिस्थीती आहे. त्या लोकांना कसा वाटत असेल ? गावातले लोक आधी त्यांच्याशी चांगले वागत होते त्यांना - त्यांना मदत करत होते. पण आता त्यानी दुसरा धर्म स्विकारला म्हणून तेच लोक त्यांचाशी चांगला वागत नाहीत. असं का करतात. अखेर ते पण माणसेच आहेत.   
              हलबी लोकंचा लग्न तीन किंवा चार दिवस आसतो. एखाद्या मुलीगी जर घरातुन पाळून गेली तर तिला मरतात, तिच्या संबघ थोडतात, तीला घरात येऊ देता नाही. लग्न झाल्येला मुली पक्त साडी लावयाच. दुसरे कापडे घालयाच नाही. घातल्या तर गावतल्ये लोक 100 किंवा 1500 अस पैसे मागतात. माझा गावात असं
             


वर्ग  10 वी.

व्यवसाय व शेतीचे उद्योग


           व्यावसाय व शेतीचे उपयोग
 शेती हा जगातील खुप महत्त्वाची घटक आहे.शेती आपण स्वतःसाठी व दुसऱ्यांसाठी करतो.शेती विषयी सर्व लोकांना माहित आहे.शेती सर्वांनी करतात. प्रत्येक गावात,शहरात वदेशांत शेतीचे व्यावसाय केली जाते.व्यावसायाचे  वेगवेगळया प्रकार आहेत.कापूसे जे आपण शरीर झाकण्यासाठी वापरतो.कपडे,थंडीचे स्वेटर.गहू पिठ पोळी व चपाती या प्रकारचे.
उसमधून  साखर  बनवतात आणी धानपासून भात बनवतात.आपल्या महाराष्ट्र राज्यात माझा मनाने तर धान्याची व्यावसाय खुप प्रमाणात केली जाते.पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चारही दिशांमध्ये शेतीचा व्यावसाय केली जाते.शेतीमुळेच माणूस जगत असतो.आणी शेती न केल्यास ते जीवण जगू सकत नाही. म्हणून शेती व्यावसाय सर्वांनी करतो.धान पिकवण्यासाठी पावसाची वाट पाहत राहतात.पाउस पळला कि नांगरनी करण्याची सुरूवात करतात. नांगरनी करायची संपली की खत ठाकतात त्या नंतर धन पेरतात.धान परून झल की दोन-तीन महिनानंतर कापनी सुरू करतात.धान कापण्याचीसंपली की चूरणी सुरू होते.शेती करून संपल की धान विकण्यासाठी नेतात.
आपल्याकडे भाज्यांची व्यावसाय ही करतात.त्यांची किंमत उन्हाळ्यात खुप प्रमाणात वाळतो.आणी पावसाळ्यात कमी होतो.त्याचे कारण आहे पावसाळ्यात जास्त प्रमाणात व उन्हाळात खमी प्रमाणात केली जाते.त्यामुळे फळ भाज्यांची भाव कमी जास्त होत राहतो.म्हणून विक्री जास्त प्रमाणात होतो.

                                                                                               - नाव.शिवाजी पुंगाटी
                                                                                 लो.बि.आ.शा.हेमलकसा      वर्ग १० वा