लोक बिरादरीत येणारे पाहुणे

लोक बिरादरी प्रकल्पाला भेट देण्यासाठी दररोज अनेक पाहुणे येतात. पाहुणे बिरादरीत येतात, प्रकाश भाऊंना भेटतात.  त्यांचे अनुभव जाणून घेतात.  ' इथले आदिवासी लोक कसे राहतात ' याची माहिती घेतात, शाळेतील मुले कसे राहतात, कसे शिकतात, काही पाहुणे शहरात प्रत्यक्षात न पाहिलेले प्राणी इथल्या अनाथालयात जवळून पाहतात,प्राण्यांची माहिती घेतात. बाहेरुन आलेले पाहुणे आमच्याशी संवाद साधतात. आमच्या अडचणी विचारतात, काहीवेळेला त्या अडचणी पूर्ण करतात. इथले आदिवासी समोर जायला पाहिजे, इथल्या लोकांची विकास झाला पाहिजे म्हणून येणारे पाहुणे या प्रकल्पाला पैसे किंवा बाकीच्या गोष्टी दान करतात. इथल्या लोकांसाठी मदत पुरवत असतात. या सगळ्या गोष्टींचा आम्हाला खूप खूप आनंद होतो. 

बिरादरीत येणारे पाहुणे तेवढा दुरून येतात. काही वेळेला आमच्यासाठी कार्यक्रम घेतात. आम्हाला मार्गदर्शन करुन जातात. काही नवीन गोष्टी आम्हाला शिकवून जातात. आमच्याशी इतकं प्रेमाने वागतात. ते विचारतात की, तुम्हाला शिकण्यासाठी कोणत्या अडचणी येतात? आमच्या अडचणी सांगितल्या की, पाहुणे आम्हाला पुरवतात. आणि ते सांगतात खूप अभ्यास करा, चांगले शिका, खूप खूप मोठे व्हा. चांगली नोकरी करा. ते सांगताना आम्हाला असं वाटतं की, बाहेरून येऊन इतके छान आम्हाला सांगतात. आम्ही काही तरी करायला पाहिजे. आम्हाला इतक्या गोष्टी पुरवतात. काही अडचण असेल तर आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला पुरवतो. यामुळे आमचा आत्मविश्वास वाढतो.

 

बिरादरीत येऊन इथली सगळी माहिती जाणुन घेऊन बिरादरीत येणारे पाहुणे पण प्रेरणा घेऊन जातात.

               " बिरादरीत येणाऱ्या पाहुण्यांना आमचा रामराम! "

- सिताराम राणा, वर्ग १०
 (मु. मन्ने राजाराम, जि. गडचिरोली)

 

No comments:

Post a Comment