मला असे वाटते...




आज आपण भारत देश नक्कीच प्रगतीच्या मर्गांवर आहेत.आजही आपल्या पुढे अनेक समस्या आहे अशा परिस्थिती आपण प्रगती करु शकतो का मला तर नाही वाटतं या समस्या वाव्यासारखे प्रगतीमागे धावणाव्या भारत हा पर्वत सारख्या उभ्या आहेत ज्यामळे भारत मध्येच कुठेतरी कमी पडत आहे या देशाला विकास करायचा असेल तर या सगळ्या समस्या मिटविण्यासाठी सुरुवातील,घर,घरांपासुन,गाव गावापसुन शहर आणि शहरापासुन देश हे सगळ्या जागृती आपल्याच कर्तव्य आहे असे मला वाटते ही सगळ्या शिक्षणामुळे जागृती होईल व आपण जर विचाराची दिशा योग्य ठेवली तर कहीच अवघड नाही म्हणजे नवयुवकांसाठी सर्वात मोठी गोष्टी म्हणजे त्याच सकारात्मक दुष्टीकोन आसणारी माणसे आपल्यापुढे आत्माविश्वास, चिकाटी,हे गुण दिसुन येतात ज्याप्रमाणे आपल्या शरीराला रोज चांगल आहाराची गरजा असते तशी आपल्या मनालाही दररोज उत्तम विचाराची आवश्याकता असते जसे शरीराला खराब झालेला अन्न तसे मनालाही घाणेरडे विचार येतात रोग असलेला माणुस मन याशिवाय आपण काही करु शकता नाही    

शेवटी एवढाच सांगतो की ज्या जगात मी आलो ते जग मृत्युपूर्वी मी सुंदर करुन जाईन अशी माझी जिद्दी आहे केवळ विर्थ्यांबददच नव्हे तर आपल्या सर्व समाजाबदद्ल माझी ही तक्रार आहे की आपण जीवनकडे पाहतच नाही तुम्ही काय आहात हे तुम्हाला नवलाच वाटले परंतु तुम्ही काय बनू शकता याचा तुम्हाला पत्ताच नाही तरुण संतृष्ट असु असंतृष्ट सारखे आहे काय हा देश आहे या तरुणांनी जीवनाची आव्हन स्वीकरायची आहे तरुणा माणासांनी उठा आणि जागे व्हा असे मला वाटते तेव्हाच आपला देश उज्ज्वल भावितव्य होइल व तेव्हाच समोर जाईल तेव्हाच आपले देशाचे नाव कामवले आपण रोज योग रीतीने काम करतो ते पण तसेच देशाला योग दिशेने आकार मिळले तुम्ही या जगाचा अनुभव घ्या कारण अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे जीवनात आपल्या यश आणि अपयश या दोन गोष्टीच्या महत्त्व आहे जगतांना प्रकाशाचे महत्त्व कळवण्यासाठी म्हणजे तो जवळ असताना त्याचे मोल संपणार नाही व पुर्वीसारखे जग नाही आत सुधारलेली पुर्वी कसा होता मुलगी लहान असतानाच विवाह करुन द्यायचे आत २०-२५ वर्ष होईपर्यंत कोणीही लग्न करत नाही कारण शिकलेले असतात      

दिलीप गावडे वर्ग(१०)वी

गाव-इरपणार

 

विद्यार्थ्यांच्या जीवणात शिक्षणाच्या योगदान

मी एका आदिवासीच्या भागात राहणा-या आईचा पोटातून जन्म घेतला. माझे आई-वडीलांनी जन्म दिल्यापासून ते आजपर्यंत चांगले गुण आत्मसात करायला लावुन मला चांगले वळण दिले, आणि शिक्षणाची ओढ लावली शिक्षणाच्या दिशेने पुढे पाय ठेवायला सांगितली, त्यामुळे आज मला माझ्या मनाला बुद्घीला आंनद होत आहे माझे आई-वडीलांवर मी खुश आहे.

त्याना खुश नजरेने पाहण्यासाठी माझ्या  डोळ्याची, मनाची भावना बदलतात, आणि मला त्याना खुश नजरेने पाहण्यास पुढे ढकलतात. इयत्ता पहिली पासुन माझे आई-वडीलांनी शाळेत दाखल केली आज मी अनेक शिक्षकांचा हाता खालुन जात आहो.

प्रत्येक माणसाच्या प्रथम शिक्षक आपल्या शिक्षणाच्या शेवटच्या टप्पा पर्यंत आपल्या मनावर आपला भावनांवर नजर ठेवत असलेत आपल्यामध्ये चांगले गुण आत्मसात करून घेवण्याची काळजी घेत असतो.

मी इयत्ता पहिली पासुन शिकत येऊन नववीत पोहोचलो.या शिकत्या वयात अनेक शिक्षक संबंधात येतात,जेव्हा पासून मी शाळेत शिकत आहे. तेव्हा पासून माझे आई-वडिलांपेक्षाही अधिक शिक्षकांचे गोष्टी आवडू लागले. आपण शिक्षकांचा हातातून जात असताना, विद्यार्थ्याना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या गुण, भावना, कल्पना, विचार अनेक विद्यार्थी आत्मासात करतात, आणि विद्यार्थ्यांमध्ये हे सर्वांचे संस्कार घडून त्याला वागण्याची नवीन गती प्राप्त होते. आणि तो त्या संस्कारानुसार समाजात वावरू लागतो.

शिक्षक हे समाजाचे शिल्पकार आहेत, त्यांच्यामुळे समाजातील एक मुलगी जरी शिक्षण घेतली तरी पूर्ण समाज बदलू शकतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षक हा स्व:ताच्या सर्व कल्पना, विचार, भावना विद्यार्थ्यासाठी त्याग करतात शिक्षक हे विद्यार्थ्यांना विविध पद्धतीत शिकवत असतात. त्याच्या परिणाम विद्यार्थावर कसे होतात? हे जाणवायला आपल्याला काही काळ वाट बघावं लागतो म्हजेच आपण जेव्हा त्याच्या सारखा शिकवायला जातो, तेव्हा आपल्याला त्याचे परिणाम आपल्या झालेले दिसतात.

विद्यार्थी शिक्षकाच्या सेवकात जितका राहतील तिथकाच चांगला. विद्यार्थ्यांना एकमेंकाशी कसे बोलावे कसे राहावे हे समजते. विद्यार्थी हे आपल्या कौंटुबीक नातेवाईक पेक्षा ही जास्त नवीन शिक्षकांशी संबध जुडवायला पाहिजे.

 धन्यवाद!

शोध हा पुस्तकातील प्रसंग



माझे शिक्षक सांगतात कि मुलांना सिनेमा पेक्षा नाटक पेक्षा कविता आवडतात आणि पुस्तक सुध्दा पण मी कधीच  एखादी गोष्टी पूर्ण पुस्तकभर एकच गोष्टी
असलेले पुस्तक किंवा कांदबंरी वाचली नाही म्हणून मला आवडत नव्हते पण शोध हा कांदबरी वाचली त्यानंतर मला वाटल  सिनेमात जे असते ते पुस्तकात तर असताच पण काही गोष्टी पुस्तकात असलेले सिनेमात नसते मला हे काही पुस्तके वाचल्यावर कळलं पण जेव्हा मी अनुभवली तेव्हा मात्र मला उत्साह वाटल.
शोध हा पुस्तक आम्ही दोन आठवडा वाचत होतो ते पुस्तक इ.स १९६०साली  काळातली आहे.त्याचात एक रह्स लपून होता ते खजि
ना शोधून काढण्यासाठी पहिला गट केतकी देशपांडे, सोनत निनार कुलकर्णी. दुसरा गट आबाजी राकेश जंयत राज विकी हे खजिना शोधुन काढणारे होते. मला पहिल्यादा खुप कंटाळा येत होता  एक-एक वेळा असं वाटत होत कि इथून मी केव्हा  ऊठून जाईन मग नंतर मला एक- एक खुप मजा वाटु लागली केव्हा छान वाला भाग येत होता तेव्हा सर जेवन करायला जात होते.
मला असं वाटत होत कि सरांना थबावुन गोष्टी सागायला लावु आणि राग पण येत होता मग सर आलं कि मेसमध्ये काय झालं ते सागत होते जास्त हसायचा सांगत होते आणि एक-एक वेळा मस्त COMEDY सागतं आम्ही खुप हसत होतो थोडा वेळ असचं जात होता.
मग सर वाचायला सुरुवात करत होते सर गोष्ट वाचतांना मध्ये फोन येत होता सर एक-एक वेळा फोन ऊचलतचं नव्हते आम्ही गोष्ट एयकत होतो. आम्हाला एक दीवस सरांनी खुप गंबिर गोष्ट सरांनी आम्हाला सागितले कि तुम्ही केव्हा ब्लाग लिहाल तेव्हास मी गोष्टी पूर्ण करेन असं म्हणाले दोन तीन मुली हो म्हणाले मग दुसरा दिवसी काही मुली लिहुन आणले मी मात्र लिहून नाही आणली  मला ब्लाग कसा लिहायच तेच कळत नाही ब्लाग कसा लिहायचा आणि मी माझ्या friend ला विचारली तर तीने सांगितले .
कि Blog कोणत्याही गोष्टी वर लिहायचा गोष्टी मध्ये काय वाटलं गोष्टी कसा बद्दल आहे गोष्टीत काय आहे हे महत्व असते मला गोष्टी खुप आवडला आणि खुप काही शिकायला मिळाला त्याच्यात आंनद वाटत होता.
आणि एक एक वेळा दुःख वाटत होता व गंबिर पण वाटत होता.पण त्यादीवसी मग गोष्ट संपली.म्हणून मला आज खुप दुःख झाला कारण कि गोष्ट पूर्ण झाला नाही ते गोष्टीच्या दूसरा भाग लेखकांनी लिहीलेला नाही म्हणून मला दुःख झाला दुसरा भाग जर निघाला तर मी नक्कीच वाचीन .



धन्यवाद .


              
Thank you .कोमल आत्राम रा. येंकापल्ली

भामरागड मधील लोकांचे अवस्था


 

भामरागड तालुक्यात खूप खेडे गाव आहेत. पण खूप दूर दूर आहेत आणि त्याचा गावत चांगला शाळा नाही. ते लोक शिकलेले नाही शिक्षणाचा महत्तव कळत नाही. ते लोक अंधश्रद्धा वर विश्वास ठेवतात. भामरागड मध्ये खूप अंधश्रद्धा माणतात. भामरागड तालुक्यात जास्त शिकलेले नाही. कोणी पहिले पासून शिकलेच नाही.त्याना आयुष्यभर किती त्रास होणार आणि जे लोक शिकलेले नाही. त्यांना आता पसवतात किंवा लूठमार करतात. न शिकलेल्या माणसाना बरोबर हिशोब करता येत नाही. त्यांना कोणीच मदत करत नाही. त्यांचा जीवनात काय अडचीणी आहेत हे आपल्याला माहित नाही. लोकांवर किती अन्याय होत आहे आणि त्यांवर कोणीच आवज उठवत नाही. आता लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरली आहे. भामरागड मध्ये आता कोणकोणत्या गावात वीज नाही आणि चांगली रस्ते नाही. ते पायदल चालतात आणि लोकांध्ये भिती निर्माण होतो.

ते मग काही करु शकत नाही. अशा होऊ नये म्हणून तरुणांनी आवाज उठवला पहिजे. त्यांना मदत केली पाहिजे. त्यांना पण जगण्याचा स्वतंत्र आहे आणि त्यांना पण जगण्याचा हक्क आहे. हक्क मिळवण्याचा त्यांना आधिकार आहे. भामरागडवर राणाऱ्याना वाटत असेल की भामरागड सुधारला पाहिजे. सर्व लोक चांगले पाहिजे अशा प्रत्येकाला वाटते आहे. भामरागड मध्ये दारूबंदी खूप प्रमाण वाठले आहे. ते बंद करायला पाहिजे हे सगळे करायला तरुणांनी प्रयत्न केली पाहिजे.

नाव-रंजना पूंगाटी (वर्ग ९ वा)

गाव-हितापाळी.

 

निसर्ग आणि उत्क्रांती

निसर्ग ही कोणी माणूस निर्मान करू शकत नाही, अशी नाही. जर निसर्ग तुम्हाला आवडत असेल तर ते तुमच्या घराभोवती बनवू शकता, ते कसे बनवायचे हे मात्र तुमच्यावरच आहे.

निसर्ग कोणाला आवडत नाही, ती सगळ्यांना आवडते. निसर्ग म्हणजे आपल्या डोळ्यापुढे येते... मोठे मैदान, हिरवगार गवत, वृक्षावर राहणारी चिमुकले पक्षी, रोपटे, झाडी­­‑झुडपे आणि त्या झुडपातून येणारी प्रकाशाचे किरण, वेली, सुगंधी फुल, रसरसीत फळे, भिन्न आकाराचे पाने, खळखळ वाहणारे नदी, मोठमोठे डोंगरातून पडणारी उंच झरे, व त्या झऱ्याखाली जायची इच्छा निर्मान होते, या सगळ्यामुळे आपली मन शांत होते. पक्ष्यांचे गाण्याची सुर ऐकायला मिळते, तसेच भिती वाटणाऱ्या प्राण्यांचाही डरकाळी ऐकायला मिळते.

कधाचीत नंतर निसर्ग म्हणजे फक्त मनात, कारखान्यातील घाणेरडा पाणी मिसळलेली नदी, काळी हवा, धुरीने झाकलेली झाडाची पाने गाड्याची आवाज अशी चित्र निर्माण होईल, हे आपला भविष्याच निसर्ग असणार जर आपण निर्सगाची निट काळजी घेतली नाही तर.

पुथ्वी ही एकच, सजीव असणारी ग्रह आहे किंवा नाही कारण आपण अन्न खातो, आणि अन्न वनस्पती सूर्याचा वापराने तयार करतात, तर जर दुसरी ग्रहात वनस्पती नसेल तर तिथे असलेले प्राणी डायरेक्ट सूर्याचा उष्णता वापरुन स्व:ताचा शरीरातच अन्न तयार करु शकले असते, तर अंतराळात कुठेतरी जीव असेलच. जरी ती अजुनही आपल्याला भेटला नाही. जर असेल तर ते प्राणी कसे असेल.

आपण विकसित होण्यापूर्वी पाण्यात होतो. हळूहळू किणारावर आलो आणि वनस्पतीचे मुळ जमिनीखाली गेले व प्राण्यावर अनेक बदल घडू लागला.

आपली पुथ्वीचा कधाचीत या विज्ञान तंत्रज्ञानमुळे किंवा मानवाने केलेली प्रदूषणामुळे पुन्हा प्रचंड स्फोट होतील व पुन्हा शांत होतील, तेव्हा आपण जर माकडापासून बनलेले आहोत तर त्यावेळी पुन्हा पहिल्यापासून जीव तयार होतील व ते कधाचीत मांजरापासूनही बनलेले असेल किंवा आणखी वेगळी प्राणीपासुन आणि त्यापैकी कोणती प्राणी जास्त बुद्धीची असेल तीची बाकीच्या प्राण्यावर राज असेलच कारण आज मानव सुद्धा तेच करत आहेत.

माकडाला पाच बोटे होते म्हणून मानवाला सुद्धा पाचच बोटे आहेत. प्रचंड स्फोट नंतर पुन्हा तयार होणारी पुथ्वीत राहणारी प्राणी कधाचित तीन किंवा सात बोटांचे असणार आणि डोळे सुद्धा निळी, पिवळी असतील व तिन किंवा एकच असू शकते, हाताची सुद्धा प्रकार काही असेच असणार, पाय वाकडी-तिकडी, एकच किंवा चार असणार. कान एकच मोठी असणार आणि नाक तिन असू शकतात. त्याचे आकार लहान-मोठी असु शकतात.

- भाग्या मडावी (जिंजगाव)
- वर्ग ९ वा    

झाडे तोडू नेये म्हणून उपाय...



जर आपण लाकडाने भात वैगारे शिजवलं नाहीतर कशाने शिजवायचा आपल्या जवळ तर गॅस, सौरऊर्जा, पवनऊर्जा, इत्यादी नाही आहते. पण  लाकूड न जाळतं एक दिवस उपाशी भात न मांडता राहू शकतो. पण एक आटवडा राहू शकत नाही. तरी पण आपण प्रयत्न केलं तर ते शक्य आहे .त्यासाठी आपल्याला सरकारकडून किंवा स्वतःच्या पैसातून गॅस विकून घेणं मत्त्वाचे आहे. आज जवळ- जवळ सर्व जंगल नष्ट होत चालले आहे. आपण एक उपाय करू शकतो. ते म्हणजे आपण स्वतःच्या बागेत आपले गरजा भागावणारे झाडांना सोडून दुसरे झाड  लावायला पाहिजे. आपण जास्तीत जास्त त्याची देखभाल करायला हवी. आपण उपाय सूचवतो पण करत तर काहीच नाही. आपल्याला ते करायला पाहिजे सिदध करून दाखवयाला पाहिजे आणि सरकारला अशी सांगायला हवी, की जे झाड वाढून गेलेला त्यांच झाडाला तोडन्यात यावी अन्यया दुसरे झांड तोडू नये. आपण सांगायला हवे किंवा जे लोक हिरवेगार झाडांना तोडतात त्याच्यावर दंड घेण्यात येईल असे आयोजन करण्यात यावी .

पाहिआपल्या भारत देशातील कोणीही लोक झाड लावतात. पण ते माणसाला उपयोग असा झाड लावतात . कोणीही लोक असा विचार करत नाही. पक्षीसाठी झाड लावला पाहिजे. असा कोणीही विचार करत नाही. असा मला वाटते आहे पण पक्षीसाठी झाड लावला पाहिजे  असा मला वाटते . जर झाड लावते पण कोण्यसाठी लावते याच्या विचार करते नाही माणसासाठी उपयोग आहे . पण पक्षीसाठी ही उपयोग आहे जर पक्षी नसेल. तर आपल्या देशात पाऊस पडणार नाही. जर माणूस झोपडी किंवा इमारती बांधने राहतात. तसेच आपण जर पक्षीसाठी झाड लावला. तर किती चांगला वाटले. जर आपल्या घर कोणीही तोडांल तर आपल्याला चांगला वाटणार नाही.तसेच पक्षीन वाटते असेल. पण निजीव आहेत. म्हणून काहीच वाटत नाही. कोणीही लोक झाड लावतात. पक्षीसाठी किंवा प्राणीसाठी नाही लावते.लावला जे.          


शाळा चित्रपट

मिलिंद बोकील हा लेखक लहानपणी ज्या शाळेत शिकत होता. त्या शाळेच्या जुनी आठवणी म्हणून एक “शाळा” नावाच्या कादंबरी लिहिली. त्या पुस्तकातून मला आवडणारे आणि मला अनुभावणारे गोष्टी त्या शाळा नावाच्या मराठी चित्रपटात दाखवले आहेत. ते चित्रपट मी नववी वर्गात असताना बघितलं. त्या चिपटात पण नववी वर्गातले मुलं मुलींच्या गोष्टी दाखविले आहे. त्या चित्रपटात जसा चौघे मित्र आहेत. तसा आपले पण मित्र असतात. कोणी हुशार तर कोणी अगदी हुशार नसणारा पण असतात. पण ते एकमेकांना समजुन वागणारे असतात आणि मदत करणारे असतात. म्हणून आपले मित्र आपल्या सारखे वाटतात. आपण त्यांचा सोबत चांगला राहतो. एखादा वेळी आपला मित्र सोडून गेला किंवा मित्र नावाच्या नाता तुटला की आपल्याला खुप दुःख होतो आणि सतत त्याच्याच आठवण येतो. हे मला अनुभावलेला मित्र संबंधाच्या गोष्टी या चित्रपटात मला पहायला मिळाले.

जसा माध्यामिक वर्गांचे मुलं मुलींवर घडणारे गोष्टी म्हणजे मुलांना मुलींच्या प्रेम विषयी आकर्षण वाटतो म्हणून ते वेळ मिळेल तेव्हा तिच्याकडे बघत असतात. व तिला बोलण्याचे प्रयत्नही करत असतात. हे असाच सारखा दृष्या त्या चित्रपटात बघतांना मला कळलं की एका शाळेत किंवा एका कॉलेजात हे प्रेम सबंध नसतो. तर ते त्यांचा वय असल्यामुळे प्रत्येक शाळेत किंवा कॉलेजात प्रेम सबंध असतो हे कळले. व माझा चेहरात आनंद पसरला. त्या चित्रपटातला नववीवर्ग आणि आपल्या नववी वर्गातला सबंध म्हणजे त्यांचा जेव्ह ऑफ प्रेड असतो तेव्हा त्यांना वाटतो की हा प्रेड आता आपल्या इच्छानुसार गेला पाहिजे. पण त्यांना दुसराच विषय शिकवतात.तसेच कधी कधी माझा पण वर्गाचा असाच पोपट होतो. जसे ते सिनेमाचे नावे ओळखण्याचे खेळ खेळतात तसेच आम्ही इंग्लिश शब्द ओळखण्याचे खेळ खेळत होतो. हे मला अनुभवलेला दृष्य बघतांना मला एकदम  आनंद झालं.

या चित्रपटातुन मला असे कळले की मुलींच्या प्रेमात पडले तर आपला मनात किती भाव भावना बदलतात. पण विद्यार्थ्यांनी स्वताःच्या विशिष्ट वयात बघितलेले सिनेमातले हिरो-हिरोहिनचे प्रेम विद्यार्थ्यांच्या मनात ते खोलवर रूजलेली असते.त्यामुळे त्याच हिरो-हिरोहिनचे अनुकरण विद्यार्थ्यी किंवा सामन्य लोकं सुद्धा करतात,आणि त्यांनाही एकादा मुलीवर प्रेम किंवा आकर्षण वाटतो आणि त्या मुलगीच्या जवळ जाण्याच्या प्रयन्त करतात व त्यांच्या प्रेम जुळतो. पण त्या  विशिष्ट वयात प्रेम म्हणजे काय असतं, हेच त्या विद्यार्थांना कळलेला नसतो. विद्यार्थी मुलींच्या प्रेमात पडतात, पण काहीकाळानंतर त्यांच्या मनातून प्रेमाच्या रस निघून जातो.काही काळानंतरच त्यांच्या प्रेम तुटतो किंवा काही घडतो. पण मला हे सर्व मान्य आहे, या विशिष्ट वयात प्रत्येकालाच आकर्षण किंवा प्रेम वाटतो.परंतु मला असा वाटतो की प्रेम ही अतिशय नाजूक भावना असतो. त्यामुळे प्रेम ही भावना एखदा आपल्या मनात खोलवर रूजली की ती आपल्या मनातुन काढणे अशक्य वाटते. दु:खही वाटतो.प्रेम एखदा तुटली की ती जोडता येते, पण जोडलेली प्रेम आधिच्या प्रेमासारख नसतो. त्यामुळे प्रेम ही काळजीपुर्वक करायला हवी.
           

दिनेश हबका (कारमपल्ली)
वर्ग 9 वा