निसर्ग ही कोणी माणूस निर्मान करू शकत नाही, अशी नाही. जर निसर्ग तुम्हाला आवडत असेल तर ते तुमच्या घराभोवती बनवू शकता, ते कसे बनवायचे हे मात्र तुमच्यावरच आहे.
निसर्ग कोणाला आवडत नाही, ती सगळ्यांना आवडते. निसर्ग म्हणजे आपल्या डोळ्यापुढे येते... मोठे मैदान, हिरवगार गवत, वृक्षावर राहणारी चिमुकले पक्षी, रोपटे, झाडी‑झुडपे आणि त्या झुडपातून येणारी प्रकाशाचे किरण, वेली, सुगंधी फुल, रसरसीत फळे, भिन्न आकाराचे पाने, खळखळ वाहणारे नदी, मोठमोठे डोंगरातून पडणारी उंच झरे, व त्या झऱ्याखाली जायची इच्छा निर्मान होते, या सगळ्यामुळे आपली मन शांत होते. पक्ष्यांचे गाण्याची सुर ऐकायला मिळते, तसेच भिती वाटणाऱ्या प्राण्यांचाही डरकाळी ऐकायला मिळते.
कधाचीत नंतर निसर्ग म्हणजे फक्त मनात, कारखान्यातील घाणेरडा पाणी मिसळलेली नदी, काळी हवा, धुरीने झाकलेली झाडाची पाने गाड्याची आवाज अशी चित्र निर्माण होईल, हे आपला भविष्याच निसर्ग असणार जर आपण निर्सगाची निट काळजी घेतली नाही तर.
पुथ्वी ही एकच, सजीव असणारी ग्रह आहे किंवा नाही कारण आपण अन्न खातो, आणि अन्न वनस्पती सूर्याचा वापराने तयार करतात, तर जर दुसरी ग्रहात वनस्पती नसेल तर तिथे असलेले प्राणी डायरेक्ट सूर्याचा उष्णता वापरुन स्व:ताचा शरीरातच अन्न तयार करु शकले असते, तर अंतराळात कुठेतरी जीव असेलच. जरी ती अजुनही आपल्याला भेटला नाही. जर असेल तर ते प्राणी कसे असेल.
आपण विकसित होण्यापूर्वी पाण्यात होतो. हळूहळू किणारावर आलो आणि वनस्पतीचे मुळ जमिनीखाली गेले व प्राण्यावर अनेक बदल घडू लागला.
आपली पुथ्वीचा कधाचीत या विज्ञान तंत्रज्ञानमुळे किंवा मानवाने केलेली प्रदूषणामुळे पुन्हा प्रचंड स्फोट होतील व पुन्हा शांत होतील, तेव्हा आपण जर माकडापासून बनलेले आहोत तर त्यावेळी पुन्हा पहिल्यापासून जीव तयार होतील व ते कधाचीत मांजरापासूनही बनलेले असेल किंवा आणखी वेगळी प्राणीपासुन आणि त्यापैकी कोणती प्राणी जास्त बुद्धीची असेल तीची बाकीच्या प्राण्यावर राज असेलच कारण आज मानव सुद्धा तेच करत आहेत.
माकडाला पाच बोटे होते म्हणून मानवाला सुद्धा पाचच बोटे आहेत. प्रचंड स्फोट नंतर पुन्हा तयार होणारी पुथ्वीत राहणारी प्राणी कधाचित तीन किंवा सात बोटांचे असणार आणि डोळे सुद्धा निळी, पिवळी असतील व तिन किंवा एकच असू शकते, हाताची सुद्धा प्रकार काही असेच असणार, पाय वाकडी-तिकडी, एकच किंवा चार असणार. कान एकच मोठी असणार आणि नाक तिन असू शकतात. त्याचे आकार लहान-मोठी असु शकतात.
- भाग्या मडावी (जिंजगाव)
- वर्ग ९ वा
बीभाग्या.. तुला निसर्ग खूप आवडतो न? खरेच निसर्गा पासून खूप शिकण्यासारखे आहे.
ReplyDeleteआणखी अभ्यास कर. आणखी लिही.