पुस्तकातील
जग हे अनोखे असते.
पुस्तके वाचण्यात जितकी
आनंद मिळते तेवढं
बघण्यात मिळत नाही.
पुस्तक वाचतांना तिथे दिलेली दृश्य
आपल्या मनात त्याची
आपण कल्पना करतो
जर तेच दृश्य
डोळ्यांसमोर दिसलं तर
त्यात काय मजा?
माझा गावातील जातीभेद
नियाम आहे की, पक्त
शिकालेले मुला ठरवातात की, गावात काय
नियाम असयाल पाहिजे आणि काय नाही तेचा ठरवात असतात. त्यांचा जर नाही ऐक्याला तर
पैसे मागतात. शिकालेले मुला अस भेदभाव करतात असतात. मुलींना त्याचा पंसदचे कापडे
घालयाला नाही देतात. माझा गावाचा नाव मन्नेराजाराम आहे. माझा गावातले काही लोक शेती
करतात. व काही लोक दुसरा व्यवसाय करतात. माझा गावात गोंडी, तेलगु, महार, हलबी,
बांगली इत्यादी भाषा बोलणारे लोक राहतात. मी त्यांच्या बद्दल व गावातले वेगवेगळी
भाषा बोलणारे लोकं कसा जातीभेद करतात. त्यांच्या बद्दल मी थोडक्यात लिहाली आहे.
गोंडी मुलं जेव्हा ढोल वाजविणाऱ्या मुलींना घरात
आणतात. तेव्हा मुलांचे आई-वडील तिच्यांशी चांगला वागतात. आणि आजूबाजूचे लोक पण
तीच्याशी चांगला वागतात. ती बनवलेली पदार्थ आजूबाजूचे लोक खातात पण जेव्हा काही
कार्यक्रम वैगरे असतात. तेव्हा ती जर घरातले काम करते व भात, भाजी बनवते. तेव्हा
ती बनवलेले भात, भाजी, गोड पदार्थ, हात लावलेले पाणी सुद्धा ते लोक पीत नाहीत, भात
खात नाहीत व घरात बसत नाही. ते पक्ता दुरूनंच बघता असतात. मुलाचे व मुलीचे मिटींग
ठेवतात तेव्हा मुलाचे आई-वडीलना संगतात कि या दोघांना घरात ठेवयचा नाही. त्यांनी
दुसरा घर बांधून रहायचा आणि दुसऱ्या गावातल्या
लोकांना बोलावून त्यांना जेवण द्या असे सांगतात. त्या मुलांचे आई-वडील काही
म्हटलं तर गावातले लोक त्यांना त्यांचे कुठल्याच कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही
असं संगितलं जातं. ते कुटुंब काहीच करू शकत नाहीत. जे गावातले लोक सांगतात ते
त्यांना ऐकावे लागते. ख्रिश्चन मध्ये काही लोक जातात. म्हणून गावातले काही लोक
त्यांच्याशी बोलत व काही बोलत नाहीत. त्यांना कोणीच मदतील जात नाहीत. गावात जर
कोणी मारण पावला तर जे लोक ख्रिश्चन मध्ये जातात त्यांनी जर त्या कार्यक्रमात मदत
केला तर गावतले लोक त्यांना म्हणतात की तुमच्या मुळे हा मारण पावला आहे. तुम्हीच काहीतरी केले असं म्हणतात.
ते लोक पण माणस आहे, ते लोकांना माहित असून तरी अस का करतात. ते ख्रिश्चन मध्ये
जातात म्हणून का?. भामरागडतालुक्यात काही गावामध्ये ख्रिश्चनत
जाणारे लोकचा पण हेच परिस्थीती आहे. त्या लोकांना कसा वाटत असेल ? गावातले लोक आधी त्यांच्याशी चांगले वागत होते त्यांना - त्यांना मदत
करत होते. पण आता त्यानी दुसरा धर्म स्विकारला म्हणून तेच लोक त्यांचाशी चांगला
वागत नाहीत. असं का करतात. अखेर ते पण माणसेच आहेत.
हलबी लोकंचा लग्न तीन किंवा चार
दिवस आसतो. एखाद्या मुलीगी जर घरातुन पाळून गेली तर तिला मरतात, तिच्या संबघ
थोडतात, तीला घरात येऊ देता नाही. लग्न झाल्येला मुली पक्त साडी लावयाच. दुसरे
कापडे घालयाच नाही. घातल्या तर गावतल्ये लोक 100 किंवा 1500 अस पैसे मागतात. माझा
गावात असं
वर्ग 10 वी.
व्यवसाय व शेतीचे उद्योग
व्यावसाय व शेतीचे उपयोग
शेती
हा जगातील खुप महत्त्वाची घटक आहे.शेती आपण स्वतःसाठी व दुसऱ्यांसाठी करतो.शेती
विषयी सर्व लोकांना माहित आहे.शेती सर्वांनी करतात. प्रत्येक गावात,शहरात वदेशांत
शेतीचे व्यावसाय केली जाते.व्यावसायाचे वेगवेगळया प्रकार आहेत.कापूसे जे आपण शरीर
झाकण्यासाठी वापरतो.कपडे,थंडीचे स्वेटर.गहू पिठ पोळी व चपाती या प्रकारचे.
उसमधून
साखर बनवतात आणी धानपासून भात
बनवतात.आपल्या महाराष्ट्र राज्यात माझा मनाने तर धान्याची व्यावसाय खुप प्रमाणात
केली जाते.पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चारही दिशांमध्ये शेतीचा व्यावसाय केली
जाते.शेतीमुळेच माणूस जगत असतो.आणी शेती न केल्यास ते जीवण जगू सकत नाही. म्हणून
शेती व्यावसाय सर्वांनी करतो.धान पिकवण्यासाठी पावसाची वाट पाहत राहतात.पाउस पळला
कि नांगरनी करण्याची सुरूवात करतात. नांगरनी करायची संपली की खत ठाकतात त्या नंतर
धन पेरतात.धान परून झल की दोन-तीन महिनानंतर कापनी सुरू करतात.धान कापण्याचीसंपली
की चूरणी सुरू होते.शेती करून संपल की धान विकण्यासाठी नेतात.
आपल्याकडे भाज्यांची व्यावसाय ही करतात.त्यांची
किंमत उन्हाळ्यात खुप प्रमाणात वाळतो.आणी पावसाळ्यात कमी होतो.त्याचे कारण आहे
पावसाळ्यात जास्त प्रमाणात व उन्हाळात खमी प्रमाणात केली जाते.त्यामुळे फळ
भाज्यांची भाव कमी जास्त होत राहतो.म्हणून विक्री जास्त प्रमाणात होतो.
- नाव.शिवाजी
पुंगाटी
लो.बि.आ.शा.हेमलकसा वर्ग १० वा
माझा खेळाबद्दलची माहीती
माझा खेळाबद्दलची माहिती
मी या शाळेत सातवीत शिकत
असतांना ,मी SPORT खेळयला गेलो.
तेव्हा आमचे मार्गदर्शक नंदनवन सर होते.
त्या सरांनी आम्हाला GROUND मध्ये लेट गेलातर आम्हाला PANIESMENNT करायचे. म्हणून मी
फक्त एकादी महिना PRACTIESकेलो. मग GROUND सोडुन दिलो. काही GAMES वैगरे खेळलो नाही. मग नववीत असतांना SPORT S मध्ये JOINT केलो. तेव्हा
दुब्बे सर आले. मग मी निश्चय कलो की,यांच्या हातातून नक्की खेळायचा. मग मला दुब्बे
सरांनी १५०० मीटर हा EVENT दिला. माझा १५०० मीटर ची TI MING ४.४७ होता.
आणि मी अजून १५०० मीटर ची वेळ कमी करण्चा पर्यत्न केलो. आणि माझे १५००
मीटर ची वेळ ही कमी झाला.
मी जेव्हा State लेवलचा compitation केलो. १५०० मीटरची timing 4.28 झाला. State ला मी यश झालो नाही.
जेव्हा मी state लेवल compitation उतरलो तर जे माझा सोबत compitation केले त्यांना पाऊन असा वाटत होता.की हे Compitation मध्ये तर मीच यश मिळवू शकलो असतो. कारण हा होता.
की मी state चा compitation पूर्वी मी आजारी होतो. म्हणून मी यश मिळवू शकलो नाही.
जर तुम्ही कोणत्याही गोष्टीचा स्वतावर विश्वास ठेवून केला तर त्या
विश्वासाचा तुम्हाला यश मिळतो.
नाव = शिवेंद्र कुड्यामी
वर्ग = 10
गाव =जुव्वी
Thank you
माझी शाळा
माझी शाळा लोक बिरादरी आत्रम शाळा हेमलकसा
आहे.माझ्या शाळेत सर्व सुविघा आहेत.
सोलर हिटर आहे. सोलर प्लेट आहे. सर्व सुविधा आहेत. जे भामरागड
तालुक्यातील जिल्हा
परिषद व आश्रम शाळा मघ्ये हि
तेवळी सुविधा नाही. शिक्षण सर्वांत उत्तम आहे. ४० computer
आहेत.त्यात आम्हाला नेट वापरायला मिळते, आमही एका विषयावर प्रझेंटेशन
कारतो. Lab मघ्ये २
आँपरेटिंग सिंसटिम आहेत. एक विनडोज व दुसरा उबनटु अशा प्रकारे आहेत.
Computer मघ्ये {M.S offices } आहे. जे ददहावीच्या
विदयार्थासाठी आवश्यक आहे.
वेगवेळया प्रकारच्या ग्रमर आहेत. त्याच्यामुळे
मुले जास्त सकाळी संध्याकाळी सिसीहरली जातात व त्याच्या
फायदा घेतात तसेच माझ्या शाळेमध्ये वाचनालय आहे.
त्यामध्ये ५ हजार ते ६ हजार पुश्तके आहेत. ते पण
वेगवेगळ्या विषयाची पुस्तके आहेत. माझ्या शाळेत
ग्राउंड आहे त्याच्यामध्ये माझ्या शाळेतील मुल
सकाळी
सपोरट खेळायला जातात. आणि मेडलस मिळवतात. मागच्या
वेळेस ठाणे येथे खेळायला गेले हेते. त्यामध्ये
आपल्या विदर्भाचा दुसरा क्रमांक त्यामध्ये लोक
बिरादरी आत्रम शाळेचा सिडांचा वाटा आहे. अशी आहे माझी
शाळा,खुप सुंदर, स्वच्छ व शांत.
धन्यावाद.....
माझा शाळा
........... मि बालवाळीपासुन मी लोक बिरादरी आश्रम शाळा हेमलकसा १ ली ते १२
वि परता आहे. मुलाना जेवन करन्या साटी मेस आहे मेसचा साइटला एक मोठा मैदन आहे तसेच मुलंना मुलिना हॉसटेल आहे
अमि रोज सगळे शाळेत जातो शाळेत सिकनरे मुलंचे वङील शेती करताता मिलंना पैसे
पुरवताता मुलंना शाळे कङुन तेलशाब मिळते आहे, मुलंना शाळेचे कपङे मिळत आहे. २६ जानेवारीला मीळताता व १५ ऑगटला मिळताता ते मग अमि वापरत असतो मि पुरना शाळेला सुट्टि मिळला कि आमि गवला जातो गवत पेचलावर अमला खुप खप अनंदहोतो
...मि
खुप लाहन होतो तेवा माजा वङिल मला शाळेत मग मि आई बाबाना सोळुन रहय़ला लागलो मि
मग आता माझा मित्र पाहिले मला मित्र कोनिस नवते मि शाळेत एकटाच
पिरय़चा मि एकटाच राहय़च माला बोरजाला तरि कोनि मित्र नवते .
-नाव रोहित वड्डे
-गव कुकामेटा
-वर्ग १० वा
व्यसन मूक्ती
व्य़ाशन
मूक्ति आमच्य़ा गडचिरोलीत जास्त प्रमाणे
व्य़ाशण करतात आणि लोक मरतात वर्षभरातून २०,३०
जन मरतात आणि ते व्याशणथ
लहान पासून करतात . व्याशन कसा पासून होतो .आपन
लहान असतो आणिआपन मीत्रान बरोबर खेळतो
खातो जर आपला मित्र तंबाखू खात असेल तर ते
व्याशण आपलयालाही लागू शकतो
म्हणून आपलयाला काय करायला पाहिजे,(१) आपलयाला
मित्रा बरोबर दूर रहायला पाहिजे
(२)आपन व्यशणाकळे दूलर्क्ष केले पाहिजे. (३) जर
कोणि व्याशण करत असेल त्याला सागितल पाहिजे कि
व्याशण केल्यातर मानशिक परीणाम होते आणि कैन्सर हि होतो .
आणि भामरागड तालूका मध्ये जास्त आदिवासी लोक
राहतात आणि ते जास्त प्रमाणे व्याशण करतात.
आणि ते जास्त म्हणजे लग्न मध्ये दारू पितात .
आणि भामरागड तालूका मध्ये मोहाचे फूल वेचतात आणि त्याचा दारू
काढतात.आणि वेगवेगळया फळाचे दारू काढतात आणि भामरागड
तालूकातील जेवढे गाव आहे तिथेआता व्याशण बंध होत आहे
नाव सूनिल बाकडा
रा पल्ली , वर्ग१० वा
.
Subscribe to:
Posts (Atom)