name

India

 - Your name

माझा गावी


आमचा गावाच नाव आरेवडा आहे. माझा गाव थोडी लहान आहे. आणि माझा गावात दोनशे घर आहेत एक नाला आहे. तेथे पाणी पिनासाठि गुरे, डोरे पाणी पितात आणि तहान बागवतात. आणि आमचा गावात  आजु बाजुला हिरवगार जंगल आहे. गुरे, वासरे जंगलात चरायला जातात. आणि आमचा गावातील लोक शेती करून आपला पोट बरतात आणि आमचा गावाच नाव आरेवडा आहे. माझा गाव थोडी लहान आहे. आणि माझा गावात दोनशे घर आहेत आमचा शेतीत धान, मके, वागे, असा अनेक शेतीत पीकवतात. आणि आमचा गावात गोटुल आहे. शाळा पहिली ते सातवी पर्यत शाळा आहे. आमचा गावात पाणी पुरटा केले आहे. आमचा गावात पुरर्ण सुंविधा आहे. गावाचा शाळेत पहेले चांगला शिक्षक नवते अता चागले शिक्षक आहे. आणि चांगला शिकवतात आणि ते मुले दुसरा गावात जाऊन शिक्षन घेतात आणि ते शाळेत बगायला सुधा जात नाही आणि गावातले लोक एक जुटित राहतात. आमचा गावातून वाहनारा नालाला गावातले बाया दुशित करतात ते पाणि वासरु किंवा गाय पिऊन बिमारी पळतात जर पाणि चागला राहीला तर लोक पन पिले असते.पण पाणी दुषित अलामुळे पित नाहीत.
नाव सिता पुसाली वर्ग १०वा रा आरेवाडा

पशुपक्ष्यांचा दुःख


मला पशुपक्षी खूप आवडतात. म्हणून त्यांचे वर्णन केली आहे.
पशुपक्षी खूप वर्षे पुर्वी पासून आहेत. पण दुःख सहण करत राहतात. पशुपक्ष्यांणा माणसे त्रास देतात.
म्हणून पक्षांना खूप दूःख होतो. पहिले खूप पक्षी होते ते कुटेही घरट बांदत होते. उदाः घरात ,झाडात किवा कुटे झाड मिळेल तीथे घरट बांदत होते. पण आता तसा नाही आता फक्त झाडा वर बांदते. माणसे पशुपक्ष्यांणा मारतात किव मारूण खातात. शिकारी करायला जातात. आणि जंगाल नष्ट करतात. म्हणून पक्ष्यांणा त्रास होतो. कुटेही घरटा दिसला की घरट्यांना माणसे काळतात. आणि पक्षांना मारूणखातात. म्हणून पक्ष्यांसाठी माणसे राकक्षश बनले आहे. पक्षी पोठ बरण्यसाठी किती मेहन्नत करतात. ते लोंकाना माहित नाही. म्हणून मारूण  टाकतात.आता पाक्ष्यांच्या संख्या कमी झाला आहे. पहिले पक्षी इकडे तिकडे आकाशात उडत होते. पण आता आकाशात पण दिसात नाही. पक्षी भितात की मला कोणीतरी मारूण टाकेल किवा खाऊण टाकेल असा विचार करते. माणसांना पक्षांचा दःख दिसात नाही. फक्ता स्वताःचा विचार करतात. आपलयाला किती संकट येते तेवळा संकट पशुपक्ष्यांना पण येते. ते स्वःता कष्ट करूण जिवन जगतात. आणि आता पण जगत आहे. आता पण माणसे मारूण खातात. म्हणून पक्षी दिसात नाही. फक्ता बगळे, कावळे, चिमणी इत्यादी प्रमाणे जास्ता दिसतात. माणसे ऐवळे दुष्टा आहेत. आणि शहरांकळे तर पक्षी बिलकूल दिसात नाही. फक्ता कबूतार दिसतात. शहरांकळे तर खूप प्रदूषण होतो. पीण्यासाठी पाणी मिळात नाही. अता पशुपक्ष्यांणा शहरात गळतो. मला असावाटते की पशुपक्षांना माणसे त्रास देवू नये, जंगला तोडू नये, असा वाटते.                  
                 नाव –रजनी हबका   वर्ग -१० वी  .रा=कारमपल्ली

माझी शाळा


       माझी शाळेचे नाव लोक बिरादरी आश्रम शाळा हेमलकसा
माझी शाळा मला खूप आवडते. मी इथे पहली पासून शिकत आहे.
आता मी दहावीत आहे. या शाळेत खुप काही बघण्यासारखा आहे.
लायब्ररी, कॉम्प्यूटर रूम, मैदान, प्रयोगशाळा, इंग्लिश रूम बगिचा, बालोद्यान
हे आहेत व शिकण्यासाठी पण यांच्या उपयोग होतो. माझे वर्गशिक्षक व इतर सर
पण चांगला शिकवतात. माझे वर्गळिक्षक श्री. वानखडे सर हे आहेत.
   वानखडे सर आम्हाला गणित शिकवतात. आम्ही गणित शिकतांना शाळेतील
काही वस्तू काळजीपूर्वक वापरतो. इथे शिकून खूप जण मोठे झाले. मला पण
वाटते की मी पण पुढेशिकून काहीतरी करावा.पण मला हा शाळा खुप आवडते.
या शाळेमध्ये शिकून मुलमूली पुढे काहीतरी कराव.या शाळेचे नाव गाजवावा.
या शाळेमध्ये शिकून एवढा मोठा माणुस व्हावा की जगात त्याच्या नाव असावा.  
 
         वैशाली पुंगाटी
रा नंरागुड वर्ग१० वा

हुंडाचा बद्दल मी लिहीलेली आहे

बाई संस्कारामुळे लग्नाशिवाय राह् शकत नाही. म्हणून त्या करतात. पण पदवीधर, उच्च, पदवीधर मुलीही कसलीच सावधगिरी न घेता लग्न करतात आणि हुंङाबळी होतात. आज मुलीच प्रमाण  कमी झालेलं आहे. दहा मुलांत एका मुलाला बायको मिळणार नाही तरीही मुली लग्नासाठी गुलामिला आमंत्रण देणारी लाचारी स्वीकारतात. पण समानता नसेल तर स्वातंञ्य नाही स्वातंञ्य नसेल तर प्रेम नाही. तरी हुडा देऊन सासरची कृत्रिम नाती उदा. आई ऐवजी सासू वडिलऐवजी सासरा बहिणऐवजी नणंद भावाऐवजी दीर इत्यादी दुबळी स्त्री अधिक दुबळी होते. पण समाजात न्याय पाहिजे असेल तर भारतीय घटनेत आणण्यासाठी विवाहसंस्था टिकविण्यासाठी घरजावाई रहायला पाहिजे. लग्नाला संस्कार म्हटलं शुभमंगल सावधान म्हटलं की त्या पुरूषास पत्नीसा दोधांचं जोडी समझण्याचे संस्कार होतात. हे बुध्दीला पटत नाही. लग्ना जर संस्कार आहे करार नाही, तर ते तोडण्यसाठी म्हणजे घटस्फोटासाठी कोर्टात जाण्याची गरज आहे. म्हणून मुलीनो लहान वयात लग्ना करू नका.     

- प्रिती गावडे

इरपनार

व्यसन


आमचा गडचिरोली जिल्हयात खूप लोक व्यसन करतात.   
त्यांचासाठी ते व्यसन चांगला असतो. पण त्यांना हे माहित नसतो की ती   
व्यसन हानिकारक असते. लोकांना आता व्यसनचा सवय लागला आहे.
 ते व्यसन म्हणजे फक्त दारु नव्हे खर्रा , गुटका, तंबाखू , नस, बिडी, 
सिगरेट अशाप्रकारे वेगवेगळ्या व्यसन आहेत. दारु मध्ये पण फक्त
मोहाचे दारु नसते देशी दारु, मोसांबी दारु, इंग्लीश दारु, नारयल दारु,
ताडी, गौरगा, शिंदी, चारा( रेखा ), जाभूळ ( नेडी ), चिंच ( इतांग ) , गूळ ( बेलेम ) आता हितून मोह, चिंच,  चारा, जांभूळ, गूळ, शिंदी, ताडी, गौरगा, याचाने आमच्याकडे दारु काढला जाते.
                   हे सर्व प्येय लोक आवडीने पितात. पण आता मोहाचा दारु कसं  काढून पितात याला काही महत्वा नाही.ते दारु काढून पितात त्यांना हे माहिती नसते की ते दारु मध्ये रासायनिक असते. ते लोक दारु पितात तर फक्त मज्जा घेण्यासाठी पण त्यांना हे माहित नसते की त्या दारु आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे.  लोक दारु पितात तेव्हा त्यांना चंकर येते तेव्हा त्यांना खूप मज्जा वाटते. पण नंतर डोके दुःखते, डोळे दुःखते दारु पिल्याने असा परिणाम होतो. कॅन्सर होतो. आणि हे तंबाखू  दिवसभर गालाकडे ठेवतात म्हणून त्यांचा दात काळे पडतात आणि तोंडात छोटे छोटे पोळं  होतात आणि दुःखतात तसेच सूजतात कॅन्सर व्यायला सुरवात होते पण त्या माणसाला कळत नाही की मला कॅन्सर होतोय.
                                  खर्रा गुटका नस हे पण असच प्रकारे आहे. खर्रा पण Any Time तोंडात ठेवल्या  जातात आणि ते खर्रा चावत असतात तेव्हा अर्धा थुंकी आत मध्ये गिळल्या जातो. तेव्हा आपल्याला नुस्ता झोपून राहावास वाटतं. कोणताही काम करुसा वाटत नाही. म्हणून हे सर्व खायल्या प्यायला सोडून दया. कारण हे व्यसन करणं म्हणजे आपल्या जीवचा धोका आहे.                                                                                                                              
        

         नावः ज्योती देवू  तंलाडी.          
          गावः कुडकेली.   
         Class : 10th.             


माझा गाव


आमच्या गावाचा नाव इरपनार . भामरागड तालुका मध्ये आहे.आमच्या गावात आजू बाजूनी हिरवा आणि गनदाट जंगल व्यापलेला आहे.आमच्या गावात ७० घरे आहे. आमच्या गावातील वातावरण खुप छान आहे . सकाळी पाहाटे उठतो तेव्हा चिमण्या पाखरंचे किलबिल सुरु असते. लहान पाखरे घरट्यात रहातात. आणि त्यांची माय चारा शोधून आणतात. असा प्रकारे सकाळाची दैनंदिन असते. आमच्या गावच्या आजू बाजूनी नदीचा उगम होतो. ते नदी रात्र आणि दिवस कळ-कळ असा आवाज करते. आणि शेतामधून वाहते. गावातील गाई गुरे तीथे पाणी पिऊण आपले तहान बागवतात. आमच्या गावात सर्व लोक शेतीवाळी करतात .वआपल्य पोट भरतात.आणि बाकीचे दान विकतात. पण कमी पैसा मध्ये विकतात. आणि त्या पैसातून  आपल्य घर चालवतात. आणि आपल्य देशा मध्ये असे पण लोक आहेत की ते स्वःतला मोठे पण समजतात. आणि शेतकरी लोकाना कमी पणा समजतात.पण एक वेळ असा येईल की तेव्हा शेतकरी लोक एक महिनासाठी शेतीकरनार नाही. तेव्हा बाकीचे लोकाना भात कुटून बेटनार.जरी ते नौकरी करत असल्या तरी पण भात बेटू शकत नाही. कारण शेतकरी शेती करुन दान विकलेच नाही. तर कुटून बेटनार. जरी आपन नौकरी मध्ये असल्य तरी काही परक पडत नाही.कारण नौकरी केल्यने पैसे भेटतात. पण शेती केल्याने आपला पोट भरतो. जर आपला देशात शेती करणारे शेतकरी कमी झाले.तर आपण जिवंत राहू शकत नाही. त्या साठी जास्ती जास्त लोक शेतीच्या उपयोग केला पाहिजे. नौकरी करणारे लोकानी कधी पण शेतकरी लोकाना कमी पणा समजायच नाही. उलट त्यांचा आभारी म्हणून घ्याची.कारण ते आहेत. म्हणून आम्ही सर्व लोक आहोत. आमचा गावात छोट्यासा गोटूल आहे. त्या गोटूल मध्ये मोठ्या लोकाचा चर्चा सूरु असते. पण मला असा वाटते की हे पध्दत  कायमतरने बदलनार आहे. कारण पिढीन पिढी मेल नंतर सर्व विज्ञ्यानीक यूग राहानार आहे. आणि लोक संख्या वाढणा आहे.आणि घर ,नौकरी,रोजगार,व्यावसाय, शिक्षण, शाळा, हॉटेल,दूकान,असा एक एक समस्या वाढत जातील. आणि आता कायनतराने विकत घ्यावा लागनार असा मला वाटते. कारण आताच ऐवळा प्रदूषन वाळत चालला आहे गावात प्रदूषन नाही  शहरात मध्ये होतो.आणि कायमतराने गावात पण होईल. असा मला वाटते.

नावः कुमारी उज्जवला सडमेक   
वर्गः १० वी