आदिवासी लोक आपले पंरपरा नुसार चालत असतात


आदिवासी माणसावर आपली परंपरा सर्वात चांगली आहे. आणि हिच रीत वापरली पाहिजे .कोणतेहि वेळी असो किंवा कोणतेही अडचणीअसो पण माञ आपलीच रित वापरली पाहिजे.व त्यार्माफत आपली अडचण सोडवली पाहिजे.असे आपले भागातील लोक करत असतात.जसं,उदा.एक मूलगाला काही रोग झाला असेल तर आपली भागातील लोकसर्वात पहिले दवाखानात न नेता ते गावातील पुज्यारा कडे जातात आणि तिथं उपचार करतात .मला समजत नाहि ऐवडे अभ्यास करून डॉक्टर बनतात ते डॉक्टरला न दाखवता पुजारी कडे जाऊन ते उपचार कराले जातात. हे सर्व त्यांचे रूढी परंपरा नुसार ते करत असतात. म्हनून मी असा म्हणतो त्यांची रूढी परंपरा बद्दली पाहिजे. माझा मत असा आहे कि त्या माणंसामध्येकाही दोष नाही आहे. त्यांची परंपरा नूसार करत असतात. म्हनून मला वाटते कि त्यांची परंपरा बद्दली पाहिजे. आणि मला असे वाटते कि परंपरा बद्दली पाहीजे आणि त्यासाठी पहिले सर्व आदिवासी भागातील मूलांचा शाळेच्या मागावर लागले पाहिजे व गावा पर्यतं जाऊन दवाखानाची सोय केली पाहीजे. आणि त्या लोकांना सर्वा बाबतीत माहीती पोहचून दिले पाहिजे. नूसता सांगण्या ऐवजी त्यांना म्हणजे लोकांना गोळा करून सांगितले पाहिजे . त्यानां न सांगता दर्शवून सांगितले पाहिजे असे माझे मत आहे. नाव जय हावलादार  वर्ग १० वा   रा  भामरागड

भामरागड मध्ये शेती कसा करतात


भामरागडवर शेती कसे करतात आमच्याकडे एखदाच करतात व कसे शेतीचे उपयोग करतात तेस महित नही शहरात आणि गावात खूप परक असतो.शहरात दोन वेळ उप्बलध करतात.आणि आमच्याकडे एखदाच करतात. म्हणून आमचकडे उत्पादन कमी होत असतो. वआमच्याकडचे लोकांना महितच नसतो.की पाणी साठवता येत नाही.म्हणून शेतीचे उत्पादन होत .जर शेती कशे वापरतात हे जर महित असत.तसेही आमच्याकडे शेती खूप असतो.पण वापरत नसतो हे आदिवासी लोकांचे कंडीसन असतो.व शहरातच लोकांन टेकनिक असतो
.आदिवसी लोकांन टेकनिक नसतो.म्हणून आदिवसी लोक मागे असतात.शहरात शेती विकासीत होत राहते. गावात किंवा आदिवासी भागात मागे रहतात. परक आदिवासी लोक अशुद्दरूत असतो.शहरात शुद्धत असतात.हे परक आहे.शहरात वेगवेगळे व्यावसाय करतात. आदिवासी लोक एकाच व्यावसाय करतात.आदिवास लोकांना कुकुट पालन म्हणजे तेही माहित नसते. इकडचे लोकांन दोन व्यावसाय महित आहे. एक म्हणजे दारू व शेती हे सोळुन त्याना माहित आहे.तर दोस्तो आवडल तर वाच.माग सांग खरा आहे कोटा सांगा ?
            प्रत्यक्ष येउन बगा इकडचा शेती कशे वापरतात.व कोट वाटत असेल तर भामरागड गावात ये आम्ही दखतो.पावसळत ये तेव्हा तुमाल रियली बागात येईल.व वसंत ऋतु एखद ये.इकडचे काय करतात कशा वापरतात.कशा उब्पधन करतात. हे सर्व महित पवासळत किंव वंसत श्रुतूत महित होईल.या दोन श्रुतूमध्ये य.तुम्ही पकत आदिवासी भागा मध्ये जाहुन विचर व्यासय म्हणजे काय?या भागात अशिक्षित लोक राहतात. शिक्षणचा महत्व ही महित नही.
                                                                                                                    तुम्हाल आवडल likeकरा  

   अशोक पुसाली
    गावाःपेनगुडा
     ताःभमरागड
    जिःगचिरोली

माझा गाव


                                                         माझा गाव
माझा गाव मला खुप आवडते आणि गावाचा नाव झारेगुडा आहे.
आणि माझा गाव खुप छोटा आहे आणि लोक पन खुप कमी आहे. 
 आणि आपलाकडे लगणालाआणि वेगवेगळा खारीक्माला खुप कमी असातात.
पन गावात आपलेला थेवळा मझा येथ नाही आणि माझा गावात फकथ तीन भोरवेलआहेत.
आणि तीथून दोन भोरवेल करब होतात मघ आमाला पाणीसाठी खुप तकलिब होते.
मणुन आमाला अझुन एक भोरवेल आवि आहे आणि मी गावाला झावून मी माझा गावाचे लोकाना गोठूल मधे किवा कुटेही सागनार .
पण पहिला माझा घरचाना सागनार.पन मी गावात हे गोष्टी नकी मी सागनार आहे.
आणि लोकाना  मी झावुन सागनार थेवा खुप खुप खुशि होनार मग वाटनारकी आमचा गावात भोवेल आझुन एक नवीन भोरवेलआहे.
आणि आमचा गावात एक ते चैवथी परता शाळा आहे. आणि माझा गावा भाजुला दोन नदी आहे आणि थे नदीचा नाव परला कोटा आणि फामुल घताम हे दोन नदी मधे वेगवेगळा लोकानी तीथे आगोळीसाठी किवा कपडे धतनसाठी येतात.आणि गुरे डोरे पानी पिणासाठी येतात. मी माझा गावचा बदल दोन शब्द लीवून समात करतो.
माझा नाव ज्योती पुंगाटी 

वर्ग  १०  वी  रा =झारेगुडा

name

India

 - Your name

माझा गावी


आमचा गावाच नाव आरेवडा आहे. माझा गाव थोडी लहान आहे. आणि माझा गावात दोनशे घर आहेत एक नाला आहे. तेथे पाणी पिनासाठि गुरे, डोरे पाणी पितात आणि तहान बागवतात. आणि आमचा गावात  आजु बाजुला हिरवगार जंगल आहे. गुरे, वासरे जंगलात चरायला जातात. आणि आमचा गावातील लोक शेती करून आपला पोट बरतात आणि आमचा गावाच नाव आरेवडा आहे. माझा गाव थोडी लहान आहे. आणि माझा गावात दोनशे घर आहेत आमचा शेतीत धान, मके, वागे, असा अनेक शेतीत पीकवतात. आणि आमचा गावात गोटुल आहे. शाळा पहिली ते सातवी पर्यत शाळा आहे. आमचा गावात पाणी पुरटा केले आहे. आमचा गावात पुरर्ण सुंविधा आहे. गावाचा शाळेत पहेले चांगला शिक्षक नवते अता चागले शिक्षक आहे. आणि चांगला शिकवतात आणि ते मुले दुसरा गावात जाऊन शिक्षन घेतात आणि ते शाळेत बगायला सुधा जात नाही आणि गावातले लोक एक जुटित राहतात. आमचा गावातून वाहनारा नालाला गावातले बाया दुशित करतात ते पाणि वासरु किंवा गाय पिऊन बिमारी पळतात जर पाणि चागला राहीला तर लोक पन पिले असते.पण पाणी दुषित अलामुळे पित नाहीत.
नाव सिता पुसाली वर्ग १०वा रा आरेवाडा

पशुपक्ष्यांचा दुःख


मला पशुपक्षी खूप आवडतात. म्हणून त्यांचे वर्णन केली आहे.
पशुपक्षी खूप वर्षे पुर्वी पासून आहेत. पण दुःख सहण करत राहतात. पशुपक्ष्यांणा माणसे त्रास देतात.
म्हणून पक्षांना खूप दूःख होतो. पहिले खूप पक्षी होते ते कुटेही घरट बांदत होते. उदाः घरात ,झाडात किवा कुटे झाड मिळेल तीथे घरट बांदत होते. पण आता तसा नाही आता फक्त झाडा वर बांदते. माणसे पशुपक्ष्यांणा मारतात किव मारूण खातात. शिकारी करायला जातात. आणि जंगाल नष्ट करतात. म्हणून पक्ष्यांणा त्रास होतो. कुटेही घरटा दिसला की घरट्यांना माणसे काळतात. आणि पक्षांना मारूणखातात. म्हणून पक्ष्यांसाठी माणसे राकक्षश बनले आहे. पक्षी पोठ बरण्यसाठी किती मेहन्नत करतात. ते लोंकाना माहित नाही. म्हणून मारूण  टाकतात.आता पाक्ष्यांच्या संख्या कमी झाला आहे. पहिले पक्षी इकडे तिकडे आकाशात उडत होते. पण आता आकाशात पण दिसात नाही. पक्षी भितात की मला कोणीतरी मारूण टाकेल किवा खाऊण टाकेल असा विचार करते. माणसांना पक्षांचा दःख दिसात नाही. फक्ता स्वताःचा विचार करतात. आपलयाला किती संकट येते तेवळा संकट पशुपक्ष्यांना पण येते. ते स्वःता कष्ट करूण जिवन जगतात. आणि आता पण जगत आहे. आता पण माणसे मारूण खातात. म्हणून पक्षी दिसात नाही. फक्ता बगळे, कावळे, चिमणी इत्यादी प्रमाणे जास्ता दिसतात. माणसे ऐवळे दुष्टा आहेत. आणि शहरांकळे तर पक्षी बिलकूल दिसात नाही. फक्ता कबूतार दिसतात. शहरांकळे तर खूप प्रदूषण होतो. पीण्यासाठी पाणी मिळात नाही. अता पशुपक्ष्यांणा शहरात गळतो. मला असावाटते की पशुपक्षांना माणसे त्रास देवू नये, जंगला तोडू नये, असा वाटते.                  
                 नाव –रजनी हबका   वर्ग -१० वी  .रा=कारमपल्ली

माझी शाळा


       माझी शाळेचे नाव लोक बिरादरी आश्रम शाळा हेमलकसा
माझी शाळा मला खूप आवडते. मी इथे पहली पासून शिकत आहे.
आता मी दहावीत आहे. या शाळेत खुप काही बघण्यासारखा आहे.
लायब्ररी, कॉम्प्यूटर रूम, मैदान, प्रयोगशाळा, इंग्लिश रूम बगिचा, बालोद्यान
हे आहेत व शिकण्यासाठी पण यांच्या उपयोग होतो. माझे वर्गशिक्षक व इतर सर
पण चांगला शिकवतात. माझे वर्गळिक्षक श्री. वानखडे सर हे आहेत.
   वानखडे सर आम्हाला गणित शिकवतात. आम्ही गणित शिकतांना शाळेतील
काही वस्तू काळजीपूर्वक वापरतो. इथे शिकून खूप जण मोठे झाले. मला पण
वाटते की मी पण पुढेशिकून काहीतरी करावा.पण मला हा शाळा खुप आवडते.
या शाळेमध्ये शिकून मुलमूली पुढे काहीतरी कराव.या शाळेचे नाव गाजवावा.
या शाळेमध्ये शिकून एवढा मोठा माणुस व्हावा की जगात त्याच्या नाव असावा.  
 
         वैशाली पुंगाटी
रा नंरागुड वर्ग१० वा