अंधश्रद्धा


लोकांनी   सत्य   म्हणून  स्वीकारलेली  कल्पना  किंवा  विधान  म्हणजे  अंधाश्रद्रधा  होय.  पुर्वनुभव  धार्मिक  समजुती  किंवा  लोकमतवर  अंधाश्रद्रधा  आधार  केलया  असतात.  अंधाद्रधा  या  अनभवाच्या  आधारे  तपासून  बघता  येत  नाहीत.     उदा, देवाच्या  अस्तित्वा  वरील  अंधाश्रद्रधा  पुनर्जन्मवरील  अंधाद्रधा  इत्यादी.  या  सर्व  अनुभावाच्या  आधारे  तपासून  पाहता  येत  नाहीत.  साधारणपणे  आपलया  समाजातील  लोक  विवाह  शुभ  दिवस  पाहून  करतात,  काही  समुदायांत  मुलांजा  किंवा  मुलीना  नजर  लागू  नये  म्हणून  त्यांच्या  गळयात  किंवा  दंडावर  काळा  दोरा  बांधतात.  या  गडचिरोली  जिलह्यातले.  आदिवासी  लोक  आजारी  पडले  की  ते  दवाखान्यात  नेत  नाही.  ते  पुजाज्यांकडे  घेऊन  जातात.  जादू  केलयामुळे  हा  आजारी  पडला  असा  त्यांना  वाटते.  आणि  हे  लोक  पुजारीलाच  देव  मानतात.  म्हणून  ते  जसा  सांगतात  तसा  करतात.  अंधाश्रद्रधा  निमीण  करणारे  हे  पुजारीच  असतात.  पहिलया  काळत  जास्त  अंधाश्रद्रधा  होते.  उदा,  रस्त्याचा  आडवा  मांजर  गेला  तर  कामाला  जाणारा  मासूण  पुढे जात नव्हते.  पुढे  गेला  तर  आजारी  पडू  शकतो  कीवा  काही  होऊ  शकतो  असा  त्यांना  वाटत  होते.  हे  अंधाश्रद्रधा  पण  पुजा  प्यांनीच  निमण  केले.  मुली  चौदा  पंधरा  वयाच्या  तेव्हा  त्यांचा  मासीक  पाळी  सुरु  होते.  त्यांना  पाळी  आली  की  त्या  मुलींना  घराच्या  बाहेर  डेवत  होते.  अंगणातसुदधा  येऊ  देत  नव्हते.  त्यांना  हात  तर  मुळीच  लावत  नव्हते.  त्यांच्यासाठी  वेगळ  छोटासा  झोपडी  बांधून  देत.  या  मुली  उन्हाळ्यात  बाहेर  झोपायचे  तेव्हा  त्यांना  साप  वैगरे  चावून  त्यांचा  मृत्य  व्हायचे.  पण  हे  पुजात्र्यानी  निर्माण केलेल्या  अंधाश्रद्रधा  आहे.  आणि  हे  अंधाद्रधा  अताही  सुरु  आहे.  अताही  पाळीत  झालेल्या  मुलीना  घरात  ठेवत  नाही  घराच्या  बाहेर  ठेवतात.  कारण  माझ्या  स्वतःच्या  घरातच  अस  घडते.  वयात  आलेल्या  मुलीनां  ज्या  घरात  धन  ठेनतात.  तिथे  घुसायला  देत  नाही.  जर  तुम्ही  त्यांना  घरामध्ये  ठेवले  तर  तुम्हाला  काहीही  होऊ  शकते.  असा  पूर्णापणे  पुजाण्यांनी  त्यांच्यावर  मुखूखप्रमाणे  चढवलेले  आहे.  अशा प्रकारे  पहिल्या  काळातले  हे  अंधाश्रद्रधा  आहेत  आणि  हे  अत्ता  पण  चालत  आहे.  पण  अता  काही  शिकलेल्या  लोकांचा  अंधाश्रद्रधा  कमी  झाल्याचे  आढळून  येते.  आणि  मूलींना  शाळेत  पाठवणे  पाप  समजायचे.  पण  जर  या  सगळे  लोक  शिक्षन  घेतले  तर  काहि  काळानंतर  अंधाश्रद्रधामध्ये  बदल  होऊ  शकतात  जसा  की  उद,  काही  संस्कूतीमधील  लोकांची  अशी  अंधाश्रद्रधा  आहे  की  सूर्य  हा  देव  आहे  म्हणून  ते  त्याची  पूजा  करतात.  जेव्हा   या  संस्कूतीत  साक्षरता  व  ज्ञान  यांचा  प्रसार  होईल  तेव्हा  वैज्ञानिक  ज्ञानामुळे  ते  सूर्य  हा  एक  अकाशीय  किंवा  खगोलीय  वस्तू  असून  त्याच्या  ज्वलनामुळे  आपणास  उष्णता  आणि  प्रकाश  मिळते.  असा  प्रकारे  अंधाश्रद्रधामध्ये  बदल  होऊ  शकते  असा  या  अंधाश्रद्रधेने  भरलेला  आहे.  आमचा  गडचिरोली  जिल्हयाला  नक्षलवादी  ग्रस्त  म्हणून  ओळखतात  पण  अंधाश्रद्रधा  ग्रस्त असही  ओळखल  जाईल  असं  वाटत  मला  ज्याच्या  मेंदूमध्ये  अंधाश्रद्रधा  शिरतो  तो  अंधा  आहे असाच  समजावे.  अंधाश्रद्रधा  हे  माणसाच्या  बुदधीला  खाऊन टाकणारा  रोग  आहे.  स्वामी  विवेकानंद  म्हणतात.  अगदी  नास्तिक  झालात  तरी  चालेल,  परंतु  अंधाश्रद्रधा  ठेवणारे  मूर्ख  होऊ  नका,  कारण  नास्तिक  झाला  तरी  त्याच्या  ठयी  जिवंतपणा  असतो.  त्याचे  आपल्याला  काहीतरी  करता  येईल.  परंतु  अंधाश्रद्रधा  शिरली  म्हणजे  बुध्दीच  मेली,  मंद  होत  चालली  आणि  बुध्दी  गेली  म्हणजे  सारचे  गेले  जिवनाचा  अंधपात  झाला.


- सविता माटा मडावी
कुडकेली
                                         

कोंबडा बाजार

भामरागडला आठवड्यातून बुधवारला एक दिवस भाजीपाल्यांची,कपड्यांची व इतर वस्तूंची बाजार भरते. त्याचप्रमाणे “कोंबडा बाजार” आठवड्यातून पाच-सहा दिवस बसत असते आणि वेगवेगळ्या दिवसी दुसऱ्या-दुसऱ्या गावांमध्ये बसत असते. त्यामध्ये अनेक आसपास गावचे माणसे स्वतःची कोंबडे घेऊन तैल्यात भरुन ज्या गावी कोंबडा बाजर भरते त्या गावी येतात. त्यात आल्यानंतर कोंबडाला तैलातून काडून मोकळा सोडतात व लहान रोपाला बांदून ठेवतात. काही माणसं आल्यावर थोड्या वेळात  प्रत्येकाने कोंबड्या धरून दुसऱ्याची कोंबडा विरूद्ध लढवण्यासाठी दुसऱ्याची कोंबड्याशी जोडी करतात आणि  त्यात उंची बघतात व जोडी पटली की मग त्या कोंबड्याचा मालक चाकू बांधणाऱ्याकडे नेतो पण एकच माणसाकडे नेत नसतात आणि चाकू वाल्यानी कोंबड्याचा पायाला चाकू बांधतो.

रणांगणाचा मैदानात आणतो. कोंबडे सोडण्याचा  मैदानाचा चारी बाजूंनी लोक उभा होऊन काला-काला, सपेद-सपेद, बुडदी-बूडदी असा प्रकारे कोंबड्यांचा रंगांचा स्वरूपाने ओरडतात. पैसांची होळ (पैज) लावत असतात .( त्यामध्ये कधी-कधी पैसे होळ लावणाऱ्यांचे भांडण होत असतात.)दोनही विरूद्ध कोंबडा आणले की मग लगेच सोडतात आणि त्या दोन कोंबड्यांची मारामारी सुरू होते, त्यामध्ये जो कोंबडा आधी मरेल तो हारेल आणि जो मरणार नाही तो विजय होईल. मग ज्याचा कोंबडा जिंकला असेल त्यानी चाकू जो बांधला असेल त्याला १०० किंवा २०० रूपये देत असतो आणि कोंबड्याना घरी घेऊन जातं व हारलेल्या कोंबड्याला खातात (पराजय झालेला).
स्वतःचा कोंबड्यास जखम झाला असेल तर त्याची जखमेवर इलाज करतात आणि त्या कोंबड्याला जर का जास्त जखम लागला असेल तर जास्तीत-जास्त दोन आठवड्या पर्यंत त्या कोंबड्यास बाजारात नेत नसतात. पण जर का कोंबडा हारला तर घरच्यांना वाईट वाटत असते किंवा कधी-कधी घरच्या बायका स्वतःचा पतीला रागवत असतात. ज्या दिवशी कोंबडा जिंकतो त्या दिवशी बायका त्याच्याशी गोड - गोड बोलतात.

- गणेश नरोटे

my story

                                   शिक्षण घेत असतांना.. 

 प्रत्येक student हाच विचार करतो की, मी या वर्षी दाहवीत आहे. मला खूप टक्केनी पास वायचं आहे. नेमकं पास वायचं म्हणजे काय? त्याचसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. कारण आपल life  इतूनच सुरु होत असतो. आपण कोणत क्षेत्रात हूशार आहो, हे आपलाल शोधने गरजेच असतो. आपण आपल life मध्ये काहीही करयच असेल तर आपण जीते हूशार आहो, जे आपलाल आवडते, तेच क्षेत्रात गेल पहीजे. आपण जिवन जागत असतांना, आपण कोण आहो? आपण काशा वगतो? कोणाशी कसं बोलतो? याचं वरुन आपण कसे आहो हे ठरत असतो.                                                                                                                                        

 शिक्षण घेत असतांना, आपल्याला खूप अडचणी येत असतात. आपण पुस्तक वाचतो, पण त्यामध्ये अपलाल ते शब्द कडतात का? ते समाजातात का? हे महीत करून घेणे गरजेच असतो. आपण लिहतो, वाचतो पोपट पंची सरक बडबड बोलणे याल काहीही आर्थ नाही. हा यूग विज्ञान चा यूग आहे. नवनवीन शोध लागत आहे. आपलाल जर जग शोबत जाच असेल, तर आपण जग शोबत चालाल पहीजे. एक तर आपल भगतील मूलान कोणीही हीशर मनत नाही. जर लोका समोर आपण काय आहो हे दाखवाचं असेल तर, आपण ही हूशर आहो हे लोकान पाठवूण देणे गरजेच आहे.                                                                                                                      

सकाळी जेव्हा हरिण उठाते तेव्हा विचार करतो की आज जर मी जोवरत नाही धावलो तर मझा शिकर केला जाईल. आणि जेव्हा सिंहा उठातो तेव्हा ही विचार करतो कीआज जर मी शिकार नाही केला तर उपशी मरूण जाईन. म्हणून प्रत्येक वेळी कोणताही कामासाठी तयार राहा. तूम्ही जर तयार नसंल तर समोर जाऊ शकणार नाही.

म्हणून विध्यार्थी मित्रानो खूप अभ्यास करा. शिक संघटीत वा, संर्घष करा.
              धन्यावाद
 (विलास वेलादी)
 (वर्ग १० वा)

मला असे वाटते...




आज आपण भारत देश नक्कीच प्रगतीच्या मर्गांवर आहेत.आजही आपल्या पुढे अनेक समस्या आहे अशा परिस्थिती आपण प्रगती करु शकतो का मला तर नाही वाटतं या समस्या वाव्यासारखे प्रगतीमागे धावणाव्या भारत हा पर्वत सारख्या उभ्या आहेत ज्यामळे भारत मध्येच कुठेतरी कमी पडत आहे या देशाला विकास करायचा असेल तर या सगळ्या समस्या मिटविण्यासाठी सुरुवातील,घर,घरांपासुन,गाव गावापसुन शहर आणि शहरापासुन देश हे सगळ्या जागृती आपल्याच कर्तव्य आहे असे मला वाटते ही सगळ्या शिक्षणामुळे जागृती होईल व आपण जर विचाराची दिशा योग्य ठेवली तर कहीच अवघड नाही म्हणजे नवयुवकांसाठी सर्वात मोठी गोष्टी म्हणजे त्याच सकारात्मक दुष्टीकोन आसणारी माणसे आपल्यापुढे आत्माविश्वास, चिकाटी,हे गुण दिसुन येतात ज्याप्रमाणे आपल्या शरीराला रोज चांगल आहाराची गरजा असते तशी आपल्या मनालाही दररोज उत्तम विचाराची आवश्याकता असते जसे शरीराला खराब झालेला अन्न तसे मनालाही घाणेरडे विचार येतात रोग असलेला माणुस मन याशिवाय आपण काही करु शकता नाही    

शेवटी एवढाच सांगतो की ज्या जगात मी आलो ते जग मृत्युपूर्वी मी सुंदर करुन जाईन अशी माझी जिद्दी आहे केवळ विर्थ्यांबददच नव्हे तर आपल्या सर्व समाजाबदद्ल माझी ही तक्रार आहे की आपण जीवनकडे पाहतच नाही तुम्ही काय आहात हे तुम्हाला नवलाच वाटले परंतु तुम्ही काय बनू शकता याचा तुम्हाला पत्ताच नाही तरुण संतृष्ट असु असंतृष्ट सारखे आहे काय हा देश आहे या तरुणांनी जीवनाची आव्हन स्वीकरायची आहे तरुणा माणासांनी उठा आणि जागे व्हा असे मला वाटते तेव्हाच आपला देश उज्ज्वल भावितव्य होइल व तेव्हाच समोर जाईल तेव्हाच आपले देशाचे नाव कामवले आपण रोज योग रीतीने काम करतो ते पण तसेच देशाला योग दिशेने आकार मिळले तुम्ही या जगाचा अनुभव घ्या कारण अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे जीवनात आपल्या यश आणि अपयश या दोन गोष्टीच्या महत्त्व आहे जगतांना प्रकाशाचे महत्त्व कळवण्यासाठी म्हणजे तो जवळ असताना त्याचे मोल संपणार नाही व पुर्वीसारखे जग नाही आत सुधारलेली पुर्वी कसा होता मुलगी लहान असतानाच विवाह करुन द्यायचे आत २०-२५ वर्ष होईपर्यंत कोणीही लग्न करत नाही कारण शिकलेले असतात      

दिलीप गावडे वर्ग(१०)वी

गाव-इरपणार

 

विद्यार्थ्यांच्या जीवणात शिक्षणाच्या योगदान

मी एका आदिवासीच्या भागात राहणा-या आईचा पोटातून जन्म घेतला. माझे आई-वडीलांनी जन्म दिल्यापासून ते आजपर्यंत चांगले गुण आत्मसात करायला लावुन मला चांगले वळण दिले, आणि शिक्षणाची ओढ लावली शिक्षणाच्या दिशेने पुढे पाय ठेवायला सांगितली, त्यामुळे आज मला माझ्या मनाला बुद्घीला आंनद होत आहे माझे आई-वडीलांवर मी खुश आहे.

त्याना खुश नजरेने पाहण्यासाठी माझ्या  डोळ्याची, मनाची भावना बदलतात, आणि मला त्याना खुश नजरेने पाहण्यास पुढे ढकलतात. इयत्ता पहिली पासुन माझे आई-वडीलांनी शाळेत दाखल केली आज मी अनेक शिक्षकांचा हाता खालुन जात आहो.

प्रत्येक माणसाच्या प्रथम शिक्षक आपल्या शिक्षणाच्या शेवटच्या टप्पा पर्यंत आपल्या मनावर आपला भावनांवर नजर ठेवत असलेत आपल्यामध्ये चांगले गुण आत्मसात करून घेवण्याची काळजी घेत असतो.

मी इयत्ता पहिली पासुन शिकत येऊन नववीत पोहोचलो.या शिकत्या वयात अनेक शिक्षक संबंधात येतात,जेव्हा पासून मी शाळेत शिकत आहे. तेव्हा पासून माझे आई-वडिलांपेक्षाही अधिक शिक्षकांचे गोष्टी आवडू लागले. आपण शिक्षकांचा हातातून जात असताना, विद्यार्थ्याना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या गुण, भावना, कल्पना, विचार अनेक विद्यार्थी आत्मासात करतात, आणि विद्यार्थ्यांमध्ये हे सर्वांचे संस्कार घडून त्याला वागण्याची नवीन गती प्राप्त होते. आणि तो त्या संस्कारानुसार समाजात वावरू लागतो.

शिक्षक हे समाजाचे शिल्पकार आहेत, त्यांच्यामुळे समाजातील एक मुलगी जरी शिक्षण घेतली तरी पूर्ण समाज बदलू शकतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षक हा स्व:ताच्या सर्व कल्पना, विचार, भावना विद्यार्थ्यासाठी त्याग करतात शिक्षक हे विद्यार्थ्यांना विविध पद्धतीत शिकवत असतात. त्याच्या परिणाम विद्यार्थावर कसे होतात? हे जाणवायला आपल्याला काही काळ वाट बघावं लागतो म्हजेच आपण जेव्हा त्याच्या सारखा शिकवायला जातो, तेव्हा आपल्याला त्याचे परिणाम आपल्या झालेले दिसतात.

विद्यार्थी शिक्षकाच्या सेवकात जितका राहतील तिथकाच चांगला. विद्यार्थ्यांना एकमेंकाशी कसे बोलावे कसे राहावे हे समजते. विद्यार्थी हे आपल्या कौंटुबीक नातेवाईक पेक्षा ही जास्त नवीन शिक्षकांशी संबध जुडवायला पाहिजे.

 धन्यवाद!

शोध हा पुस्तकातील प्रसंग



माझे शिक्षक सांगतात कि मुलांना सिनेमा पेक्षा नाटक पेक्षा कविता आवडतात आणि पुस्तक सुध्दा पण मी कधीच  एखादी गोष्टी पूर्ण पुस्तकभर एकच गोष्टी
असलेले पुस्तक किंवा कांदबंरी वाचली नाही म्हणून मला आवडत नव्हते पण शोध हा कांदबरी वाचली त्यानंतर मला वाटल  सिनेमात जे असते ते पुस्तकात तर असताच पण काही गोष्टी पुस्तकात असलेले सिनेमात नसते मला हे काही पुस्तके वाचल्यावर कळलं पण जेव्हा मी अनुभवली तेव्हा मात्र मला उत्साह वाटल.
शोध हा पुस्तक आम्ही दोन आठवडा वाचत होतो ते पुस्तक इ.स १९६०साली  काळातली आहे.त्याचात एक रह्स लपून होता ते खजि
ना शोधून काढण्यासाठी पहिला गट केतकी देशपांडे, सोनत निनार कुलकर्णी. दुसरा गट आबाजी राकेश जंयत राज विकी हे खजिना शोधुन काढणारे होते. मला पहिल्यादा खुप कंटाळा येत होता  एक-एक वेळा असं वाटत होत कि इथून मी केव्हा  ऊठून जाईन मग नंतर मला एक- एक खुप मजा वाटु लागली केव्हा छान वाला भाग येत होता तेव्हा सर जेवन करायला जात होते.
मला असं वाटत होत कि सरांना थबावुन गोष्टी सागायला लावु आणि राग पण येत होता मग सर आलं कि मेसमध्ये काय झालं ते सागत होते जास्त हसायचा सांगत होते आणि एक-एक वेळा मस्त COMEDY सागतं आम्ही खुप हसत होतो थोडा वेळ असचं जात होता.
मग सर वाचायला सुरुवात करत होते सर गोष्ट वाचतांना मध्ये फोन येत होता सर एक-एक वेळा फोन ऊचलतचं नव्हते आम्ही गोष्ट एयकत होतो. आम्हाला एक दीवस सरांनी खुप गंबिर गोष्ट सरांनी आम्हाला सागितले कि तुम्ही केव्हा ब्लाग लिहाल तेव्हास मी गोष्टी पूर्ण करेन असं म्हणाले दोन तीन मुली हो म्हणाले मग दुसरा दिवसी काही मुली लिहुन आणले मी मात्र लिहून नाही आणली  मला ब्लाग कसा लिहायच तेच कळत नाही ब्लाग कसा लिहायचा आणि मी माझ्या friend ला विचारली तर तीने सांगितले .
कि Blog कोणत्याही गोष्टी वर लिहायचा गोष्टी मध्ये काय वाटलं गोष्टी कसा बद्दल आहे गोष्टीत काय आहे हे महत्व असते मला गोष्टी खुप आवडला आणि खुप काही शिकायला मिळाला त्याच्यात आंनद वाटत होता.
आणि एक एक वेळा दुःख वाटत होता व गंबिर पण वाटत होता.पण त्यादीवसी मग गोष्ट संपली.म्हणून मला आज खुप दुःख झाला कारण कि गोष्ट पूर्ण झाला नाही ते गोष्टीच्या दूसरा भाग लेखकांनी लिहीलेला नाही म्हणून मला दुःख झाला दुसरा भाग जर निघाला तर मी नक्कीच वाचीन .



धन्यवाद .


              
Thank you .कोमल आत्राम रा. येंकापल्ली

भामरागड मधील लोकांचे अवस्था


 

भामरागड तालुक्यात खूप खेडे गाव आहेत. पण खूप दूर दूर आहेत आणि त्याचा गावत चांगला शाळा नाही. ते लोक शिकलेले नाही शिक्षणाचा महत्तव कळत नाही. ते लोक अंधश्रद्धा वर विश्वास ठेवतात. भामरागड मध्ये खूप अंधश्रद्धा माणतात. भामरागड तालुक्यात जास्त शिकलेले नाही. कोणी पहिले पासून शिकलेच नाही.त्याना आयुष्यभर किती त्रास होणार आणि जे लोक शिकलेले नाही. त्यांना आता पसवतात किंवा लूठमार करतात. न शिकलेल्या माणसाना बरोबर हिशोब करता येत नाही. त्यांना कोणीच मदत करत नाही. त्यांचा जीवनात काय अडचीणी आहेत हे आपल्याला माहित नाही. लोकांवर किती अन्याय होत आहे आणि त्यांवर कोणीच आवज उठवत नाही. आता लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरली आहे. भामरागड मध्ये आता कोणकोणत्या गावात वीज नाही आणि चांगली रस्ते नाही. ते पायदल चालतात आणि लोकांध्ये भिती निर्माण होतो.

ते मग काही करु शकत नाही. अशा होऊ नये म्हणून तरुणांनी आवाज उठवला पहिजे. त्यांना मदत केली पाहिजे. त्यांना पण जगण्याचा स्वतंत्र आहे आणि त्यांना पण जगण्याचा हक्क आहे. हक्क मिळवण्याचा त्यांना आधिकार आहे. भामरागडवर राणाऱ्याना वाटत असेल की भामरागड सुधारला पाहिजे. सर्व लोक चांगले पाहिजे अशा प्रत्येकाला वाटते आहे. भामरागड मध्ये दारूबंदी खूप प्रमाण वाठले आहे. ते बंद करायला पाहिजे हे सगळे करायला तरुणांनी प्रयत्न केली पाहिजे.

नाव-रंजना पूंगाटी (वर्ग ९ वा)

गाव-हितापाळी.