my story

                                   शिक्षण घेत असतांना.. 

 प्रत्येक student हाच विचार करतो की, मी या वर्षी दाहवीत आहे. मला खूप टक्केनी पास वायचं आहे. नेमकं पास वायचं म्हणजे काय? त्याचसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. कारण आपल life  इतूनच सुरु होत असतो. आपण कोणत क्षेत्रात हूशार आहो, हे आपलाल शोधने गरजेच असतो. आपण आपल life मध्ये काहीही करयच असेल तर आपण जीते हूशार आहो, जे आपलाल आवडते, तेच क्षेत्रात गेल पहीजे. आपण जिवन जागत असतांना, आपण कोण आहो? आपण काशा वगतो? कोणाशी कसं बोलतो? याचं वरुन आपण कसे आहो हे ठरत असतो.                                                                                                                                        

 शिक्षण घेत असतांना, आपल्याला खूप अडचणी येत असतात. आपण पुस्तक वाचतो, पण त्यामध्ये अपलाल ते शब्द कडतात का? ते समाजातात का? हे महीत करून घेणे गरजेच असतो. आपण लिहतो, वाचतो पोपट पंची सरक बडबड बोलणे याल काहीही आर्थ नाही. हा यूग विज्ञान चा यूग आहे. नवनवीन शोध लागत आहे. आपलाल जर जग शोबत जाच असेल, तर आपण जग शोबत चालाल पहीजे. एक तर आपल भगतील मूलान कोणीही हीशर मनत नाही. जर लोका समोर आपण काय आहो हे दाखवाचं असेल तर, आपण ही हूशर आहो हे लोकान पाठवूण देणे गरजेच आहे.                                                                                                                      

सकाळी जेव्हा हरिण उठाते तेव्हा विचार करतो की आज जर मी जोवरत नाही धावलो तर मझा शिकर केला जाईल. आणि जेव्हा सिंहा उठातो तेव्हा ही विचार करतो कीआज जर मी शिकार नाही केला तर उपशी मरूण जाईन. म्हणून प्रत्येक वेळी कोणताही कामासाठी तयार राहा. तूम्ही जर तयार नसंल तर समोर जाऊ शकणार नाही.

म्हणून विध्यार्थी मित्रानो खूप अभ्यास करा. शिक संघटीत वा, संर्घष करा.
              धन्यावाद
 (विलास वेलादी)
 (वर्ग १० वा)

मला असे वाटते...




आज आपण भारत देश नक्कीच प्रगतीच्या मर्गांवर आहेत.आजही आपल्या पुढे अनेक समस्या आहे अशा परिस्थिती आपण प्रगती करु शकतो का मला तर नाही वाटतं या समस्या वाव्यासारखे प्रगतीमागे धावणाव्या भारत हा पर्वत सारख्या उभ्या आहेत ज्यामळे भारत मध्येच कुठेतरी कमी पडत आहे या देशाला विकास करायचा असेल तर या सगळ्या समस्या मिटविण्यासाठी सुरुवातील,घर,घरांपासुन,गाव गावापसुन शहर आणि शहरापासुन देश हे सगळ्या जागृती आपल्याच कर्तव्य आहे असे मला वाटते ही सगळ्या शिक्षणामुळे जागृती होईल व आपण जर विचाराची दिशा योग्य ठेवली तर कहीच अवघड नाही म्हणजे नवयुवकांसाठी सर्वात मोठी गोष्टी म्हणजे त्याच सकारात्मक दुष्टीकोन आसणारी माणसे आपल्यापुढे आत्माविश्वास, चिकाटी,हे गुण दिसुन येतात ज्याप्रमाणे आपल्या शरीराला रोज चांगल आहाराची गरजा असते तशी आपल्या मनालाही दररोज उत्तम विचाराची आवश्याकता असते जसे शरीराला खराब झालेला अन्न तसे मनालाही घाणेरडे विचार येतात रोग असलेला माणुस मन याशिवाय आपण काही करु शकता नाही    

शेवटी एवढाच सांगतो की ज्या जगात मी आलो ते जग मृत्युपूर्वी मी सुंदर करुन जाईन अशी माझी जिद्दी आहे केवळ विर्थ्यांबददच नव्हे तर आपल्या सर्व समाजाबदद्ल माझी ही तक्रार आहे की आपण जीवनकडे पाहतच नाही तुम्ही काय आहात हे तुम्हाला नवलाच वाटले परंतु तुम्ही काय बनू शकता याचा तुम्हाला पत्ताच नाही तरुण संतृष्ट असु असंतृष्ट सारखे आहे काय हा देश आहे या तरुणांनी जीवनाची आव्हन स्वीकरायची आहे तरुणा माणासांनी उठा आणि जागे व्हा असे मला वाटते तेव्हाच आपला देश उज्ज्वल भावितव्य होइल व तेव्हाच समोर जाईल तेव्हाच आपले देशाचे नाव कामवले आपण रोज योग रीतीने काम करतो ते पण तसेच देशाला योग दिशेने आकार मिळले तुम्ही या जगाचा अनुभव घ्या कारण अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे जीवनात आपल्या यश आणि अपयश या दोन गोष्टीच्या महत्त्व आहे जगतांना प्रकाशाचे महत्त्व कळवण्यासाठी म्हणजे तो जवळ असताना त्याचे मोल संपणार नाही व पुर्वीसारखे जग नाही आत सुधारलेली पुर्वी कसा होता मुलगी लहान असतानाच विवाह करुन द्यायचे आत २०-२५ वर्ष होईपर्यंत कोणीही लग्न करत नाही कारण शिकलेले असतात      

दिलीप गावडे वर्ग(१०)वी

गाव-इरपणार

 

विद्यार्थ्यांच्या जीवणात शिक्षणाच्या योगदान

मी एका आदिवासीच्या भागात राहणा-या आईचा पोटातून जन्म घेतला. माझे आई-वडीलांनी जन्म दिल्यापासून ते आजपर्यंत चांगले गुण आत्मसात करायला लावुन मला चांगले वळण दिले, आणि शिक्षणाची ओढ लावली शिक्षणाच्या दिशेने पुढे पाय ठेवायला सांगितली, त्यामुळे आज मला माझ्या मनाला बुद्घीला आंनद होत आहे माझे आई-वडीलांवर मी खुश आहे.

त्याना खुश नजरेने पाहण्यासाठी माझ्या  डोळ्याची, मनाची भावना बदलतात, आणि मला त्याना खुश नजरेने पाहण्यास पुढे ढकलतात. इयत्ता पहिली पासुन माझे आई-वडीलांनी शाळेत दाखल केली आज मी अनेक शिक्षकांचा हाता खालुन जात आहो.

प्रत्येक माणसाच्या प्रथम शिक्षक आपल्या शिक्षणाच्या शेवटच्या टप्पा पर्यंत आपल्या मनावर आपला भावनांवर नजर ठेवत असलेत आपल्यामध्ये चांगले गुण आत्मसात करून घेवण्याची काळजी घेत असतो.

मी इयत्ता पहिली पासुन शिकत येऊन नववीत पोहोचलो.या शिकत्या वयात अनेक शिक्षक संबंधात येतात,जेव्हा पासून मी शाळेत शिकत आहे. तेव्हा पासून माझे आई-वडिलांपेक्षाही अधिक शिक्षकांचे गोष्टी आवडू लागले. आपण शिक्षकांचा हातातून जात असताना, विद्यार्थ्याना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या गुण, भावना, कल्पना, विचार अनेक विद्यार्थी आत्मासात करतात, आणि विद्यार्थ्यांमध्ये हे सर्वांचे संस्कार घडून त्याला वागण्याची नवीन गती प्राप्त होते. आणि तो त्या संस्कारानुसार समाजात वावरू लागतो.

शिक्षक हे समाजाचे शिल्पकार आहेत, त्यांच्यामुळे समाजातील एक मुलगी जरी शिक्षण घेतली तरी पूर्ण समाज बदलू शकतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षक हा स्व:ताच्या सर्व कल्पना, विचार, भावना विद्यार्थ्यासाठी त्याग करतात शिक्षक हे विद्यार्थ्यांना विविध पद्धतीत शिकवत असतात. त्याच्या परिणाम विद्यार्थावर कसे होतात? हे जाणवायला आपल्याला काही काळ वाट बघावं लागतो म्हजेच आपण जेव्हा त्याच्या सारखा शिकवायला जातो, तेव्हा आपल्याला त्याचे परिणाम आपल्या झालेले दिसतात.

विद्यार्थी शिक्षकाच्या सेवकात जितका राहतील तिथकाच चांगला. विद्यार्थ्यांना एकमेंकाशी कसे बोलावे कसे राहावे हे समजते. विद्यार्थी हे आपल्या कौंटुबीक नातेवाईक पेक्षा ही जास्त नवीन शिक्षकांशी संबध जुडवायला पाहिजे.

 धन्यवाद!

शोध हा पुस्तकातील प्रसंग



माझे शिक्षक सांगतात कि मुलांना सिनेमा पेक्षा नाटक पेक्षा कविता आवडतात आणि पुस्तक सुध्दा पण मी कधीच  एखादी गोष्टी पूर्ण पुस्तकभर एकच गोष्टी
असलेले पुस्तक किंवा कांदबंरी वाचली नाही म्हणून मला आवडत नव्हते पण शोध हा कांदबरी वाचली त्यानंतर मला वाटल  सिनेमात जे असते ते पुस्तकात तर असताच पण काही गोष्टी पुस्तकात असलेले सिनेमात नसते मला हे काही पुस्तके वाचल्यावर कळलं पण जेव्हा मी अनुभवली तेव्हा मात्र मला उत्साह वाटल.
शोध हा पुस्तक आम्ही दोन आठवडा वाचत होतो ते पुस्तक इ.स १९६०साली  काळातली आहे.त्याचात एक रह्स लपून होता ते खजि
ना शोधून काढण्यासाठी पहिला गट केतकी देशपांडे, सोनत निनार कुलकर्णी. दुसरा गट आबाजी राकेश जंयत राज विकी हे खजिना शोधुन काढणारे होते. मला पहिल्यादा खुप कंटाळा येत होता  एक-एक वेळा असं वाटत होत कि इथून मी केव्हा  ऊठून जाईन मग नंतर मला एक- एक खुप मजा वाटु लागली केव्हा छान वाला भाग येत होता तेव्हा सर जेवन करायला जात होते.
मला असं वाटत होत कि सरांना थबावुन गोष्टी सागायला लावु आणि राग पण येत होता मग सर आलं कि मेसमध्ये काय झालं ते सागत होते जास्त हसायचा सांगत होते आणि एक-एक वेळा मस्त COMEDY सागतं आम्ही खुप हसत होतो थोडा वेळ असचं जात होता.
मग सर वाचायला सुरुवात करत होते सर गोष्ट वाचतांना मध्ये फोन येत होता सर एक-एक वेळा फोन ऊचलतचं नव्हते आम्ही गोष्ट एयकत होतो. आम्हाला एक दीवस सरांनी खुप गंबिर गोष्ट सरांनी आम्हाला सागितले कि तुम्ही केव्हा ब्लाग लिहाल तेव्हास मी गोष्टी पूर्ण करेन असं म्हणाले दोन तीन मुली हो म्हणाले मग दुसरा दिवसी काही मुली लिहुन आणले मी मात्र लिहून नाही आणली  मला ब्लाग कसा लिहायच तेच कळत नाही ब्लाग कसा लिहायचा आणि मी माझ्या friend ला विचारली तर तीने सांगितले .
कि Blog कोणत्याही गोष्टी वर लिहायचा गोष्टी मध्ये काय वाटलं गोष्टी कसा बद्दल आहे गोष्टीत काय आहे हे महत्व असते मला गोष्टी खुप आवडला आणि खुप काही शिकायला मिळाला त्याच्यात आंनद वाटत होता.
आणि एक एक वेळा दुःख वाटत होता व गंबिर पण वाटत होता.पण त्यादीवसी मग गोष्ट संपली.म्हणून मला आज खुप दुःख झाला कारण कि गोष्ट पूर्ण झाला नाही ते गोष्टीच्या दूसरा भाग लेखकांनी लिहीलेला नाही म्हणून मला दुःख झाला दुसरा भाग जर निघाला तर मी नक्कीच वाचीन .



धन्यवाद .


              
Thank you .कोमल आत्राम रा. येंकापल्ली

भामरागड मधील लोकांचे अवस्था


 

भामरागड तालुक्यात खूप खेडे गाव आहेत. पण खूप दूर दूर आहेत आणि त्याचा गावत चांगला शाळा नाही. ते लोक शिकलेले नाही शिक्षणाचा महत्तव कळत नाही. ते लोक अंधश्रद्धा वर विश्वास ठेवतात. भामरागड मध्ये खूप अंधश्रद्धा माणतात. भामरागड तालुक्यात जास्त शिकलेले नाही. कोणी पहिले पासून शिकलेच नाही.त्याना आयुष्यभर किती त्रास होणार आणि जे लोक शिकलेले नाही. त्यांना आता पसवतात किंवा लूठमार करतात. न शिकलेल्या माणसाना बरोबर हिशोब करता येत नाही. त्यांना कोणीच मदत करत नाही. त्यांचा जीवनात काय अडचीणी आहेत हे आपल्याला माहित नाही. लोकांवर किती अन्याय होत आहे आणि त्यांवर कोणीच आवज उठवत नाही. आता लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरली आहे. भामरागड मध्ये आता कोणकोणत्या गावात वीज नाही आणि चांगली रस्ते नाही. ते पायदल चालतात आणि लोकांध्ये भिती निर्माण होतो.

ते मग काही करु शकत नाही. अशा होऊ नये म्हणून तरुणांनी आवाज उठवला पहिजे. त्यांना मदत केली पाहिजे. त्यांना पण जगण्याचा स्वतंत्र आहे आणि त्यांना पण जगण्याचा हक्क आहे. हक्क मिळवण्याचा त्यांना आधिकार आहे. भामरागडवर राणाऱ्याना वाटत असेल की भामरागड सुधारला पाहिजे. सर्व लोक चांगले पाहिजे अशा प्रत्येकाला वाटते आहे. भामरागड मध्ये दारूबंदी खूप प्रमाण वाठले आहे. ते बंद करायला पाहिजे हे सगळे करायला तरुणांनी प्रयत्न केली पाहिजे.

नाव-रंजना पूंगाटी (वर्ग ९ वा)

गाव-हितापाळी.

 

निसर्ग आणि उत्क्रांती

निसर्ग ही कोणी माणूस निर्मान करू शकत नाही, अशी नाही. जर निसर्ग तुम्हाला आवडत असेल तर ते तुमच्या घराभोवती बनवू शकता, ते कसे बनवायचे हे मात्र तुमच्यावरच आहे.

निसर्ग कोणाला आवडत नाही, ती सगळ्यांना आवडते. निसर्ग म्हणजे आपल्या डोळ्यापुढे येते... मोठे मैदान, हिरवगार गवत, वृक्षावर राहणारी चिमुकले पक्षी, रोपटे, झाडी­­‑झुडपे आणि त्या झुडपातून येणारी प्रकाशाचे किरण, वेली, सुगंधी फुल, रसरसीत फळे, भिन्न आकाराचे पाने, खळखळ वाहणारे नदी, मोठमोठे डोंगरातून पडणारी उंच झरे, व त्या झऱ्याखाली जायची इच्छा निर्मान होते, या सगळ्यामुळे आपली मन शांत होते. पक्ष्यांचे गाण्याची सुर ऐकायला मिळते, तसेच भिती वाटणाऱ्या प्राण्यांचाही डरकाळी ऐकायला मिळते.

कधाचीत नंतर निसर्ग म्हणजे फक्त मनात, कारखान्यातील घाणेरडा पाणी मिसळलेली नदी, काळी हवा, धुरीने झाकलेली झाडाची पाने गाड्याची आवाज अशी चित्र निर्माण होईल, हे आपला भविष्याच निसर्ग असणार जर आपण निर्सगाची निट काळजी घेतली नाही तर.

पुथ्वी ही एकच, सजीव असणारी ग्रह आहे किंवा नाही कारण आपण अन्न खातो, आणि अन्न वनस्पती सूर्याचा वापराने तयार करतात, तर जर दुसरी ग्रहात वनस्पती नसेल तर तिथे असलेले प्राणी डायरेक्ट सूर्याचा उष्णता वापरुन स्व:ताचा शरीरातच अन्न तयार करु शकले असते, तर अंतराळात कुठेतरी जीव असेलच. जरी ती अजुनही आपल्याला भेटला नाही. जर असेल तर ते प्राणी कसे असेल.

आपण विकसित होण्यापूर्वी पाण्यात होतो. हळूहळू किणारावर आलो आणि वनस्पतीचे मुळ जमिनीखाली गेले व प्राण्यावर अनेक बदल घडू लागला.

आपली पुथ्वीचा कधाचीत या विज्ञान तंत्रज्ञानमुळे किंवा मानवाने केलेली प्रदूषणामुळे पुन्हा प्रचंड स्फोट होतील व पुन्हा शांत होतील, तेव्हा आपण जर माकडापासून बनलेले आहोत तर त्यावेळी पुन्हा पहिल्यापासून जीव तयार होतील व ते कधाचीत मांजरापासूनही बनलेले असेल किंवा आणखी वेगळी प्राणीपासुन आणि त्यापैकी कोणती प्राणी जास्त बुद्धीची असेल तीची बाकीच्या प्राण्यावर राज असेलच कारण आज मानव सुद्धा तेच करत आहेत.

माकडाला पाच बोटे होते म्हणून मानवाला सुद्धा पाचच बोटे आहेत. प्रचंड स्फोट नंतर पुन्हा तयार होणारी पुथ्वीत राहणारी प्राणी कधाचित तीन किंवा सात बोटांचे असणार आणि डोळे सुद्धा निळी, पिवळी असतील व तिन किंवा एकच असू शकते, हाताची सुद्धा प्रकार काही असेच असणार, पाय वाकडी-तिकडी, एकच किंवा चार असणार. कान एकच मोठी असणार आणि नाक तिन असू शकतात. त्याचे आकार लहान-मोठी असु शकतात.

- भाग्या मडावी (जिंजगाव)
- वर्ग ९ वा    

झाडे तोडू नेये म्हणून उपाय...



जर आपण लाकडाने भात वैगारे शिजवलं नाहीतर कशाने शिजवायचा आपल्या जवळ तर गॅस, सौरऊर्जा, पवनऊर्जा, इत्यादी नाही आहते. पण  लाकूड न जाळतं एक दिवस उपाशी भात न मांडता राहू शकतो. पण एक आटवडा राहू शकत नाही. तरी पण आपण प्रयत्न केलं तर ते शक्य आहे .त्यासाठी आपल्याला सरकारकडून किंवा स्वतःच्या पैसातून गॅस विकून घेणं मत्त्वाचे आहे. आज जवळ- जवळ सर्व जंगल नष्ट होत चालले आहे. आपण एक उपाय करू शकतो. ते म्हणजे आपण स्वतःच्या बागेत आपले गरजा भागावणारे झाडांना सोडून दुसरे झाड  लावायला पाहिजे. आपण जास्तीत जास्त त्याची देखभाल करायला हवी. आपण उपाय सूचवतो पण करत तर काहीच नाही. आपल्याला ते करायला पाहिजे सिदध करून दाखवयाला पाहिजे आणि सरकारला अशी सांगायला हवी, की जे झाड वाढून गेलेला त्यांच झाडाला तोडन्यात यावी अन्यया दुसरे झांड तोडू नये. आपण सांगायला हवे किंवा जे लोक हिरवेगार झाडांना तोडतात त्याच्यावर दंड घेण्यात येईल असे आयोजन करण्यात यावी .

पाहिआपल्या भारत देशातील कोणीही लोक झाड लावतात. पण ते माणसाला उपयोग असा झाड लावतात . कोणीही लोक असा विचार करत नाही. पक्षीसाठी झाड लावला पाहिजे. असा कोणीही विचार करत नाही. असा मला वाटते आहे पण पक्षीसाठी झाड लावला पाहिजे  असा मला वाटते . जर झाड लावते पण कोण्यसाठी लावते याच्या विचार करते नाही माणसासाठी उपयोग आहे . पण पक्षीसाठी ही उपयोग आहे जर पक्षी नसेल. तर आपल्या देशात पाऊस पडणार नाही. जर माणूस झोपडी किंवा इमारती बांधने राहतात. तसेच आपण जर पक्षीसाठी झाड लावला. तर किती चांगला वाटले. जर आपल्या घर कोणीही तोडांल तर आपल्याला चांगला वाटणार नाही.तसेच पक्षीन वाटते असेल. पण निजीव आहेत. म्हणून काहीच वाटत नाही. कोणीही लोक झाड लावतात. पक्षीसाठी किंवा प्राणीसाठी नाही लावते.लावला जे.          


शाळा चित्रपट

मिलिंद बोकील हा लेखक लहानपणी ज्या शाळेत शिकत होता. त्या शाळेच्या जुनी आठवणी म्हणून एक “शाळा” नावाच्या कादंबरी लिहिली. त्या पुस्तकातून मला आवडणारे आणि मला अनुभावणारे गोष्टी त्या शाळा नावाच्या मराठी चित्रपटात दाखवले आहेत. ते चित्रपट मी नववी वर्गात असताना बघितलं. त्या चिपटात पण नववी वर्गातले मुलं मुलींच्या गोष्टी दाखविले आहे. त्या चित्रपटात जसा चौघे मित्र आहेत. तसा आपले पण मित्र असतात. कोणी हुशार तर कोणी अगदी हुशार नसणारा पण असतात. पण ते एकमेकांना समजुन वागणारे असतात आणि मदत करणारे असतात. म्हणून आपले मित्र आपल्या सारखे वाटतात. आपण त्यांचा सोबत चांगला राहतो. एखादा वेळी आपला मित्र सोडून गेला किंवा मित्र नावाच्या नाता तुटला की आपल्याला खुप दुःख होतो आणि सतत त्याच्याच आठवण येतो. हे मला अनुभावलेला मित्र संबंधाच्या गोष्टी या चित्रपटात मला पहायला मिळाले.

जसा माध्यामिक वर्गांचे मुलं मुलींवर घडणारे गोष्टी म्हणजे मुलांना मुलींच्या प्रेम विषयी आकर्षण वाटतो म्हणून ते वेळ मिळेल तेव्हा तिच्याकडे बघत असतात. व तिला बोलण्याचे प्रयत्नही करत असतात. हे असाच सारखा दृष्या त्या चित्रपटात बघतांना मला कळलं की एका शाळेत किंवा एका कॉलेजात हे प्रेम सबंध नसतो. तर ते त्यांचा वय असल्यामुळे प्रत्येक शाळेत किंवा कॉलेजात प्रेम सबंध असतो हे कळले. व माझा चेहरात आनंद पसरला. त्या चित्रपटातला नववीवर्ग आणि आपल्या नववी वर्गातला सबंध म्हणजे त्यांचा जेव्ह ऑफ प्रेड असतो तेव्हा त्यांना वाटतो की हा प्रेड आता आपल्या इच्छानुसार गेला पाहिजे. पण त्यांना दुसराच विषय शिकवतात.तसेच कधी कधी माझा पण वर्गाचा असाच पोपट होतो. जसे ते सिनेमाचे नावे ओळखण्याचे खेळ खेळतात तसेच आम्ही इंग्लिश शब्द ओळखण्याचे खेळ खेळत होतो. हे मला अनुभवलेला दृष्य बघतांना मला एकदम  आनंद झालं.

या चित्रपटातुन मला असे कळले की मुलींच्या प्रेमात पडले तर आपला मनात किती भाव भावना बदलतात. पण विद्यार्थ्यांनी स्वताःच्या विशिष्ट वयात बघितलेले सिनेमातले हिरो-हिरोहिनचे प्रेम विद्यार्थ्यांच्या मनात ते खोलवर रूजलेली असते.त्यामुळे त्याच हिरो-हिरोहिनचे अनुकरण विद्यार्थ्यी किंवा सामन्य लोकं सुद्धा करतात,आणि त्यांनाही एकादा मुलीवर प्रेम किंवा आकर्षण वाटतो आणि त्या मुलगीच्या जवळ जाण्याच्या प्रयन्त करतात व त्यांच्या प्रेम जुळतो. पण त्या  विशिष्ट वयात प्रेम म्हणजे काय असतं, हेच त्या विद्यार्थांना कळलेला नसतो. विद्यार्थी मुलींच्या प्रेमात पडतात, पण काहीकाळानंतर त्यांच्या मनातून प्रेमाच्या रस निघून जातो.काही काळानंतरच त्यांच्या प्रेम तुटतो किंवा काही घडतो. पण मला हे सर्व मान्य आहे, या विशिष्ट वयात प्रत्येकालाच आकर्षण किंवा प्रेम वाटतो.परंतु मला असा वाटतो की प्रेम ही अतिशय नाजूक भावना असतो. त्यामुळे प्रेम ही भावना एखदा आपल्या मनात खोलवर रूजली की ती आपल्या मनातुन काढणे अशक्य वाटते. दु:खही वाटतो.प्रेम एखदा तुटली की ती जोडता येते, पण जोडलेली प्रेम आधिच्या प्रेमासारख नसतो. त्यामुळे प्रेम ही काळजीपुर्वक करायला हवी.
           

दिनेश हबका (कारमपल्ली)
वर्ग 9 वा

लोक बिरादारी


लोक बिरादारी दावाखान्यात खुप रोगी लोक येतात अर्थातच ते शिकलेले नसतात व त्यांना दावाखान्याबद्दल जास्ता अनुभव नसतो त्यांना स्वत:ला झालेली आजारा बद्दल त्यांना doctor ला माडिया या भाषेने सांगावा लागतो व तिथे तापसणारा doctor राला माडिया समजणे महत्वाचा असतो व त्या नुसार औषध देणे महत्वाचा असतो ही भाषा बोलण्यासाठी लिपी नसतो तो भाषा बोलण्यासाठी सतत ऐकावा लागतो अचूक न समजता ती भाषा बोलली पाहिजे तेव्हा ती भाषा बोलता येते व त्यासाठी सतत बोलावा लागतो ऐकावा लागतो. डाँक्टर ज्या पद्धतीने गोळया  देतात व ज्या वेळेने गोळया घ्यायला लावतात हे रोगी माणसाला समजवून सांगावा लागतो. इथे असणारे डाँक्टर हे प्रकाश भाऊचा मुलगा व सून  आहेत स्वत:चा दावखाना असल्यामुळे तिथे डाँक्टरी करत आहेत. डाँ.दिगंत आमटे आणि डाँ.अनघा आमटे यादोघांना ही माडिया भाषा बोलता येते व ते रोगी माणसांशी व्यवस्थित माडिया भाषेत बोलतात.
लोक बिरादारीत सरकारी डाँक्टर नाहीत कारण ही दावाखाना खाजगी आहे सरकारी कडून फक्ता 1 ते 2 टक्के सवलाती आहेत व बाकीचा खर्चा संस्था भरते. लोक बिरादारी हेमलकसातील दावाखानात दरवर्षी शस्त्रक्रिया शिबीर होते त्या मध्ये अनेक आदिवासी लोक वेगवेगळया आजारासाठी आलेले असतात त्यांचा आँपरेशन भिन्ना मुल्या पैसांनी करतात हा शिबीर Mahindra and Mahindra कंपनी कडून मोफत केला जातो. व शाळेतील मलांना मोफत औषधी देतात. लोक बिरादारी शाळेत शिकणारे मुलांना दावाखानाचा अनुभव असल्याने ते आपले नाते वाहिकांना दावाखानात आल्यावर मदत करतात
    
स्वप्नील मडावी (मु.मोडस्के)
वर्ग 9 वा
 
 

मी वाचलेला कादंबरी बद्दल


       

आम्ही मुले एक एक पाऊल पुढे जाऊया ,
येणारा पिढीच्या भविष्या घडवूया.

लोक बिरादरी प्रकल्पात नेहमी प्रमाने कॉंम्प्यूटर हा क्लास घेतला जातो. त्यात फक्त कॉंम्प्यूटर विषयाच शिकवणे किवा शिकणे इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या विषयावर चर्चा करने,वेगवेगळ्या पुस्तक वाचने त्यावर स्वतःच्या मत मांडणे, याशिवाय पेपर वाचने, कॉमकीनवर बसने, नेटवर आवश्याक माहिती शोदणे, स्कायपवरून बोलने अश्या वेगवेगळ्या पध्दतीने कॉम्प्यूटरच्या आम्ही वापर करतो. आम्ही आमच्या आवडीने कॉम्प्यूटर शिकतो. नूकतेच सरांनी एक कादंबरीच्या पूस्तक आणले या पूस्तकाच्या नाव आहे शोद यात १९६० पासून गोष्टाला सुरवात होतो. त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळ होतो. पुस्तक वाचल्याने फक्त ज्ञान वाढते इतकेच नसतो. त्यापासून आपल्याला नविव शब्दांच्या अर्थ कळतो, वेगवेगळ्या माहीती मिळतो. तर पाऊया या शोद कादंबरीत काय आहे.
गोंदाजी नारो हा शिवाजी महाराजांच्या काही तरी माहिती त्यांच्यापर्यत पोहचवण्यासाठी जीवाचा परवा न करता तो धावत सुटतो. मध्येच मुघलांच्या ताब्यात सापाडतो.

साहील नावाचा मुलगा तो कॉम्प्युटरचे इंजिनीयर असतो. त्याला पहाडावर दोरीद्वारे चढायला लहानपणापासुन आवड होती. परंतु विकीने साहीलला सालेरी कील्लावरून ढकलून दिले.
केतकी ही मुलगी सतत खोट बोलते, खोट बोलणं, खोट नावाने काम करणं, वेळ प्रसंगी कसे त्यापासुन सुटका व्हायचे या सर्व शिक्षण आधिच केतकीचे काकांनी केतकीला दिले होते. केतकी, शौनक, क्लारा, निनाद हे चौघे मित्र असतात. यांनी हरवलेला इतिहासाच्या शोद घेतात. यांना इतिहासाच्या खूप आवड असतो. यांच्यामधुन विकीने क्लाराचा खून करतो. या खुनेच्या केस या तिघ्यांवर टाकून देतात. या तिघ्यांमधून पोलीसांनी निनादला अटक करतात.

स्कायलर कंपनी या कंपनीचे मालक आबाजी आहेत. या कंपनीने सूरवातीला दारू पासून तर आता शिवाजी महाराजांचे सुरात लूटीचे खजिन्या शोदायला सूरवात केलेला आहे.
मला हा कादंबरी संपूर्ण वर्णन, इतिहास, रहस्य, केतकीच्या हूशारीपणा, खोटेपणा अशा कादंबरी मी पहीलांदा वाचली म्हणून खूप आवडला. पूस्तक वाचत असतांना सारखा पूढे काय होणार हेच विचार यायचे. पेपर सूरू झाले तेव्हा तर मी म्हणात होती की, आता पूढच्या गोष्ट वाचायला मिळणार नाही. हेच विचार मनात यायचे. पूस्तक वाचतांना केव्हा केव्हा कंटाळा पण यायचा तर केव्हा केव्हा मज्ज पण यायचा.
 
- सुनिता वाचामी (कारमपल्ली)
 वर्ग ११ वा
 

हरवलेल्या खजिन्याचा " शोध "

आमच्या संगणक वर्गात  ' शोध ' नावाच्या कादंबरीचं अभिवाचन सरांनी केलं, आम्ही रोज रात्री ऐकत होतो. ते कादंबरी १६६० साली शिवाजी महाराजांचा सुरत लुटीच्या काही हरवलेल्या खजिन्याचा शोध घेण्यात लिहिलेल आहे.
 
त्यात अस आहे की एकीकडे केतकी शोध लावते तर दुसरीकडे बलढया शक्तीचा आबाजी आहेत हेएकमेकांचे शत्रुच आहेत. केतकीला दोन मित्र आहेत पण तेही इतिहासात आवड असणारे पण केतकी मात्र खोजणार आहे.
इकडे आबाजी मात्र केतकी व तिचे मित्र काय काय करतात हे लपुन माहिती मिळवत ते हे कळलामुळे ते कुठे कुठे जतात तेही माहिती मिळवायचे आणि एका ब्रिटिश तरुणीचा खुनाच  त्याच्यांवर खोट आरोप लावुन पोलिसाना पकडण्यास सांगितले त्यातच आभजी राजकारनात असल्यायुळे ते शक्य झाल.केतकी सोबत आता शौनक होता पण ते दोघ पोलिसांच्या हाती सापडले नाही ते हुशार होते त्यातला त्यात केतकीला वेळ आली तर काय काय करायच हे तिला तर ट्रेनिंग  दिलेलच होत त्यामुळे ती कोणत्याही काम करायला घाबरत नव्हती अशी ती धाडसी होती.
 
असं झालं की आबाजी जे शोधतात त्यातलं केतकीला काय हवंय हे मात्र माहित नाही पण आबाजी मात्र त्या शौनक व केतकीला पकडण्यास अगदी जवळ पोहोचलेले आहेत. पण यांनीही त्यांच्या कामत अगदी शेवट पोहचलेल असल्यामुळे केतकीचे डोळे तर रात्रीपण चमकत असे पण आभजीना मात्र ते दोघ आपल्याहुन पुढे आहेत म्हणुन कळल आहे. शौनक व केतकी हे पोलिसांच्या हाती सापडतात का ? जर नाही सापडले तर खजिना कोणाला पाहिले सापडेल हे वाचण्याची खुप उत्सुक्ता आहे.
 
सुरुवातीला तर गोष्टी ऐकताना कधी कधी बोर वाटतं पण आता शेवट असल्यामुळे असं वाटतं की आज आता वाचावं. झाल अस आमचा सामाईक परिक्षा असल्यामुळे वाचन थांबवल होतो. पण परिक्षा झाला नंतर ते पुस्तक वाचलं, मला लक्षात आलं की ज्यांच्याकडे कितीही शक्ती आपल्या पाठीशी असली तरी त्यांनी जर योग्य मार्गाने वापर केला नाही तरते कधीच शक्य होणार नाही. म्हणजेच आबाजीकडे खुप शक्ती व साधन असूनही त्याना जे कामकरायचे होते ते काम शक्य झालच नाही. ते खोट कारणाने माहिती देत आले पण शेवट मात्र जे घडणार होत तेच घडलं.

- डिंपल  कुरसामी  (मु. हिनभट्टी)     
   वर्ग  ९ वा

शिकार

आदिवाशींच्या शिकारी करण्याचा उद्देश म्ह़णजे एक तर खाण्यासाठी आणि गावाच्या एखाद्या माणूस मेला तर त्याच्या शोध घेण्यासाठी शिकारी करावी लागते. जर शिकारीवेळी कोणत्याही गर्भाशाही मादी प्राणी भेटलं असेल तर  त्या माणसाला कोणीतरी जादू केली आणि त्यामुळे तो माणूस मेला असे समजूत काढतात. जर प्राणी भेटलं नाही तर पुन्हा पुजारी केली जाते आणि परत शिकारीला जंगलात जातात. हे प्रकरण पुजारी लोक सांगत असतात. हे आदिवाशींच्या रूढीपंरपरेच्या अंधश्रद्धा आहे.

आता आपण शिकारी कशी केली जाते याची माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम गावकरी लोक संध्याकाळी एकत्र जमतात. त्यामध्ये गावाच्या मुख्यमाणुस पाटील असतो. ही सभा गावाच्या गोटुलात किंवा चौकात बसली जाते. त्यामध्ये गावकरी लोक एकमेंकाच्या विचार आणि मते व्यक्त करत असतात. मते ठरवत असताना मात्र काही गोष्टींची विचारत घ्यावा लागतो. ते म्हणजे शिकारी करायला कोणत्या बाजूकडे जायचा. शेवटी कोणत्या ठिकाणाहून परत यायचं. सकाळी किती वाजता निघायचं इत्यादी गोष्टींची विचार केली जाते.

शिकारीला जाण्यासाठी एका घरातून फक्त एक व्यक्ती किंवा त्यापेक्षा कितीही गेल तरी चालेल. जर एका घरातून एकही व्यक्ती शिकारीला गेले नाहीत तर त्या घराच्या व्यक्तीकडूंन दंड घेतली जाते. म्हणून प्रत्येक घरातून एकतरी व्यक्ती शिकारीसाठी जात असतो. सकाळी शिकारी जाण्यापूर्वी प्रत्येकाच्या घरी जेवण बनवली जाते. कारण शिकारीला जाणाऱ्या लोकांसाठी . काही माणसे जाताना जेवणाचा डबा , कुऱ्हाड आणि पाणी पकडतात. शिकारीला जाण्यासाठी मात्र स्त्रियांनाही परवानगी असते. नंतर ठरवलेल्या वेळेनुसार शिकारीला जातात. मात्र सोबत कुत्रे नेत नाहीत. महत्त्वाचा सुचना म्हणजे कोणीही जोरजोरात ओरडायचं किंवा जोरात गोंधळ आणि बोलायचं नसते.

शिकारीसाठी मोठी जाळी बनवली जाते. अशा प्रत्येक गावात चौदा किंवा पंधरा जाळे असतील. जाळे लावण्यासाठी बांबूचे मोठे काठी बनवलेले असतात. सोबत एक भाला घेतात. जाळ्याचा उपयोग शिकारी करण्याचा दोन पद्धती आहेत. १)यामध्ये position जसे पोलीस पूर्णपणे शुत्रांना घेर लावतात त्या प्रकारे असते. ज्या जागेत आपण शिकारी करणार आहोत, त्या जागेला माडीया भाषेत गुंदा असे म्हणतात. गुंदा म्हणजे विविष्ट अशा खुप अंतरवरचा गोल जागा होय. पहिल्या पद्धतीमध्ये संपूर्ण माणसे गोल करतात. एका बाजूला मात्र जाळे लावतात. जाळे लावतांना मात्र दोन जाळी एका ठिकाणी आडवे बांधली जाते. अशा काही दोन दोन जोडी जाळी विविष्ट अंतरावर बांधली जाते. दोन जोळी एका ठिकाणी बांधली जाते. त्याला माडिया भाषेत (हुंदीओंढोळ)असे म्हणतात.हुंदी ओंढोळ म्हणजे दोन जोडी होय. आणि पूर्णपणे माणसे गोल केली जाते. मध्ये कोणता प्राणी आहे की नाही हेच कळत नाही. काही सात-आठ माणसे जाळी लावलेल्या जागेकडून जिकडे माणसे पूर्णपणे गोल केले असते. त्या दिशेला आवाज करत जातात. जर मध्ये प्राणी उठला तर गोल केलेल्या माणसांना ओरडायला मिळतो. मात्र जाळी लावणाऱ्या माणसांना ओरडायला भेटत नाही. त्यांना मात्र चुपचाप राहवा लागते. गोल केलेल्या माणसांनी जर जास्त ओरडले तर प्राणी पूर्णपणे घाबरून जातो. प्राणी घाबरून गेल्यामुळे मधुन जाणाऱ्या माणसांच्या विरूद्ध दिशेने प्राणी सरळ जिकळे जाळी लावले आहेत. त्या दिशेला पळत सुटतो. त्यामुळे प्राणी जाळीवर पडू शकतो. या पद्धतीला माडिया भाषेत (होल्ले)असे म्हणतात.

दुसरी पद्धत म्हणजे एका साईटला जाळी लावली जाते. दोन कि.मी इतक्या अंतरावर जाळे लावले जाते. यामध्ये गोल करत नाही. यामध्ये माणंसाची position आडवी असते. म्हणजे सगळे माणसे आडव्या पद्धतीत विविष्ट अंतरावर उभे राहून ज्या साईटला जाळे लावली आहेत. त्या दिशेला आवाज करत किंवा ओरडत-ओरडत चालत जातात. जर मध्ये प्राणी उठला तर  तो प्राणी सरळ जिकडे जाळे लावले त्याच दिशेने पळते. पण केव्हा–केव्हा उलटाही धावण्याची शक्याता असतो. सरळ प्राणी धावला म्हणजे ते जाळीवर पडू शकतो. पण एक–एक वेळ प्राणी  पळून जातो. तेव्हा मात्र लोक खुप चिडलेले असतात. ज्या व्यक्तींमधून प्राणी पळून गेला तर त्याला खुपच शिव्या  देतात. बहुतेक लहान मुलांना शिव्या देत नाही. परंतु मोठ्या माणसांना तर नक्कीच.

शिकारी करण्यासाठी गावातून खुप लांब जात असतात. केव्हा–केव्हा हरवण्याची शक्यता असते. तिकडे थोडा सात– आठ मिनिटांचा आराम मिळतो. तेव्हा जाळी पकडलेले माणसे आणि बाकीचे माणसे एकत्र भेटतात. तेव्हा जाळी कोठे-कोठे लावायचा आणि कितक्या अंतरावर लावायचा याची मॅनेजमेंट केली जाते. सायंकाळी वापस घरी येतात. जर एखादा प्राणी शिकार झाला असेल. तर त्या प्राण्याला गावात आणतात. परंतु त्या प्राण्याला गावाबाहेरच ठेवतात. प्राणी ठेवलेल्या जागेवर रखवली म्हणून दोन–तीन माणसे ठेवतात. बाकीचे माणसे अंघोळ वगैरे करुन येतात. येथे मात्र स्त्रियांना यायला देत नाही. प्राण्याला कापतात. कापल्यानंतर मासाचे लहान–लहान तुकडे केली जाते. नंतर शिकारीसाठी आलेले माणसे मोजली जाते. त्यानुसार पत्रवळे टाकली जाते. पत्रवळ्यांवर मासाचे लहान तुकडे टाकली जाते.त्यानंतर प्रत्येक घरातून किती व्यक्ती शिकारीला आली होती. त्यांची मोजणी केली जाते. त्यानुसार पत्रवळावर ठेवलेली मास देतात. ज्या व्यक्तीचा जाळीवर प्राणी पडला त्याला मात्र प्राणीचा एक किलो वजनचा मासाचा तुकडा हिसा म्हणून दिली जाते. आणखी तिकडून प्राणी आणलेल्या
केतन मडावी (मु. बोटनफुंडी)
वर्ग 09 वा

भामरागड तालुक्यातील लोकांचे जीवन

मी या भामरागड तालुक्यात राहते. भामरागड म्हटलं की सर्वांचा डोळ्या पुढ जंगलच उभ असतं. तरी पण मी या जंगलात राहते. म्हणून मला खूप अभिमान वाटते. 

या भागात आदिवासी लोक राहतात. या भागात खूप जंगल आहे. या जंगलात वेगवेगळया प्रकारचे झाडे आढळतात.भामरागड तालुक्यात लहान-लहान खेडे गाव आहेत. या खेडे गावातच आदिवासी लोक राहतात.इथले लोक कसे राहत असतील? ते काय खात असतील? ते कोणते भाषा बोलत असतील ? अशा प्रश्न कोणालाही पडू शकतील.तर स्त्रिया अंगावर साडी, लुगडा नेसतात. तरुन मुली सलवार घालतात. पुरुषांनी पॅंट, धोतर, शर्ट हे वस्त्र वापरतात. पशुपालन, शेती, कुकूटपालन हे व्यवसाय करतात. या भागात जास्त प्रमाणात शेती हे उत्पादन केली जाते. त्याचबरोबर मकाचेही उत्पादन केले जाते. इकडचे लोक माडिया, गोंड, हलबी, गोंडगोवारी अशा प्रकारचे भाषा बोलली जातात. या भागातील लोकांना सगळे दिवस सारखेच असतात. इकडचे लोक जास्त अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत होते. 

पुर्वीचे लोक दररोज शिकारी करायला जंगलात जात होते. जर एखादी प्राणी भेटला की त्यांना खूप आनंद व्हायचा. नंतर मग सर्व लोक एकत्र  येत होते आणि स्वयंपाक बनवत होते. नंतर  जेवन करायचे आणि रात्री नाचतं अशा प्रकारे मनोरंजन करत होते. काही वर्षानंतर आदिवासी लोकांना कळायला लागला की बाहेरचे लोक कसे राहतात? त्यांना बघून हळूहळू बदलत गेले. या भागात शिक्षणाचा प्रसार झाला. तरी पण यांना शिक्षण म्हणजे काय ? हेच कळत नव्हता. तरी पण नंतर हळूहळू इकडचा लोकांनी आपआपल्या मुलांना शाळेत घालू लागले . अशाच प्रकारे प्रत्येक गावातील मुल शाळेत शिकायला जावू लागले. शाळा शिकून या भागातील आदिवासी लोक बदले. तरी पण अशिक्षित लोक जास्त आहेत.  

या भागातील लोकांना खूप अडचणी येतात. इकडचे रस्ते चांगले नाही .आणि गावांच्या जवळपास दवाखाना नाही. जर एखद्या गावातील माणूस आजारी असला. तर त्याला प्रथम पुजारीकडे घेवून जातात. तो आजारी माणूस बर झाल्या नाही . तर त्याला दवाखानात घेवून जायचे म्हंटल तर दूर-दूर अंतरावर चालात न्यावा लागत होते आणि पावसळ्यात तर खूपच अडचण येतात. कोणकोणत्या गावाला तर नद्या ओलांडून न्यावा लागतो. जर एखादी दिवशी खूप पाऊस आला तर नद्या पूर्ण  भरलेले असेल तर एक-दोन दिवस नद्यांन मधल्या पाणी उतरतच नाही. जर आजारी माणसाजवळ गोळ्या  औषध नसेल तर तो मेलाच समजायचा कारण नद्याना पूल बांधलेला नाही. लोकांना एवढा अडचणी येतात. तरी हे लोक कोणालाही तक्रार करत नाही.मला असा वाटते कोणालाही न घाबरता .जे शिकलेले लोक आहेत .त्यानी तक्रार करायला पाहिजे. असाच चुप बसून काही उपयोग होणार नाही. जे शिकले नाही  त्या लोकांचे काही  प्रश्न किंवा अडचणी असतील .ते आपण समजून घ्यायला पाहिजे.
 * धन्यवाद *
मंजु मडावी (मु .इरपनार)
वर्ग 0९वा



आदिवासींच्या शोषण

मी महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यात छोट्याशा आदिवासींच्या गावात राहणाऱ्या एका आदिवासी बाईनी मला जन्म दिल आहे. मी आदिवासींच्या पोटातून जन्माला आलो म्हणून मला थोडा तरी द्वेष वाटत नाही. मी या आदिवासींच्या भागात आहे म्हणून मला समाधान वाटते, मी पुण्य झालो.मी या जंगलाची व या आदिवासी संस्कृतीची लाभ आहो.


मी आदिवासी संस्कृतीच्या लाभ घेतला मला असे आढळून आले की, आदिकाळात आदिवासी मानवांनी त्यांच्या डोक्यात जे काही प्र9श्न उमटत होत्या, त्या प्रश्नांची उत्तरे त्याकाळी विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकास झाल्या नसल्यामुळे किंवा नीरक्षरतेमुळे त्याना सहाजासहजी मिळत नव्हत्या. त्यामुळे ते आपल्या डोक्यातील प्रशनाची तान कमी करण्यासाठी ते आपल्याला जसं वाटत होतं, तसे ते खरे नसताना सुद्धा समाजापुढे मांडली, आणि तीच प्रशनांची उत्तरे आज समाजामध्ये जसाच्या तसाच रुढ झाली आहे. सर्व आदिवासी लोक त्याच मांडलेल्या उत्तरांच्या, विचारांच्या, भावनांच्या वापर करुन आपल्या कामे पुर्ण करतात. या सर्वांच्या दुष्परिणाम लोकांच्या समोर होत असताना देखील ते त्याच रुढी-परंपरेचा वापर करतात. यासर्वांमुळे आदिवासी समाजात अंधश्रद्धा वाढत जातना माझ्या डोळ्यांना दिसते.


आदिवासी समाज हा अंधश्रद्धे मुळे गोंधळून गेला आहे. तरी पण मला अजून माझ्या डोळ्यांना दिसलं नाही की गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींना अंधश्रद्धेपासून मुक्त करावी म्हणून अंधश्रद्धा होणारा. अंधश्रद्धेमुळे चांगल्या तरुण-तरुणींची शिक्षण मोडते. स्त्रियांना कमी स्थान प्राप्त झालेलं दिसतं, या आदिवासींच्या रुढीपरंपरेमुळे स्त्रिला स्व:ताच्या घरच नाही. ती सासऱ्यातुन माहेरी गेली, की माहेरीवाले राहू देत नाही. सासरीत काही चूक झाल्यास तीला घराबाहेर अकलून देतात. तिला आपल्या घरी संपत्ती वाढवण्याची व आपल्या मुलंबाळांला आपल्या पायांनी उभ्या करण्याची खुप उत्सुक्ता असते. पण काही करील बिचारी तिला स्व:ताच्या मालकीची घरच नाही. या सर्वांमुळे समाजातील स्त्रिया गोंधळून गेल्या मी पण सर्व प्रकरणं पाहून गोंधळून गेलो.


मी माझ्या गावात आदिवासींच्या लग्न नेहमी बघतो. पण मला लग्न बघून दु:खच वाटतं. घरी लग्न जेव्हा असतं. तेव्हा घरातील सगळं संसार घरचे मालकबघू शकत नसतात, त्यामुळे  गावकऱ्यांवर विश्वास ठेवून तो मालक आपल्या संसारत असणाऱ्या कामे त्या गावकऱ्यांवर सोपवतात, पण गावकऱ्यांनी त्या मालकाच्या संसारस चोर-लुटारी करुन त्याच्या नील बनतात. तो बिचारा आपल्या पोराच्या किंवा पोरीच्या लग्न करुन पुर्ण नीलच बनतो . तो आपल्या पोरा पोरीच्या लग्न चांगल व्हाव म्हणून अनेकांकडून विविध प्रकरच्या संपत्ती मागवलेला असतो. गावकऱ्यांच्या धोक्यामुळे व संपत्तीच्या परतपोडीमुळे तो गोंधळून जातो, आण आत्महत्याला सामोरे जातो. बिचारे त्याचे पत्नी-मुलं-बाळं वाऱ्यावर असतात. हे सगळं प्रकरणं पाहून सला खंरच माझ्या डोळ्यात पाणी येते.


मला माझ्या आदिवासी समाजाविषयी कुठेही बोलायला लाज वाटत नाही. कारण माझ्या जर आदिवासींना सुधरवायचं असेल. तर आपण एकटे सुधरवू शकत नाही. एक-दुसऱ्याची मदत घ्यावीच लागते. त्यामुळे आदिवासी समाज कसा आहे ? हे सर्वांसमोर मांडणे अत्यंत आवश्यक आहे. समाजाची स्थिती बघुनच लोक मदतीला पुढे येतात.               


महाराष्ट्रातील आदिवासींच्या जिल्ह्या-म्हणून नंदुरबार-व गडचिरोली या दोन जिल्ह्यांना ओळखली जाते. या दोन जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या प्रमाण अतिशय जास्त आहे. त्यात मी पण एक आदिवासी आहे.माझ्या या गडचिरोली जिल्ह्यात व नुदुरबार जिल्ह्यात साक्षरतेची प्रमाण अतिशय कमी आहे, म्हणूनच आदिवासीं अंधश्रद्धेत गुंतून आहेत. पण माझ्या आदिवासींना जे लोक कमी समजतात, त्यांचा मला खुप राग यातो. कारण माझ्या पण आदिवासींच्या काही ना काही कौशल्ये असतात आवडी-निवडींमध्ये व कौशल्यांमध्ये पठाईत असतात, हुशार असतात, तर त्यांना कमी समजण्याची कारण तरी काय ? कमी समजण्याऱ्यांना पण त्यांना आवडलेली व नीवडलेली गोष्ट जमते, पण सगळ कोणालाच जमणे कठीण आहे
                                                                         

   *धन्यवाद *

  -  बालाजी आत्राम (मु. बेजूर)
      वर्ग 09 वा

राजकारण

ज्या वेळी निवणूकी पोहचतात.त्यावेळी नेते लोक या आदिवासी विभागात येतात. जेव्हा त्यांना निवडून यायच्या असतो.त्यावेळी ते गावातील लोकांना म्हणतात की,आम्हाला निवडून द्या.आम्ही तुम्हाला तुमच्या विभागाला विकसित करून देणार आहोत. तुम्ही आमच्याकडे व्होट द्या असे म्हणतात.या आदिवासी विभागात त्या आदिवासींच्या अशिक्षितमुळे त्यांना फसवतात.त्याच्या हातात शंभर रूपये देतात.आणि त्या आदिवासी लोकांना आमच्याकडे व्होट टाका असे म्हणतात. त्या आदिवासीना शंभर रूपये भेटात असल्यामुळे त्यांच्या बाजूने व्होट देतात.
ज्यावेळी आमदारांसाठी निवडून येतात.त्यावेळी ज्या लोकांनी व्होट दिले त्या लोकांच्या गावात येणे सुद्धा विसरतात.त्याच्या असाच असतो. जेव्हा पर्यंत आपल्याला लोकांनी निवडून देत नाही. तेव्हा पर्यंत लोकांना नमस्कार करायचा.निवडून आल्यानंतर ते म्हणतात की, तुमच्या विभागाचा विकास करणार.असे फक्त त्या आमदार लोकांच्या तोंडातून शब्द निघतय. पण ते काही कार्यामधून दिसत नाही. आपल्या देशातील या नेता लोकांच्या हाच प्रॉब्लेम आहे. जर आपल्या विभागाचा असाच लुट करणारा राजकारण असल्या तर आपल्या देशाच्या किंवा आपल्या विभागाचा कधिच विकास होणार नाही. जर विकास करायचा असेल तर या सर्व नेता लोकांचा भ्रष्टाचार मिटवून द्यायला पाहिजे.काही नेता लोक फक्त संपत्तीसाठी नेता बनतात.जर आपल्या समाजाचा विकास करायचा असेल तर या नेतांच्या चुकीच्या गोष्टी सुधारणा केली पाहिजे.
आपल्या देशाच्या नेता लोकांच्या अत्यंत वाईट स्थिती आहे. नेता होण्यासाठी ते काही पक्ष तयार करतात. त्या पक्षांमधील लोकांना अशा वाटते की आपल्या पक्ष निवडून याव्हा.यामुळे त्या पक्षांमध्ये वाद निर्माण होते. त्यामुळे देशाच्या किंवा समाजाचा विकास होत नाही. या सर्व गोष्टीमुळे समाजामध्ये वाद निर्माण करून देतात.आणि व्होट मिळवण्यासाठी प्रयत्न करतात.

- विलास वेलादी (मु. चंद्रा)
  वर्ग १० वा

आदिवासी लोकजीवन

आदिवासी लोक म्हंटले तर डोळ्यासमोर जंगलाच उभा राहतो. या भागात खूप जंगल आहे. मी या जंगलात राहते. या गोष्टीचा तर मला खूप आनंद होतो. कारण सुध्दा हवा ,मोकडेपणा, जिकडे-तिकडे शांतच शांत किती बंर ना ?असो, या भामरागड तालुकात वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात. माडीया, गोंड, हलबी, या सर्व लोक शेती करतात. त्यानां कोणतेच दिवस सुट्टी नसते. सगळे दिवस सारखेच असतात. होळी हा सण झाल्या नंतर सर्व लोक शेतात मोह वेचतात व ते सगळे रोजचा रोज मोह वाळवतात. आणि पूर्ण मोह पडण्याचा संपत आले की ते सर्व एकत्र जमा करून पुन्हा एकदा वाळवतात. आणि ते मग गरम-गरम मोह एका ढोममध्ये कुदून ठेवतात. जे नविन मोह असतात . ते मोहच कोणीच पहिलेच दारू काढत नाही.आणि भाजून खात नाही. गावातील सर्व प्रत्येक घरातून थोड-थोड मोह एकत्र जमा करतात. आणि दारू काढण्यासाठी जमा केलेले मोह मडक्यात भिजवून ठेवतात. दोन दिवसानंतर भिजलेले सर्व मोहांना चुरा-चुरा करतात. आणि दुसऱ्या दिवशी मग गावातील सर्व लोक एकत्र दारू काढतात. अर्ध मोह भाजतात. आणि गावातील सर्व लोक संध्याकाळी एकत्र जमतात. आणि भाजलेले मोह खातात. आणि दारू थोड-थोड वाटप करतात. आणि मग दुसऱ्या दिवसापासून ज्यांच्य ते दारू काढतात. म्हणजे नविन मोहाच गावातील लोक एकत्र दारू काढणं, ते मोह भाजून खानं या प्रकरणाला आम्ही माडिया भाषेने (भुंरीग) करणे असे म्हणतो.हे आम्हचासाठी एक पुजाच असते. नंतर मग सर्व लोक शेतात कटाई करतात.नंतर लाकडे जमा करतात, शेतात सुधारणा करतात,तेंदूपत्ता तोडतात. तेंदूपत्तापासून मिळालेला पैसे ज्या दिवस देतात, त्याच दिवस दिसतात दुसऱ्या दिवस मग दुसऱ्याचा हाती जातात.
 
आमचा आदिवासी बाह्या  मासिकपाळीला झाल्या तर त्यांना घराबाहेरच राहावे लागते. माझ्या गावातील बाह्या मासिकपाळीला झाले तर घराच्या सर्व काम करतात. पण घराच्या आत जात नाही. आमच्या भागातील काही गावामध्ये तर मासिकपाळीला झालेली बाह्या घराच्या आत तर राहत नाही पण गावातसुद्धा राहत नाही.  मासिकपाळीला  झालेल बाह्यासाठी गावाबाहेर घर केलेले आहे. त्यांना दररोज घरातून जेवन द्यावा लागतो. आणि काही गावांमध्ये तर एखादी मुलगी मासिकपाळीला पहिल्यांदा झाली तर तिला कोणताच पुरुषाला दाखवत नाही. ज्या दिवशी ती आंधोळ करून घरी येते. त्या दिवशी गावातील सर्व बाह्या येतात. आणि तिच्या पुजा करतात. जसे काही लोक वाढदिवसाला नविन भेटवस्तू देतात. तसेच तिलाही नविन-नविन भेटवस्तू देतात.
 
आमचा या भागात उन्हाळात लग्न होतात. शहरतले लग्न आणि आमचाकडचे लग्न यात खूप फरक आहे. आमचाकडचा लग्नमघ्ये पहिल्यादा मुलांचे घरचे लोक मुलीचा घरी जातात. आणि आडनाव काय? तिच्या जात कोणता ? ती किती देवाची आहे ? हे सगळं माहित झाला तरच मग लग्न करायचा की नाही हे ठरवतात.जरी ते दोघे प्रेम करत असले तरीही. मग तीन-चार दिवसानंतर मुलीचा घरचे लोक मुलाचा घरी जातात. आणि पुन्हा काही दिवसानी मुलाकडचे लोक मुलीचा घरी जातात. आणि गावातील काही लोक त्या दोघांना काही प्रश्ना विचारतात. आणि मग लग्नाचा दिवस ठरवतात. त्या दिवशी गावातील सर्व लोकांना जेवन द्यावा लागतो. आणि त्या दिवसापासून ज्यांच्या घरी लग्न आहे. त्याच्या घरी गावातील सर्व लोक नाचयला जातात. रात्रीचे 9 वाजेपर्यंत तरी नाचावा लागतो. असे दररोज लग्नाचा दिवस येईपर्यंत नाचावा लागतो. लग्नाचा दिवस आले की पहिल्या दिवस जमलेले लोकांना भाजीपाला व वरण याचाने जेवन द्यावा लागतो. दुसऱ्या दिवस मग चिक्काण ,मट्टण व भाजीपाला याचाने जेवन द्यावा लागतो. आणि मुख्या म्हणजे लग्नाचा दिवशी दारू, मट्टण, चिक्कण असावेच लागतो. लग्नासाठी येणारे सर्व लोक  तांदूळ ,दारू,साखर, तिकट, हळद, मीठ,तेल आणि पतत्रळे इत्यादी वस्तू नेतात. आणि लग्न करण्याचा पद्धती तर शहरतले लग्नपैक्षा खूप वेगळा असतो. लग्न दोन दिवसाचा असते. म्हणून एक दिवस सर्व लोक जमतात. आणि दुसऱ्या दिवशी लग्न असतात. ज्या दिवशी सर्व लोक जमतात. त्या दिवशी लग्न करणाऱ्या मुलीला गावातील बाह्या तिला नदिवर मासे पकडयला नेतात. मासे जर मिळल्या तर तिच्या सर्व मैत्रिनीना बोलावून त्यांना जेवन द्यावा लागतो. आणि तिला संध्याकाळी देवात नेतात. आम्ही ज्या देवळाला माडीया भाषेने (पोचेम)म्हणतो. त्या दोवळात जातांना सर्व जण नाचत जातात आणि तिथून येतांनासुद्धा नाचत येतात. देवळात जातांना ती लग्नाला लावणारे सर्व सामान देवळात नेतात. त्या देवळात तिला कडेवर घेऊन फिरतात. आणि जो तिला कडेवर घेऊन फिरतो. तो तिला भाऊजी लागणारा व्यक्ती असायला हवा. रात्र मग तिला सर्व बाह्या मांडीवर घेऊन गाणे शिकवतात.आणि दुसऱ्या दिवशी मग लग्न असते त्या दिवशी मग मुलांकडचे लोक मुलीकडचे लोकांना विचारतात कि, तुम्हाला काय काय हवा आणि किती. तेव्हा मलीकडचं लोकांना काहिना काही वस्तू घ्यावाच सागतो. तेही एका मर्यादापलीकडचेच पैसे असेल तर पाच दहा रुपये व तांदुळ असेल तर एक दोन ओंजळभर घ्यावा लागतो. आणि ज्या लोकांना कडते, समजते व आपल्या मुलीबद्दल प्रेम असते तेच लोक एवढं  वस्तू घेतात. ज्या लोकांना आपल्या मुलीबद्दल प्रेम नसते किंवा तिच्या भविष्यात होणारा त्रास ज्यांना कडत नाही. ते लोक मग हवा तितका पैसा, हवा तितका तांदूळ व हवा तितका कोणत्याही वस्तू घेतात.मग त्यांच्या लग्न करतात. लग्नात सर्व लोक त्यांना नविन संसारासाठी नविन-नविन वस्तू देतात. लग्नाचा दिवशी संध्याकाळी त्या दोघांना एकाच ठिकाणी गावाताल बाह्या अंधोळ घालतात. त्यात पण खूप गंमत असते. त्या दोघांना एकमेकांचा अंगावर पाणी ओतायला लावतात. आणि त्या दोघांना एकाच ब्रशने दात घासयला लावतात. पहिल्यादा मुलगा घासतो आणि नंतर त्याच ब्रशने मुलगीला घासयला लावतात. हे तर झालाच पण त्या दोघांना एकमेकांचा तोंडात थुंकायला लावतात. काही-काही मुली तर चेहऱ्यावर थुंकून देतात. हे सगळं त्यांना करायवच लागतो.आणि बाह्या ते करूनच घेतात. हे सगळं मी स्वत: बगितली.  
 
माझ्या गावाला एखाद्या व्याक्तीचा मृत्यू झाला . तर त्याचा सर्व नातेवाईकांना बोलवतात. आणि जर त्याचे सर्व नातेवाईक फोचलेले नसतील. तर त्याला एक दिवस असाच ठेवतात. आणि गावातील सर्व लोकामधून प्रत्येक घरातून एक जण त्याचा रखवली करायला जातात. जर एखादी व्यक्ती खूप आजारी असून मृत्यू झाला.तर त्याचा नातेवाईक फोचलेले नसले तरीही जाडतात. आणि आजारी नसतांना मृत्यू झाला तर त्याला मातीत दफान करतात. आणि दुसऱ्या दिवसी मग सर्व जण त्याच जागेत जाऊन पूर्व दिशेला सपाट आणि मोठ असा दगड ठेवतात. व तांदूळ आणि वालेचे शेंगा यांचा मिश्रण करून एका टोपलीत ठेवतात. मग आलेले सर्व जण आपल्याला हावा तेवढा पौसा आणि मिश्रळलेले तांदूळ त्या दगडात टाकतात. आणि ते सर्व जमा करून त्यांच घरचाना देतात.  
 
  संगीता विडपी ( मु. हिदूर )
 वर्ग 9 वा
 

भामरागड तालुक्यातील भ्रष्टाचार


भ्रष्ट म्हणजे लुबाडणे. आपण गडचिरोली जिल्ह्यात राहतो. या भागाला नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखले जाते.या भागात आदिवासी लोक राहतात. आदिवासी हे या भागातले रहिवासी. आपण जंगल, डोंगर आहेत अशा भागात राहतो. लोक आनंदाने जीवन जगतात. पण या भागात भ्रष्टाचार केला जातो हे लोकांना माहित नाही. हे आपल्याला जाणुन घ्यायला नको का? 

  

     आपल्या भागात अनेक गावात अनेक सुविधा पुरवल्या जात नाहीत. ते का पूरवल्या जात नाही? भामरागड

तालुक्यातील काही दुर्गम भागातील गावात वीजेची पुरवल्या नाहीत, तेथील लोकांना वीजेची आवश्यक नाही का?

लोकांना सुविधा न पुरवल्या जाणाऱ्याची कारणे काय? लोकांसाठी जे सुविधा उपलब्ध होते पण ते पुर्णत: का करीत नाही? या मागील कारण काय? कोण असे करीत असतील? याची कारण म्हणजे भ्रष्टाचार आपल्याला उपलब्ध होणाऱ्या सुविधा पुरवण्याऐवजी लोक कमीत कमी सुविधा उपलब्ध करुन तेथील काही रक्कम स्वत:साठी करतात. काही लोक तर थोडेही काम करीत नसतात. लोकांना लागणाऱ्या वस्तूची पूरवठा पूरेपूर करीत नसतात.

   भामरागड तालुक्यातील गावांमध्ये लोकांसाठी आलेली रेशन लोकांना चांगले पूरवला जात नाही. लोक रेशनकार्ड दाखवून कनी पैशाने तांदूळ घेतात. मात्र काही लोकांना रेशन कार्ड नसल्यामुळे दुप्पट पैशातून विकतात आणि उरलेले काही आपल्यासाठी करतात. त्यामुळे गावातील काही लोकांना तांदूळ मिळत नाही . त्यामुळे काही लोकांना उपाशी राहण्याची पाळी येते.

  या भामरागड तालुक्यातील अनेक गावात शाळा नाही. अनेक गावातील लहान मुलांना , लोकांना शिक्षण निळणे आवश्यक आहे. पण मात्र गावात शाळा नाही त्यामुळे लोकांना शिक्षण काय आहे हेच माहीत नाही. म्हणून मुलांना लहान पणापासून खूप काम करावे लागते. गावात प्राण्यांना मारणे, पक्षी मारणे, झाडे कापणे अशा प्रकारचे प्रकरण शिक्षण न मिळाल्यामुळेच होते आहे. त्यांना गरजा भागवता येतो पण मात्र त्यांना सुखाचा जीवन जगता येत नाही. काही लोकांचा जीवनात कमीत कमी सुख निळते. जर पत्येक गावात जर शाळा उभारले तर त्यांच्यात शिक्षणामुळे काहीतरी बद्दल घडू शकेल अन्यत: नाही. काही गावात शाळा आहेत पण शिक्षक शिकवायला नसतात. याची कारण म्हणजे नक्षलवाद्याची भीती. जर लोकांना शिक्षण मिळाला आपल्या भागात एक खुप मोठी समस्या आहे ते पण नष्ट होईल. 

       आपल्या देशात किंवा राज्यात असे अनेक निवडणूक होत असतात. या भागातील लोक कोणत्यातरी  पक्षाकडेमतदान करतात. गावात काही शिकलेल्या लोक अशिक्षित लोकांना कोणाकडे ममतदान करावी हे सांगतात. जे लोक सागतात त्यामुळे सगळे लोक एकाच पक्षाकडे मतदान करतात. असे का हेत असेल? तर ते लोक सांगतात त्यामुळे सगळे लोक एकाच पक्षाकडेमतदान करतात. असे का होत असेल? तर जे लोक सांगतात ते त्याच्यकडुन पैसे घेतात व लेकांना सांगतात की निवचुन आल्यावर वेगवेगळ्या सुविधांची पुरवठा होणार म्हणून त्यांच्याकडे मतदान करा असे सांगतात. त्यामुळे सगळे खुशीने मतदान करतात पण तो निवडुन आलेला उमेदवार एकही सुविधा देत नाही. निवडून आलेला व्यक्ती सांगतो की, मला निवडून द्या हे न ते काम करुन देई. एकही गोष्टीचा कामाची कमी होऊ देणार नाही अशा सांगतात पण एकही काम करीत नाही.



       अनेक गावात लोकांना सरकार काही गोष्टींचा [सुविधांचा] पुरवठा करीत असते तरी पण चांगल्या गोष्चींचा पुरवठा होत नाही. भामरागड तालुक्यातील गावात गाय,बैल,शेळी, या पाळीव प्राणी पाळत असतात त्यांना अनेक रोग होतात अनेक आजारांनी बळी पडतात. त्यांना आजार होऊ नये म्हणुन अनेक प्रकारची औषधांची पुरवठा होतो पण त्या औषधांची मुद्दत संपलेली [expire date] औषधांची पुरवठा होतो. आणि जर ते गोळ्या, औषधे ढोरांना दिला तर त्यांचा आजार वाढतो व त्यामुळे अनेक प्राणी मृत्यूला बळी पडतात.

      तसेच कार्यालयांमध्ये पण लोकांना लुबाडतात. तलाठी सारखे जे लोकांना गाव नमुना,सात-बारा यांसारखे Document लिहुन देतात आणि पैसे मागतात. ते लोकांकडुन पैसे घ्यायला तलाठी आहेत का? त्यांना सरकारकडून पगार नाही का?

    जर आपल्या देशात अशा प्रकारे भ्रष्टाचार होत असेल. भारत हा विकसीत देश बनणार नाही. चला तर मित्रांनो या भ्रष्टाचारी लोकांविरपद्ध आपण आवाज उठवूया या भ्रष्टाचारी लोकांना विकासाचे धडा शिकवूया. उठा आणि जागे व्हा.



    भ्रष्टाचार नष्ट करा

          आणि विकासाला सामोरे जा.”   

 - शामू मडावी. वर्ग १० वा 
  ( मु. कुडकेली. जि. गडचिरोली )

लोक बिरादरीत येणारे पाहुणे

लोक बिरादरी प्रकल्पाला भेट देण्यासाठी दररोज अनेक पाहुणे येतात. पाहुणे बिरादरीत येतात, प्रकाश भाऊंना भेटतात.  त्यांचे अनुभव जाणून घेतात.  ' इथले आदिवासी लोक कसे राहतात ' याची माहिती घेतात, शाळेतील मुले कसे राहतात, कसे शिकतात, काही पाहुणे शहरात प्रत्यक्षात न पाहिलेले प्राणी इथल्या अनाथालयात जवळून पाहतात,प्राण्यांची माहिती घेतात. बाहेरुन आलेले पाहुणे आमच्याशी संवाद साधतात. आमच्या अडचणी विचारतात, काहीवेळेला त्या अडचणी पूर्ण करतात. इथले आदिवासी समोर जायला पाहिजे, इथल्या लोकांची विकास झाला पाहिजे म्हणून येणारे पाहुणे या प्रकल्पाला पैसे किंवा बाकीच्या गोष्टी दान करतात. इथल्या लोकांसाठी मदत पुरवत असतात. या सगळ्या गोष्टींचा आम्हाला खूप खूप आनंद होतो. 

बिरादरीत येणारे पाहुणे तेवढा दुरून येतात. काही वेळेला आमच्यासाठी कार्यक्रम घेतात. आम्हाला मार्गदर्शन करुन जातात. काही नवीन गोष्टी आम्हाला शिकवून जातात. आमच्याशी इतकं प्रेमाने वागतात. ते विचारतात की, तुम्हाला शिकण्यासाठी कोणत्या अडचणी येतात? आमच्या अडचणी सांगितल्या की, पाहुणे आम्हाला पुरवतात. आणि ते सांगतात खूप अभ्यास करा, चांगले शिका, खूप खूप मोठे व्हा. चांगली नोकरी करा. ते सांगताना आम्हाला असं वाटतं की, बाहेरून येऊन इतके छान आम्हाला सांगतात. आम्ही काही तरी करायला पाहिजे. आम्हाला इतक्या गोष्टी पुरवतात. काही अडचण असेल तर आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला पुरवतो. यामुळे आमचा आत्मविश्वास वाढतो.

 

बिरादरीत येऊन इथली सगळी माहिती जाणुन घेऊन बिरादरीत येणारे पाहुणे पण प्रेरणा घेऊन जातात.

               " बिरादरीत येणाऱ्या पाहुण्यांना आमचा रामराम! "

- सिताराम राणा, वर्ग १०
 (मु. मन्ने राजाराम, जि. गडचिरोली)