पुस्तकातील जग


पुस्तकातील  जग  हे  अनोखे असते.  पुस्तके  वाचण्यात  जितकी  आनंद  मिळते  तेवढं  बघण्यात  मिळत  नाही.  पुस्तक  वाचतांना  तिथे  दिलेली  दृश्य  आपल्या  मनात  त्याची  आपण  कल्पना  करतो  जर  तेच  दृश्य  डोळ्यांसमोर  दिसलं  तर   त्यात  काय  मजा? 

माझा गावातील जातीभेद


नियाम आहे की, पक्त शिकालेले मुला ठरवातात की,  गावात काय नियाम असयाल पाहिजे आणि काय नाही तेचा ठरवात असतात. त्यांचा जर नाही ऐक्याला तर पैसे मागतात. शिकालेले मुला अस भेदभाव करतात असतात. मुलींना त्याचा पंसदचे कापडे घालयाला नाही देतात. माझा गावाचा नाव मन्नेराजाराम आहे. माझा गावातले काही लोक शेती करतात. व काही लोक दुसरा व्यवसाय करतात. माझा गावात गोंडी, तेलगु, महार, हलबी, बांगली इत्यादी भाषा बोलणारे लोक राहतात. मी त्यांच्या बद्दल व गावातले वेगवेगळी भाषा बोलणारे लोकं कसा जातीभेद करतात. त्यांच्या बद्दल मी थोडक्यात लिहाली आहे.
 गोंडी मुलं जेव्हा ढोल वाजविणाऱ्या मुलींना घरात आणतात. तेव्हा मुलांचे आई-वडील तिच्यांशी चांगला वागतात. आणि आजूबाजूचे लोक पण तीच्याशी चांगला वागतात. ती बनवलेली पदार्थ आजूबाजूचे लोक खातात पण जेव्हा काही कार्यक्रम वैगरे असतात. तेव्हा ती जर घरातले काम करते व भात, भाजी बनवते. तेव्हा ती बनवलेले भात, भाजी, गोड पदार्थ, हात लावलेले पाणी सुद्धा ते लोक पीत नाहीत, भात खात नाहीत व घरात बसत नाही. ते पक्ता दुरूनंच बघता असतात. मुलाचे व मुलीचे मिटींग ठेवतात तेव्हा मुलाचे आई-वडीलना संगतात कि या दोघांना घरात ठेवयचा नाही. त्यांनी दुसरा घर बांधून रहायचा आणि दुसऱ्या गावातल्या  लोकांना बोलावून त्यांना जेवण द्या असे सांगतात. त्या मुलांचे आई-वडील काही म्हटलं तर गावातले लोक त्यांना त्यांचे कुठल्याच कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही असं संगितलं जातं. ते कुटुंब काहीच करू शकत नाहीत. जे गावातले लोक सांगतात ते त्यांना ऐकावे लागते. ख्रिश्चन मध्ये काही लोक जातात. म्हणून गावातले काही लोक त्यांच्याशी बोलत व काही बोलत नाहीत. त्यांना कोणीच मदतील जात नाहीत. गावात जर कोणी मारण पावला तर जे लोक ख्रिश्चन मध्ये जातात त्यांनी जर त्या कार्यक्रमात मदत केला तर गावतले लोक त्यांना म्हणतात की तुमच्या मुळे हा मारण  पावला आहे. तुम्हीच काहीतरी केले असं म्हणतात. ते लोक पण माणस आहे, ते लोकांना माहित असून तरी अस का करतात. ते ख्रिश्चन मध्ये जातात म्हणून का?. भामरागडतालुक्यात काही गावामध्ये ख्रिश्चनत जाणारे लोकचा पण हेच परिस्थीती आहे. त्या लोकांना कसा वाटत असेल ? गावातले लोक आधी त्यांच्याशी चांगले वागत होते त्यांना - त्यांना मदत करत होते. पण आता त्यानी दुसरा धर्म स्विकारला म्हणून तेच लोक त्यांचाशी चांगला वागत नाहीत. असं का करतात. अखेर ते पण माणसेच आहेत.   
              हलबी लोकंचा लग्न तीन किंवा चार दिवस आसतो. एखाद्या मुलीगी जर घरातुन पाळून गेली तर तिला मरतात, तिच्या संबघ थोडतात, तीला घरात येऊ देता नाही. लग्न झाल्येला मुली पक्त साडी लावयाच. दुसरे कापडे घालयाच नाही. घातल्या तर गावतल्ये लोक 100 किंवा 1500 अस पैसे मागतात. माझा गावात असं
             


वर्ग  10 वी.

व्यवसाय व शेतीचे उद्योग


           व्यावसाय व शेतीचे उपयोग
 शेती हा जगातील खुप महत्त्वाची घटक आहे.शेती आपण स्वतःसाठी व दुसऱ्यांसाठी करतो.शेती विषयी सर्व लोकांना माहित आहे.शेती सर्वांनी करतात. प्रत्येक गावात,शहरात वदेशांत शेतीचे व्यावसाय केली जाते.व्यावसायाचे  वेगवेगळया प्रकार आहेत.कापूसे जे आपण शरीर झाकण्यासाठी वापरतो.कपडे,थंडीचे स्वेटर.गहू पिठ पोळी व चपाती या प्रकारचे.
उसमधून  साखर  बनवतात आणी धानपासून भात बनवतात.आपल्या महाराष्ट्र राज्यात माझा मनाने तर धान्याची व्यावसाय खुप प्रमाणात केली जाते.पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चारही दिशांमध्ये शेतीचा व्यावसाय केली जाते.शेतीमुळेच माणूस जगत असतो.आणी शेती न केल्यास ते जीवण जगू सकत नाही. म्हणून शेती व्यावसाय सर्वांनी करतो.धान पिकवण्यासाठी पावसाची वाट पाहत राहतात.पाउस पळला कि नांगरनी करण्याची सुरूवात करतात. नांगरनी करायची संपली की खत ठाकतात त्या नंतर धन पेरतात.धान परून झल की दोन-तीन महिनानंतर कापनी सुरू करतात.धान कापण्याचीसंपली की चूरणी सुरू होते.शेती करून संपल की धान विकण्यासाठी नेतात.
आपल्याकडे भाज्यांची व्यावसाय ही करतात.त्यांची किंमत उन्हाळ्यात खुप प्रमाणात वाळतो.आणी पावसाळ्यात कमी होतो.त्याचे कारण आहे पावसाळ्यात जास्त प्रमाणात व उन्हाळात खमी प्रमाणात केली जाते.त्यामुळे फळ भाज्यांची भाव कमी जास्त होत राहतो.म्हणून विक्री जास्त प्रमाणात होतो.

                                                                                               - नाव.शिवाजी पुंगाटी
                                                                                 लो.बि.आ.शा.हेमलकसा      वर्ग १० वा

माझा खेळाबद्दलची माहीती


माझा खेळाबद्दलची माहिती
मी या  शाळेत सातवीत शिकत असतांना ,मी SPORT  खेळयला गेलो.
तेव्हा आमचे मार्गदर्शक नंदनवन सर होते.
त्या सरांनी आम्हाला GROUND मध्ये लेट गेलातर आम्हाला PANIESMENNT करायचे. म्हणून मी फक्त एकादी महिना PRACTIESकेलो. मग GROUND सोडुन दिलो. काही GAMES वैगरे खेळलो नाही. मग नववीत असतांना SPORT S मध्ये JOINT केलो. तेव्हा दुब्बे सर आले. मग मी निश्चय कलो की,यांच्या हातातून नक्की खेळायचा. मग मला दुब्बे सरांनी १५०० मीटर हा EVENT दिला. माझा १५०० मीटर ची TI MING ४.४७ होता.
आणि मी अजून १५०० मीटर ची वेळ कमी करण्चा पर्यत्न केलो. आणि माझे १५०० मीटर ची वेळ ही कमी झाला.
मी जेव्हा State लेवलचा compitation केलो. १५०० मीटरची timing 4.28 झाला. State ला मी यश झालो नाही. जेव्हा मी state लेवल compitation उतरलो तर जे माझा सोबत compitation केले त्यांना पाऊन   असा वाटत होता.की हे Compitation  मध्ये तर मीच यश मिळवू शकलो असतो. कारण हा होता. की मी state चा compitation पूर्वी मी आजारी होतो. म्हणून मी यश मिळवू शकलो नाही.

जर तुम्ही कोणत्याही गोष्टीचा स्वतावर विश्वास ठेवून केला तर त्या विश्वासाचा तुम्हाला यश मिळतो.

नाव  = शिवेंद्र कुड्यामी
वर्ग = 10
गाव =जुव्वी
Thank  you


 


माझी शाळा


माझी शाळा लोक बिरादरी आत्रम शाळा हेमलकसा आहे.माझ्या शाळेत सर्व सुविघा आहेत.   
सोलर हिटर आहे. सोलर प्लेट आहे. सर्व सुविधा आहेत. जे भामरागड तालुक्यातील जिल्हा
 परिषद व आश्रम शाळा मघ्ये हि तेवळी सुविधा नाही. शिक्षण सर्वांत उत्तम आहे. ४० computer
आहेत.त्यात आम्हाला नेट वापरायला मिळते, आमही एका विषयावर प्रझेंटेशन कारतो. Lab मघ्ये २
आँपरेटिंग सिंसटिम आहेत. एक विनडोज व दुसरा उबनटु अशा प्रकारे आहेत.
                      Computer मघ्ये {M.S offices } आहे. जे ददहावीच्या विदयार्थासाठी आवश्यक आहे.
वेगवेळया प्रकारच्या ग्रमर आहेत. त्याच्यामुळे मुले जास्त सकाळी संध्याकाळी सिसीहरली जातात व त्याच्या
फायदा घेतात तसेच माझ्या शाळेमध्ये वाचनालय आहे. त्यामध्ये ५ हजार ते ६ हजार पुश्तके आहेत. ते पण
वेगवेगळ्या विषयाची पुस्तके आहेत. माझ्या शाळेत ग्राउंड आहे त्याच्यामध्ये माझ्या शाळेतील मुल  सकाळी
सपोरट खेळायला जातात. आणि मेडलस मिळवतात. मागच्या वेळेस ठाणे येथे खेळायला गेले हेते. त्यामध्ये
आपल्या विदर्भाचा दुसरा क्रमांक त्यामध्ये लोक बिरादरी आत्रम शाळेचा सिडांचा वाटा आहे. अशी आहे माझी
शाळा,खुप सुंदर, स्वच्छ व शांत.
                                                                           धन्यावाद.....
               

 n= vishal Madkami     class 10 th

माझा शाळा


...........                                                         मि बालवाळीपासुन   मी लोक बिरादरी आश्रम शाळा हेमलकसा १ ली ते १२ वि परता आहे. मुलाना जेवन करन्या साटी मेस आहे मेसचा  साइटला  एक मोठा मैदन आहे तसेच मुलंना मुलिना हॉसटेल आहे अमि रोज सगळे शाळेत जातो शाळेत सिकनरे मुलंचे वङील शेती करताता मिलंना पैसे पुरवताता मुलंना शाळे कङुन तेलशाब मिळते आहे, मुलंना शाळेचे कपङे मिळत आहे.  २६  जानेवारीला मीळताता व १५ ऑगटला  मिळताता ते मग अमि वापरत असतो मि पुरना   शाळेला सुट्टि मिळला कि  आमि गवला जातो गवत पेचलावर अमला खुप खप अनंदहोतो ...मि  खुप लाहन होतो तेवा माजा वङिल मला शाळेत                                                                                                                                 मग मि आई बाबाना सोळुन रहय़ला लागलो मि मग आता  माझा मित्र  पाहिले मला मित्र कोनिस नवते मि शाळेत एकटाच पिरय़चा  मि  एकटाच राहय़च माला बोरजाला तरि कोनि मित्र नवते .
                                                                                                              -नाव  रोहित  वड्डे
                                                                                                              -गव  कुकामेटा
                                                                                                              -वर्ग १० वा

व्यसन मूक्ती


 व्य़ाशन मूक्ति आमच्य़ा गडचिरोलीत जास्त प्रमाणे
व्य़ाशण करतात आणि लोक मरतात वर्षभरातून २०,३० जन मरतात आणि ते व्याशणथ
लहान पासून करतात . व्याशन कसा पासून होतो .आपन लहान असतो आणिआपन मीत्रान बरोबर खेळतो
खातो जर आपला मित्र तंबाखू खात असेल तर ते व्याशण आपलयालाही लागू शकतो
म्हणून आपलयाला काय करायला पाहिजे,(१) आपलयाला मित्रा बरोबर दूर रहायला पाहिजे
(२)आपन व्यशणाकळे दूलर्क्ष केले पाहिजे. (३) जर कोणि व्याशण करत असेल त्याला सागितल पाहिजे कि
व्याशण केल्यातर  मानशिक परीणाम होते आणि  कैन्सर हि होतो .
आणि भामरागड तालूका मध्ये जास्त आदिवासी लोक राहतात आणि ते जास्त प्रमाणे व्याशण करतात.
आणि ते जास्त म्हणजे लग्न मध्ये दारू पितात . आणि भामरागड तालूका मध्ये मोहाचे फूल वेचतात आणि त्याचा दारू
काढतात.आणि वेगवेगळया फळाचे दारू काढतात आणि भामरागड तालूकातील जेवढे गाव आहे तिथेआता व्याशण बंध होत आहे                                                                                                                                                               
                                                                                                                                                      
                                                                                                                                               नाव सूनिल बाकडा
                                                                                                                                         रा  पल्ली , वर्ग१० वा                 
.



गावाचे समस्या

माझा गाव हा गडचिरोली जिल्हात भामरागड तालुक्यात अंतिम टप्प्यात नक्षालवादींचा आतिदूर्गाम भागात आहे. आणि त्या भागातील माणंसानी नक्षालवादींचा भागात आसल्यामुळे कमीत कमी शिक्षाणाचा महतत्वा कळत पण पूर्वीच्या काळात शिक्षाणाचा महतत्वा नसे. आता खूप शिक्षाणाचा महतत्वा आहे. मन्हूण आता शिक्षाणाला खूप महतत्वा दिले जाते. मन्हून आदिवासी लोकांना कमीत कमी शासनाचा नौकरी मिळतात. आणि नक्षालवादी भागात आसल्यामुळे सर्व लोकांना त्यांच्या  भागात आसल्यामुळे लोकांना गुप्तापणे रहावा लागतो. आणि आपल्या कडील लोकांनी जास्ता प्रामाणे शेतीचा व्यावसाय करतात. आणि त्या व्यावसायात शेतकरी जेवढा कष्टा करेल तेवढा शेतकरीला फळ मिळतो. आणि आता आदिवासी लोकांनी शासनाचा हातावर जात आहे. मन्हूण आदिवासी लोकांनी हळूहळू सुधरू लागत आहे. तरी पण आदिवासी लोकांना नक्षालवादि गावात येऊन लोकांना किंवा मुख्या म्हणजे गावातील मुख्या माणसाला ठेवतात. म्हणजे गावतला त्यांच्या काम करून देणारा. उदा त्याना जेवन नेऊन देणे.आशा प्रकारे नक्षालवादींचा कायद्यात रहावा लागतो. जर एखादा चूक आपण केलो तर काही करं नव्हे रे बबं. मन्हूण नक्षालांच्या गुलामावर आदिवासी लोक राहतात.
तरी पण आदिवासी लोक आंतिम भागात आसल्यामुळे सागळा त्या भागातील लोकांना नक्षालांच्या भीतीमुळे त्याच्या विरूद्धा ज कोणी असेल त्याच्याकळे गेला तर त्या माणसांना रात्री झोपलेल्या आसतात. तेव्हा नक्षालांनी येतात जो माणूस असेल त्याला पकडून नेतात. आणि त्याचा डोळयांना बांधतात आणि  खूप जंगलात फिरवतात. कोठेही कोणत्याही जागवर मरून टाकतात. म्हणून नक्षालांचा हाताखाली त्या कडील लोक राहतात. आणि माझ्या गावातील लोकांना त्या परिस्थिती करतात. म्हणूनच आपल्या कडील लोक नक्षालां पासून गुप्ता पणाने राहतात. आशा प्रकारे माझ्या गावातील समस्या आशा प्रकारे आहेत.  
                                                              नावः मनोज महाका                                                                                                                                        

माझा गावाबद्दल


        माझ गावच नाव पल्ली आहे. भामरागड, हेमलकसा आणि ताडगाव पासून नव किलो मीटर अंतर आहे.गावाचा चार ही बाजूत जंगल आहे. २००० मीटरावर एक नदी आहे. ती नदी भामरागडातून तीन नदीचा पाणी एकत्र येऊन ती नदी, माझ गावाच बाजूने वाहते. त्या नदीला इंद्रवती म्हणतात.  नदीचा पल्लीकडे छत्तीसगड आहे.
       गावात ८३ ते ८५ पर्यंत घरे आहेत.  २०० ते ३०० पर्यंत कलोक राहतात. गावात विजेची सोय आहे. गावात सर्व लोक एक जुटीने राहतात. सर्व लोक एकत्र युउन निरनय घेतात. गावात वेगवेगळ्या सन साजरा करतात. साजरा करताना प्रतेक गलीतल्या मानसांकडे वेगवेगळ्या काम सोपवल्या असतात.  गावातला सर्वात मोठा सन म्हणजे जत्रा होय. या सनाला वेगवेगळ्या गावाचे लोक बघायला येतात. याच दिवसी छत्तीसगळ मध्ये जतलू मध्ये साजरा करतात. गावातल्या मुलांसाठी आनंदाचा सन आह. तसा इतर सनात ही आनंद असतो पण या सनात इतर नवीन नातेवाइकांची ओलख होते. वर्षातून एकदा साजरा केला जातो. या जत्रात पुजारी माणसना आणि बायाना ७ ते १२ वाजे पर्यंत नचवतात. त बघण्यासाठी लोकांची गर्दी भरलेली असते.      
        माझ्या गावात शेती, पशुपालन, आणिाजिपाला पिकवला जतो. भाजीपाला पिकवण्यासाठी गावाच माती छान आहे. गातले लोक भाजीपाला विकण्यासाठी भामरागडला आणि हेमलकसाला आनतात. गातल्या लोकाना भाजीपाला नेण्यासाठी खूप त्रास होतो, कारण दोन डोंगर चढून आणि डोकसावर भाजीपालाचा ओझ घेऊन चढावा लागते. बाया दर बुधवार आणि रविवारला आणतात. माणस सुधा कावळने आणतात. ताडगावला फार नेत नाही. दर बूधवारी ५० – १०० रूपयचा भाजीपाला वीकतात. त्यास पैसेने टिकट, मरची घेतात. आता थोडा प्रमाणात आधुणिक पधतीचा शेतीला सुरूवात करत आहेत.     
        गावात मुलांचा संघटना आहे, ते २००१८ ला सुरूवात केले आहे. सर्व मुलांनी निरन्य घेतले की गावात स्वच्छता, वेशन मुक्त करण्यासाठी आणि गावाला कसा स्वच्छता ठेवता येइल याचा निरनय घेतात. यासाठी दर महिण्यातून दोन वेळा रविवारचा दिवसी एकत्र येतात. गावात २० ते २५ अर्धवट शिकलेले मुल आहेत.         
                                                                                
                                                                   ना: शकिल कोरसामी (वर्ग १० वी)

गावातील माणसे कसे राहतात.


माझा गावतील माणसे कशा राहतात.की ते आपला घरी राहतात.आणि ते दिवस भर काम करतात.
आणि  रात्री आपल्या घरी  येतात. माझे गावतील माणसे सवजन शेती करतात.
आणि आपला घर चालवतात. शेती करूण आपल किवां आपला  मुंलबाळन्य
शिकवतात असतात.आणि घर चालवत असतात .मुलगला सवकाही लागतो .ते गेवुन देतो
स्वतचा विचार करात नाही पण मुंलगचा विचार करत असतात.आणि माझे गावतील माणसे आढवडतुन
एखादा एका ठिकाणी म्हणजे गेंटुल मध्ये येतात. आणि   गावमध्ये काय करायचा ते विचार करतात.
सवजन १२ महिने शेतात काम करत असतात. १२ महिने स्वताचा विचार करत  नाही. आपला परिवारचा विचार करत असतात.
परिवार नाही. आपला गावच्या विचार करत असतात .महत्वचा म्हणजे आपला मुंलच्या खुप म्हणजे खुपच विचार करत असतात.
आपला मुंलच्या विचार असतात तेव्ह आपला जीवनच्या विचार करत नाही .आणि गावतील काही सण असतात तेव्हा सवजन
एकत्रा जागी येतात आणि खुप नाचतात ,मज करतात.आणि आपला विचार एकमेकान सागंतात आणि आपले मत दुसन्या
कंळवतात.सणच्य दिवसी घरोघरी जतात.आणि तेन्हा दारू काही देतात .असे प्रकारे मजज करत असतात .
आणि आम्हचा भागतील शेताकरी धान्य हा पिक गेतात. सर्व शेताकरी धान्य हा पिक  लावतात.
 
 
नाव ःअजय वेंळजे  वर्ग १० वा

शेती


शेती हे आधुनिक काळापासुन वेगवेगळ्या बियानचा शेती करत होते.
आधुनिककाळात जेव्हा शेती करत होते तेव्हा नांगर नव्हता म्हनून जमिनला पावडाने खोदून शेती करत होते.
काहीकाळापासून बैलांनचा वापर करून नांगरनी करयचा तेव्हापासून लोकांना शेती करयला खूप सोपा झाला
अनकी काहीकाळात वेगवेगळ्या प्रकरचा मसिनस आल्या आणि उदा.ट्कटरस असा प्रकरचा गाड्या आल्या
तसेच लोकाना शेती करयला खुप सोपा झाला आहे आणि वेगवेगळ्या प्रकरचा व्यवसाय करू लागले
उद.फळ्यानचा,गहू,वटाने,आणि ऊस इत्यादी प्रकरचा उत्पादन करत आहे म्हनून बाजारात वेगवेगळ्या
प्रकरचा फळ्यानचा किंवा कड धान्यांचा भरपू माल विकन्यासाठी बाजारात आणतात.
आणि म्हनूनच अपल्याला असा प्रकरचा फळे किंवा कड धाना खायला मिळतो. आणि हे सर्वा
अपल्या शरीराला खूप गरज आहे. म्हनून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.

                                                           दानसू पुंगाटी
                                                         रा. जुव्वी


वर्ग १० वा

आदिवासी लोक आपले पंरपरा नुसार चालत असतात


आदिवासी माणसावर आपली परंपरा सर्वात चांगली आहे. आणि हिच रीत वापरली पाहिजे .कोणतेहि वेळी असो किंवा कोणतेही अडचणीअसो पण माञ आपलीच रित वापरली पाहिजे.व त्यार्माफत आपली अडचण सोडवली पाहिजे.असे आपले भागातील लोक करत असतात.जसं,उदा.एक मूलगाला काही रोग झाला असेल तर आपली भागातील लोकसर्वात पहिले दवाखानात न नेता ते गावातील पुज्यारा कडे जातात आणि तिथं उपचार करतात .मला समजत नाहि ऐवडे अभ्यास करून डॉक्टर बनतात ते डॉक्टरला न दाखवता पुजारी कडे जाऊन ते उपचार कराले जातात. हे सर्व त्यांचे रूढी परंपरा नुसार ते करत असतात. म्हनून मी असा म्हणतो त्यांची रूढी परंपरा बद्दली पाहिजे. माझा मत असा आहे कि त्या माणंसामध्येकाही दोष नाही आहे. त्यांची परंपरा नूसार करत असतात. म्हनून मला वाटते कि त्यांची परंपरा बद्दली पाहिजे. आणि मला असे वाटते कि परंपरा बद्दली पाहीजे आणि त्यासाठी पहिले सर्व आदिवासी भागातील मूलांचा शाळेच्या मागावर लागले पाहिजे व गावा पर्यतं जाऊन दवाखानाची सोय केली पाहीजे. आणि त्या लोकांना सर्वा बाबतीत माहीती पोहचून दिले पाहिजे. नूसता सांगण्या ऐवजी त्यांना म्हणजे लोकांना गोळा करून सांगितले पाहिजे . त्यानां न सांगता दर्शवून सांगितले पाहिजे असे माझे मत आहे. नाव जय हावलादार  वर्ग १० वा   रा  भामरागड

भामरागड मध्ये शेती कसा करतात


भामरागडवर शेती कसे करतात आमच्याकडे एखदाच करतात व कसे शेतीचे उपयोग करतात तेस महित नही शहरात आणि गावात खूप परक असतो.शहरात दोन वेळ उप्बलध करतात.आणि आमच्याकडे एखदाच करतात. म्हणून आमचकडे उत्पादन कमी होत असतो. वआमच्याकडचे लोकांना महितच नसतो.की पाणी साठवता येत नाही.म्हणून शेतीचे उत्पादन होत .जर शेती कशे वापरतात हे जर महित असत.तसेही आमच्याकडे शेती खूप असतो.पण वापरत नसतो हे आदिवासी लोकांचे कंडीसन असतो.व शहरातच लोकांन टेकनिक असतो
.आदिवसी लोकांन टेकनिक नसतो.म्हणून आदिवसी लोक मागे असतात.शहरात शेती विकासीत होत राहते. गावात किंवा आदिवासी भागात मागे रहतात. परक आदिवासी लोक अशुद्दरूत असतो.शहरात शुद्धत असतात.हे परक आहे.शहरात वेगवेगळे व्यावसाय करतात. आदिवासी लोक एकाच व्यावसाय करतात.आदिवास लोकांना कुकुट पालन म्हणजे तेही माहित नसते. इकडचे लोकांन दोन व्यावसाय महित आहे. एक म्हणजे दारू व शेती हे सोळुन त्याना माहित आहे.तर दोस्तो आवडल तर वाच.माग सांग खरा आहे कोटा सांगा ?
            प्रत्यक्ष येउन बगा इकडचा शेती कशे वापरतात.व कोट वाटत असेल तर भामरागड गावात ये आम्ही दखतो.पावसळत ये तेव्हा तुमाल रियली बागात येईल.व वसंत ऋतु एखद ये.इकडचे काय करतात कशा वापरतात.कशा उब्पधन करतात. हे सर्व महित पवासळत किंव वंसत श्रुतूत महित होईल.या दोन श्रुतूमध्ये य.तुम्ही पकत आदिवासी भागा मध्ये जाहुन विचर व्यासय म्हणजे काय?या भागात अशिक्षित लोक राहतात. शिक्षणचा महत्व ही महित नही.
                                                                                                                    तुम्हाल आवडल likeकरा  

   अशोक पुसाली
    गावाःपेनगुडा
     ताःभमरागड
    जिःगचिरोली

माझा गाव


                                                         माझा गाव
माझा गाव मला खुप आवडते आणि गावाचा नाव झारेगुडा आहे.
आणि माझा गाव खुप छोटा आहे आणि लोक पन खुप कमी आहे. 
 आणि आपलाकडे लगणालाआणि वेगवेगळा खारीक्माला खुप कमी असातात.
पन गावात आपलेला थेवळा मझा येथ नाही आणि माझा गावात फकथ तीन भोरवेलआहेत.
आणि तीथून दोन भोरवेल करब होतात मघ आमाला पाणीसाठी खुप तकलिब होते.
मणुन आमाला अझुन एक भोरवेल आवि आहे आणि मी गावाला झावून मी माझा गावाचे लोकाना गोठूल मधे किवा कुटेही सागनार .
पण पहिला माझा घरचाना सागनार.पन मी गावात हे गोष्टी नकी मी सागनार आहे.
आणि लोकाना  मी झावुन सागनार थेवा खुप खुप खुशि होनार मग वाटनारकी आमचा गावात भोवेल आझुन एक नवीन भोरवेलआहे.
आणि आमचा गावात एक ते चैवथी परता शाळा आहे. आणि माझा गावा भाजुला दोन नदी आहे आणि थे नदीचा नाव परला कोटा आणि फामुल घताम हे दोन नदी मधे वेगवेगळा लोकानी तीथे आगोळीसाठी किवा कपडे धतनसाठी येतात.आणि गुरे डोरे पानी पिणासाठी येतात. मी माझा गावचा बदल दोन शब्द लीवून समात करतो.
माझा नाव ज्योती पुंगाटी 

वर्ग  १०  वी  रा =झारेगुडा

name

India

 - Your name

माझा गावी


आमचा गावाच नाव आरेवडा आहे. माझा गाव थोडी लहान आहे. आणि माझा गावात दोनशे घर आहेत एक नाला आहे. तेथे पाणी पिनासाठि गुरे, डोरे पाणी पितात आणि तहान बागवतात. आणि आमचा गावात  आजु बाजुला हिरवगार जंगल आहे. गुरे, वासरे जंगलात चरायला जातात. आणि आमचा गावातील लोक शेती करून आपला पोट बरतात आणि आमचा गावाच नाव आरेवडा आहे. माझा गाव थोडी लहान आहे. आणि माझा गावात दोनशे घर आहेत आमचा शेतीत धान, मके, वागे, असा अनेक शेतीत पीकवतात. आणि आमचा गावात गोटुल आहे. शाळा पहिली ते सातवी पर्यत शाळा आहे. आमचा गावात पाणी पुरटा केले आहे. आमचा गावात पुरर्ण सुंविधा आहे. गावाचा शाळेत पहेले चांगला शिक्षक नवते अता चागले शिक्षक आहे. आणि चांगला शिकवतात आणि ते मुले दुसरा गावात जाऊन शिक्षन घेतात आणि ते शाळेत बगायला सुधा जात नाही आणि गावातले लोक एक जुटित राहतात. आमचा गावातून वाहनारा नालाला गावातले बाया दुशित करतात ते पाणि वासरु किंवा गाय पिऊन बिमारी पळतात जर पाणि चागला राहीला तर लोक पन पिले असते.पण पाणी दुषित अलामुळे पित नाहीत.
नाव सिता पुसाली वर्ग १०वा रा आरेवाडा

पशुपक्ष्यांचा दुःख


मला पशुपक्षी खूप आवडतात. म्हणून त्यांचे वर्णन केली आहे.
पशुपक्षी खूप वर्षे पुर्वी पासून आहेत. पण दुःख सहण करत राहतात. पशुपक्ष्यांणा माणसे त्रास देतात.
म्हणून पक्षांना खूप दूःख होतो. पहिले खूप पक्षी होते ते कुटेही घरट बांदत होते. उदाः घरात ,झाडात किवा कुटे झाड मिळेल तीथे घरट बांदत होते. पण आता तसा नाही आता फक्त झाडा वर बांदते. माणसे पशुपक्ष्यांणा मारतात किव मारूण खातात. शिकारी करायला जातात. आणि जंगाल नष्ट करतात. म्हणून पक्ष्यांणा त्रास होतो. कुटेही घरटा दिसला की घरट्यांना माणसे काळतात. आणि पक्षांना मारूणखातात. म्हणून पक्ष्यांसाठी माणसे राकक्षश बनले आहे. पक्षी पोठ बरण्यसाठी किती मेहन्नत करतात. ते लोंकाना माहित नाही. म्हणून मारूण  टाकतात.आता पाक्ष्यांच्या संख्या कमी झाला आहे. पहिले पक्षी इकडे तिकडे आकाशात उडत होते. पण आता आकाशात पण दिसात नाही. पक्षी भितात की मला कोणीतरी मारूण टाकेल किवा खाऊण टाकेल असा विचार करते. माणसांना पक्षांचा दःख दिसात नाही. फक्ता स्वताःचा विचार करतात. आपलयाला किती संकट येते तेवळा संकट पशुपक्ष्यांना पण येते. ते स्वःता कष्ट करूण जिवन जगतात. आणि आता पण जगत आहे. आता पण माणसे मारूण खातात. म्हणून पक्षी दिसात नाही. फक्ता बगळे, कावळे, चिमणी इत्यादी प्रमाणे जास्ता दिसतात. माणसे ऐवळे दुष्टा आहेत. आणि शहरांकळे तर पक्षी बिलकूल दिसात नाही. फक्ता कबूतार दिसतात. शहरांकळे तर खूप प्रदूषण होतो. पीण्यासाठी पाणी मिळात नाही. अता पशुपक्ष्यांणा शहरात गळतो. मला असावाटते की पशुपक्षांना माणसे त्रास देवू नये, जंगला तोडू नये, असा वाटते.                  
                 नाव –रजनी हबका   वर्ग -१० वी  .रा=कारमपल्ली

माझी शाळा


       माझी शाळेचे नाव लोक बिरादरी आश्रम शाळा हेमलकसा
माझी शाळा मला खूप आवडते. मी इथे पहली पासून शिकत आहे.
आता मी दहावीत आहे. या शाळेत खुप काही बघण्यासारखा आहे.
लायब्ररी, कॉम्प्यूटर रूम, मैदान, प्रयोगशाळा, इंग्लिश रूम बगिचा, बालोद्यान
हे आहेत व शिकण्यासाठी पण यांच्या उपयोग होतो. माझे वर्गशिक्षक व इतर सर
पण चांगला शिकवतात. माझे वर्गळिक्षक श्री. वानखडे सर हे आहेत.
   वानखडे सर आम्हाला गणित शिकवतात. आम्ही गणित शिकतांना शाळेतील
काही वस्तू काळजीपूर्वक वापरतो. इथे शिकून खूप जण मोठे झाले. मला पण
वाटते की मी पण पुढेशिकून काहीतरी करावा.पण मला हा शाळा खुप आवडते.
या शाळेमध्ये शिकून मुलमूली पुढे काहीतरी कराव.या शाळेचे नाव गाजवावा.
या शाळेमध्ये शिकून एवढा मोठा माणुस व्हावा की जगात त्याच्या नाव असावा.  
 
         वैशाली पुंगाटी
रा नंरागुड वर्ग१० वा

हुंडाचा बद्दल मी लिहीलेली आहे

बाई संस्कारामुळे लग्नाशिवाय राह् शकत नाही. म्हणून त्या करतात. पण पदवीधर, उच्च, पदवीधर मुलीही कसलीच सावधगिरी न घेता लग्न करतात आणि हुंङाबळी होतात. आज मुलीच प्रमाण  कमी झालेलं आहे. दहा मुलांत एका मुलाला बायको मिळणार नाही तरीही मुली लग्नासाठी गुलामिला आमंत्रण देणारी लाचारी स्वीकारतात. पण समानता नसेल तर स्वातंञ्य नाही स्वातंञ्य नसेल तर प्रेम नाही. तरी हुडा देऊन सासरची कृत्रिम नाती उदा. आई ऐवजी सासू वडिलऐवजी सासरा बहिणऐवजी नणंद भावाऐवजी दीर इत्यादी दुबळी स्त्री अधिक दुबळी होते. पण समाजात न्याय पाहिजे असेल तर भारतीय घटनेत आणण्यासाठी विवाहसंस्था टिकविण्यासाठी घरजावाई रहायला पाहिजे. लग्नाला संस्कार म्हटलं शुभमंगल सावधान म्हटलं की त्या पुरूषास पत्नीसा दोधांचं जोडी समझण्याचे संस्कार होतात. हे बुध्दीला पटत नाही. लग्ना जर संस्कार आहे करार नाही, तर ते तोडण्यसाठी म्हणजे घटस्फोटासाठी कोर्टात जाण्याची गरज आहे. म्हणून मुलीनो लहान वयात लग्ना करू नका.     

- प्रिती गावडे

इरपनार

व्यसन


आमचा गडचिरोली जिल्हयात खूप लोक व्यसन करतात.   
त्यांचासाठी ते व्यसन चांगला असतो. पण त्यांना हे माहित नसतो की ती   
व्यसन हानिकारक असते. लोकांना आता व्यसनचा सवय लागला आहे.
 ते व्यसन म्हणजे फक्त दारु नव्हे खर्रा , गुटका, तंबाखू , नस, बिडी, 
सिगरेट अशाप्रकारे वेगवेगळ्या व्यसन आहेत. दारु मध्ये पण फक्त
मोहाचे दारु नसते देशी दारु, मोसांबी दारु, इंग्लीश दारु, नारयल दारु,
ताडी, गौरगा, शिंदी, चारा( रेखा ), जाभूळ ( नेडी ), चिंच ( इतांग ) , गूळ ( बेलेम ) आता हितून मोह, चिंच,  चारा, जांभूळ, गूळ, शिंदी, ताडी, गौरगा, याचाने आमच्याकडे दारु काढला जाते.
                   हे सर्व प्येय लोक आवडीने पितात. पण आता मोहाचा दारु कसं  काढून पितात याला काही महत्वा नाही.ते दारु काढून पितात त्यांना हे माहिती नसते की ते दारु मध्ये रासायनिक असते. ते लोक दारु पितात तर फक्त मज्जा घेण्यासाठी पण त्यांना हे माहित नसते की त्या दारु आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे.  लोक दारु पितात तेव्हा त्यांना चंकर येते तेव्हा त्यांना खूप मज्जा वाटते. पण नंतर डोके दुःखते, डोळे दुःखते दारु पिल्याने असा परिणाम होतो. कॅन्सर होतो. आणि हे तंबाखू  दिवसभर गालाकडे ठेवतात म्हणून त्यांचा दात काळे पडतात आणि तोंडात छोटे छोटे पोळं  होतात आणि दुःखतात तसेच सूजतात कॅन्सर व्यायला सुरवात होते पण त्या माणसाला कळत नाही की मला कॅन्सर होतोय.
                                  खर्रा गुटका नस हे पण असच प्रकारे आहे. खर्रा पण Any Time तोंडात ठेवल्या  जातात आणि ते खर्रा चावत असतात तेव्हा अर्धा थुंकी आत मध्ये गिळल्या जातो. तेव्हा आपल्याला नुस्ता झोपून राहावास वाटतं. कोणताही काम करुसा वाटत नाही. म्हणून हे सर्व खायल्या प्यायला सोडून दया. कारण हे व्यसन करणं म्हणजे आपल्या जीवचा धोका आहे.                                                                                                                              
        

         नावः ज्योती देवू  तंलाडी.          
          गावः कुडकेली.   
         Class : 10th.             


माझा गाव


आमच्या गावाचा नाव इरपनार . भामरागड तालुका मध्ये आहे.आमच्या गावात आजू बाजूनी हिरवा आणि गनदाट जंगल व्यापलेला आहे.आमच्या गावात ७० घरे आहे. आमच्या गावातील वातावरण खुप छान आहे . सकाळी पाहाटे उठतो तेव्हा चिमण्या पाखरंचे किलबिल सुरु असते. लहान पाखरे घरट्यात रहातात. आणि त्यांची माय चारा शोधून आणतात. असा प्रकारे सकाळाची दैनंदिन असते. आमच्या गावच्या आजू बाजूनी नदीचा उगम होतो. ते नदी रात्र आणि दिवस कळ-कळ असा आवाज करते. आणि शेतामधून वाहते. गावातील गाई गुरे तीथे पाणी पिऊण आपले तहान बागवतात. आमच्या गावात सर्व लोक शेतीवाळी करतात .वआपल्य पोट भरतात.आणि बाकीचे दान विकतात. पण कमी पैसा मध्ये विकतात. आणि त्या पैसातून  आपल्य घर चालवतात. आणि आपल्य देशा मध्ये असे पण लोक आहेत की ते स्वःतला मोठे पण समजतात. आणि शेतकरी लोकाना कमी पणा समजतात.पण एक वेळ असा येईल की तेव्हा शेतकरी लोक एक महिनासाठी शेतीकरनार नाही. तेव्हा बाकीचे लोकाना भात कुटून बेटनार.जरी ते नौकरी करत असल्या तरी पण भात बेटू शकत नाही. कारण शेतकरी शेती करुन दान विकलेच नाही. तर कुटून बेटनार. जरी आपन नौकरी मध्ये असल्य तरी काही परक पडत नाही.कारण नौकरी केल्यने पैसे भेटतात. पण शेती केल्याने आपला पोट भरतो. जर आपला देशात शेती करणारे शेतकरी कमी झाले.तर आपण जिवंत राहू शकत नाही. त्या साठी जास्ती जास्त लोक शेतीच्या उपयोग केला पाहिजे. नौकरी करणारे लोकानी कधी पण शेतकरी लोकाना कमी पणा समजायच नाही. उलट त्यांचा आभारी म्हणून घ्याची.कारण ते आहेत. म्हणून आम्ही सर्व लोक आहोत. आमचा गावात छोट्यासा गोटूल आहे. त्या गोटूल मध्ये मोठ्या लोकाचा चर्चा सूरु असते. पण मला असा वाटते की हे पध्दत  कायमतरने बदलनार आहे. कारण पिढीन पिढी मेल नंतर सर्व विज्ञ्यानीक यूग राहानार आहे. आणि लोक संख्या वाढणा आहे.आणि घर ,नौकरी,रोजगार,व्यावसाय, शिक्षण, शाळा, हॉटेल,दूकान,असा एक एक समस्या वाढत जातील. आणि आता कायनतराने विकत घ्यावा लागनार असा मला वाटते. कारण आताच ऐवळा प्रदूषन वाळत चालला आहे गावात प्रदूषन नाही  शहरात मध्ये होतो.आणि कायमतराने गावात पण होईल. असा मला वाटते.

नावः कुमारी उज्जवला सडमेक   
वर्गः १० वी