भामरागड तालुक्यातील भ्रष्टाचार


भ्रष्ट म्हणजे लुबाडणे. आपण गडचिरोली जिल्ह्यात राहतो. या भागाला नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखले जाते.या भागात आदिवासी लोक राहतात. आदिवासी हे या भागातले रहिवासी. आपण जंगल, डोंगर आहेत अशा भागात राहतो. लोक आनंदाने जीवन जगतात. पण या भागात भ्रष्टाचार केला जातो हे लोकांना माहित नाही. हे आपल्याला जाणुन घ्यायला नको का? 

  

     आपल्या भागात अनेक गावात अनेक सुविधा पुरवल्या जात नाहीत. ते का पूरवल्या जात नाही? भामरागड

तालुक्यातील काही दुर्गम भागातील गावात वीजेची पुरवल्या नाहीत, तेथील लोकांना वीजेची आवश्यक नाही का?

लोकांना सुविधा न पुरवल्या जाणाऱ्याची कारणे काय? लोकांसाठी जे सुविधा उपलब्ध होते पण ते पुर्णत: का करीत नाही? या मागील कारण काय? कोण असे करीत असतील? याची कारण म्हणजे भ्रष्टाचार आपल्याला उपलब्ध होणाऱ्या सुविधा पुरवण्याऐवजी लोक कमीत कमी सुविधा उपलब्ध करुन तेथील काही रक्कम स्वत:साठी करतात. काही लोक तर थोडेही काम करीत नसतात. लोकांना लागणाऱ्या वस्तूची पूरवठा पूरेपूर करीत नसतात.

   भामरागड तालुक्यातील गावांमध्ये लोकांसाठी आलेली रेशन लोकांना चांगले पूरवला जात नाही. लोक रेशनकार्ड दाखवून कनी पैशाने तांदूळ घेतात. मात्र काही लोकांना रेशन कार्ड नसल्यामुळे दुप्पट पैशातून विकतात आणि उरलेले काही आपल्यासाठी करतात. त्यामुळे गावातील काही लोकांना तांदूळ मिळत नाही . त्यामुळे काही लोकांना उपाशी राहण्याची पाळी येते.

  या भामरागड तालुक्यातील अनेक गावात शाळा नाही. अनेक गावातील लहान मुलांना , लोकांना शिक्षण निळणे आवश्यक आहे. पण मात्र गावात शाळा नाही त्यामुळे लोकांना शिक्षण काय आहे हेच माहीत नाही. म्हणून मुलांना लहान पणापासून खूप काम करावे लागते. गावात प्राण्यांना मारणे, पक्षी मारणे, झाडे कापणे अशा प्रकारचे प्रकरण शिक्षण न मिळाल्यामुळेच होते आहे. त्यांना गरजा भागवता येतो पण मात्र त्यांना सुखाचा जीवन जगता येत नाही. काही लोकांचा जीवनात कमीत कमी सुख निळते. जर पत्येक गावात जर शाळा उभारले तर त्यांच्यात शिक्षणामुळे काहीतरी बद्दल घडू शकेल अन्यत: नाही. काही गावात शाळा आहेत पण शिक्षक शिकवायला नसतात. याची कारण म्हणजे नक्षलवाद्याची भीती. जर लोकांना शिक्षण मिळाला आपल्या भागात एक खुप मोठी समस्या आहे ते पण नष्ट होईल. 

       आपल्या देशात किंवा राज्यात असे अनेक निवडणूक होत असतात. या भागातील लोक कोणत्यातरी  पक्षाकडेमतदान करतात. गावात काही शिकलेल्या लोक अशिक्षित लोकांना कोणाकडे ममतदान करावी हे सांगतात. जे लोक सागतात त्यामुळे सगळे लोक एकाच पक्षाकडे मतदान करतात. असे का हेत असेल? तर ते लोक सांगतात त्यामुळे सगळे लोक एकाच पक्षाकडेमतदान करतात. असे का होत असेल? तर जे लोक सांगतात ते त्याच्यकडुन पैसे घेतात व लेकांना सांगतात की निवचुन आल्यावर वेगवेगळ्या सुविधांची पुरवठा होणार म्हणून त्यांच्याकडे मतदान करा असे सांगतात. त्यामुळे सगळे खुशीने मतदान करतात पण तो निवडुन आलेला उमेदवार एकही सुविधा देत नाही. निवडून आलेला व्यक्ती सांगतो की, मला निवडून द्या हे न ते काम करुन देई. एकही गोष्टीचा कामाची कमी होऊ देणार नाही अशा सांगतात पण एकही काम करीत नाही.



       अनेक गावात लोकांना सरकार काही गोष्टींचा [सुविधांचा] पुरवठा करीत असते तरी पण चांगल्या गोष्चींचा पुरवठा होत नाही. भामरागड तालुक्यातील गावात गाय,बैल,शेळी, या पाळीव प्राणी पाळत असतात त्यांना अनेक रोग होतात अनेक आजारांनी बळी पडतात. त्यांना आजार होऊ नये म्हणुन अनेक प्रकारची औषधांची पुरवठा होतो पण त्या औषधांची मुद्दत संपलेली [expire date] औषधांची पुरवठा होतो. आणि जर ते गोळ्या, औषधे ढोरांना दिला तर त्यांचा आजार वाढतो व त्यामुळे अनेक प्राणी मृत्यूला बळी पडतात.

      तसेच कार्यालयांमध्ये पण लोकांना लुबाडतात. तलाठी सारखे जे लोकांना गाव नमुना,सात-बारा यांसारखे Document लिहुन देतात आणि पैसे मागतात. ते लोकांकडुन पैसे घ्यायला तलाठी आहेत का? त्यांना सरकारकडून पगार नाही का?

    जर आपल्या देशात अशा प्रकारे भ्रष्टाचार होत असेल. भारत हा विकसीत देश बनणार नाही. चला तर मित्रांनो या भ्रष्टाचारी लोकांविरपद्ध आपण आवाज उठवूया या भ्रष्टाचारी लोकांना विकासाचे धडा शिकवूया. उठा आणि जागे व्हा.



    भ्रष्टाचार नष्ट करा

          आणि विकासाला सामोरे जा.”   

 - शामू मडावी. वर्ग १० वा 
  ( मु. कुडकेली. जि. गडचिरोली )

लोक बिरादरीत येणारे पाहुणे

लोक बिरादरी प्रकल्पाला भेट देण्यासाठी दररोज अनेक पाहुणे येतात. पाहुणे बिरादरीत येतात, प्रकाश भाऊंना भेटतात.  त्यांचे अनुभव जाणून घेतात.  ' इथले आदिवासी लोक कसे राहतात ' याची माहिती घेतात, शाळेतील मुले कसे राहतात, कसे शिकतात, काही पाहुणे शहरात प्रत्यक्षात न पाहिलेले प्राणी इथल्या अनाथालयात जवळून पाहतात,प्राण्यांची माहिती घेतात. बाहेरुन आलेले पाहुणे आमच्याशी संवाद साधतात. आमच्या अडचणी विचारतात, काहीवेळेला त्या अडचणी पूर्ण करतात. इथले आदिवासी समोर जायला पाहिजे, इथल्या लोकांची विकास झाला पाहिजे म्हणून येणारे पाहुणे या प्रकल्पाला पैसे किंवा बाकीच्या गोष्टी दान करतात. इथल्या लोकांसाठी मदत पुरवत असतात. या सगळ्या गोष्टींचा आम्हाला खूप खूप आनंद होतो. 

बिरादरीत येणारे पाहुणे तेवढा दुरून येतात. काही वेळेला आमच्यासाठी कार्यक्रम घेतात. आम्हाला मार्गदर्शन करुन जातात. काही नवीन गोष्टी आम्हाला शिकवून जातात. आमच्याशी इतकं प्रेमाने वागतात. ते विचारतात की, तुम्हाला शिकण्यासाठी कोणत्या अडचणी येतात? आमच्या अडचणी सांगितल्या की, पाहुणे आम्हाला पुरवतात. आणि ते सांगतात खूप अभ्यास करा, चांगले शिका, खूप खूप मोठे व्हा. चांगली नोकरी करा. ते सांगताना आम्हाला असं वाटतं की, बाहेरून येऊन इतके छान आम्हाला सांगतात. आम्ही काही तरी करायला पाहिजे. आम्हाला इतक्या गोष्टी पुरवतात. काही अडचण असेल तर आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला पुरवतो. यामुळे आमचा आत्मविश्वास वाढतो.

 

बिरादरीत येऊन इथली सगळी माहिती जाणुन घेऊन बिरादरीत येणारे पाहुणे पण प्रेरणा घेऊन जातात.

               " बिरादरीत येणाऱ्या पाहुण्यांना आमचा रामराम! "

- सिताराम राणा, वर्ग १०
 (मु. मन्ने राजाराम, जि. गडचिरोली)