आदिवासी समाज
                आदिवासी समाज म्हटलं की आपल्याला आठवतं,जंगलात राहणारी दुर्गम भागातील लोक. त्यांचा राहणीमान ,पोशाख व अन्न एकदम शहरी लोकांपेक्षा थोडं वेगळं असतं, पण आता थोडफार विकास झालेलं दिसतं. आदिवासी लोक जास्त प्रमाणात धानाची शेती करतात, पण तेही एकच वेळी जुलै ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर पर्यंत.इतर पिक म्हणून मका ,मिरची, मुंग व इतर भाजीपाला फक्त खान्या पुरता लावतात,पण काहीकाही विकतात सुद्धा.
                                                                               आदिवासी समाजात काही फळ असो वा धान खाण्यापूर्वी सर्वप्रथम पंडूम करतात आणि खातात.पंडूमच्या वेळी मग कोंबळे,बकरे या वस्तू देवाला अर्पन करतात. गावातले सर्व लहान मुलं ते म्हाताऱ्यापर्यंत सर्व पुरूष एकत्र येतात व साजरा करतात. त्यात नोवा पंडूम असोवा जाटा पंडूम. एखादी दिवस सर्व गावकरी एकत्र येतात व शिकारीला जातात.त्यात मिळालेल्या एखादी जंगली प्राण्याचा पर्टी म्हणून सर्व गावकरी आनंदाने खातात व राहतात.
                           इतर सणांच्या वेळी ते वेगनेगळे पदार्थ बनवतात व थोडं थोडं एक दुसऱ्या कुठूंबाला देतात.रात्रीच्या वेळी सर्व गावकरी एकत्र येतात व नाचतात. स्त्रिवर्ग रेला नृत्य करतात तर पुरूषवर्ग ढोलीवर नृत्य करतात. असा संपुर्ण रात्रभर चालतं मग सकाळी आपापल्या कामाले निघुन जातात.कुणी शेतावर जात तर कुणी जंगलात जातात. संध्याकाळी परत गोटूलात(समाज मंदिर) गप्पा मारण्यासाठी जमा होतात.                                                                                                                रोशन.पी.पुंगाटी
                                                    वर्ग९वी  
रोशन.पी.पुंगाटी
    वर्ग९वी

No comments:

Post a Comment