माझा गाव मरमपल्ली
माझा गाव लोक बिरादरी प्रकल्प वरुन ३० कि.मी वर आहे.
माझ्या गावात एकुन १९० घरं आहेत. व मी लोक बिरादरी
प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळेत शिकतो. आणि तिथ
१ ली ते १२ वी पर्यंत आहे.मी माझा गावाला फक्त दोन
ते तीन महिने राहतो.बाकी महिने शाळेत राहतो.
माझ्या बाबा घरी शेती करतो. व आम्हाला पैसे पुरवतो.
आम्ही तीन भाऊ असल्यामुळे एकटाला दिला की एकटाला
राग येतो.म्हणुन सारका देतो.  माझ्या गावात गोंड हा भाषा बोलला
 जातो.आम्हचा समाज गोंड आहे.माझ्या गावात कोणत्याही सण असल्यास
सर्व गावकरी एकात्रीत जमतात.व आप आपल्या बोलतात.गावातला पाठील हा तिथलं मुक्या असतो. तो सांगितल्या प्रमाणे ऐकतात. आणि लोटात
पाणी गेऊन गावतला गोटुलमध्ये येऊन बसतात. सकाळी ६.००
ते ७.०० वाजता आप आपल्या घरी जातात. आणि लोटातला पाणी
सर्वांना देतात. घरातला मोठा माणुस स्वतः बालटीत पाणी आणुन
आंघोळ करतात,व जेवायला बसतात. जेवन झाला की स्वतःचा कामी
लागतात.कुणी शेतात झातो,कुणी नदीत मासे पकडायला जातात.
सायंकाळी ४.३० दरम्यान घरी परत येतात.व हात-पाय धुऊन जेवन
करुन आपल्या विश्रांती घेतात.
अजय मडावी (वर्ग ९ वा)

No comments:

Post a Comment