आदिवासी लोक म्हंटले तर डोळ्यासमोर जंगलाच उभा राहतो. या भागात खूप जंगल आहे. मी या जंगलात राहते. या गोष्टीचा तर मला खूप आनंद होतो. कारण सुध्दा हवा ,मोकडेपणा, जिकडे-तिकडे शांतच शांत किती बंर ना ?असो, या भामरागड तालुकात वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात. माडीया, गोंड, हलबी, या सर्व लोक शेती करतात. त्यानां कोणतेच दिवस सुट्टी नसते. सगळे दिवस सारखेच असतात. होळी हा सण झाल्या नंतर सर्व लोक शेतात मोह वेचतात व ते सगळे रोजचा रोज मोह वाळवतात. आणि पूर्ण मोह पडण्याचा संपत आले की ते सर्व एकत्र जमा करून पुन्हा एकदा वाळवतात. आणि ते मग गरम-गरम मोह एका ढोममध्ये कुदून ठेवतात. जे नविन मोह असतात . ते मोहच कोणीच पहिलेच दारू काढत नाही.आणि भाजून खात नाही. गावातील सर्व प्रत्येक घरातून थोड-थोड मोह एकत्र जमा करतात. आणि दारू काढण्यासाठी जमा केलेले मोह मडक्यात भिजवून ठेवतात. दोन दिवसानंतर भिजलेले सर्व मोहांना चुरा-चुरा करतात. आणि दुसऱ्या दिवशी मग गावातील सर्व लोक एकत्र दारू काढतात. अर्ध मोह भाजतात. आणि गावातील सर्व लोक संध्याकाळी एकत्र जमतात. आणि भाजलेले मोह खातात. आणि दारू थोड-थोड वाटप करतात. आणि मग दुसऱ्या दिवसापासून ज्यांच्य ते दारू काढतात. म्हणजे नविन मोहाच गावातील लोक एकत्र दारू काढणं, ते मोह भाजून खानं या प्रकरणाला आम्ही माडिया भाषेने (भुंरीग) करणे असे म्हणतो.हे आम्हचासाठी एक पुजाच असते. नंतर मग सर्व लोक शेतात कटाई करतात.नंतर लाकडे जमा करतात, शेतात सुधारणा करतात,तेंदूपत्ता तोडतात. तेंदूपत्तापासून मिळालेला पैसे ज्या दिवस देतात, त्याच दिवस दिसतात दुसऱ्या दिवस मग दुसऱ्याचा हाती जातात.
आमचा आदिवासी बाह्या मासिकपाळीला झाल्या तर त्यांना घराबाहेरच राहावे लागते. माझ्या गावातील बाह्या मासिकपाळीला झाले तर घराच्या सर्व काम करतात. पण घराच्या आत जात नाही. आमच्या भागातील काही गावामध्ये तर मासिकपाळीला झालेली बाह्या घराच्या आत तर राहत नाही पण गावातसुद्धा राहत नाही. मासिकपाळीला झालेल बाह्यासाठी गावाबाहेर घर केलेले आहे. त्यांना दररोज घरातून जेवन द्यावा लागतो. आणि काही गावांमध्ये तर एखादी मुलगी मासिकपाळीला पहिल्यांदा झाली तर तिला कोणताच पुरुषाला दाखवत नाही. ज्या दिवशी ती आंधोळ करून घरी येते. त्या दिवशी गावातील सर्व बाह्या येतात. आणि तिच्या पुजा करतात. जसे काही लोक वाढदिवसाला नविन भेटवस्तू देतात. तसेच तिलाही नविन-नविन भेटवस्तू देतात.
आमचा या भागात उन्हाळात लग्न होतात. शहरतले लग्न आणि आमचाकडचे लग्न यात खूप फरक आहे. आमचाकडचा लग्नमघ्ये पहिल्यादा मुलांचे घरचे लोक मुलीचा घरी जातात. आणि आडनाव काय? तिच्या जात कोणता ? ती किती देवाची आहे ? हे सगळं माहित झाला तरच मग लग्न करायचा की नाही हे ठरवतात.जरी ते दोघे प्रेम करत असले तरीही. मग तीन-चार दिवसानंतर मुलीचा घरचे लोक मुलाचा घरी जातात. आणि पुन्हा काही दिवसानी मुलाकडचे लोक मुलीचा घरी जातात. आणि गावातील काही लोक त्या दोघांना काही प्रश्ना विचारतात. आणि मग लग्नाचा दिवस ठरवतात. त्या दिवशी गावातील सर्व लोकांना जेवन द्यावा लागतो. आणि त्या दिवसापासून ज्यांच्या घरी लग्न आहे. त्याच्या घरी गावातील सर्व लोक नाचयला जातात. रात्रीचे 9 वाजेपर्यंत तरी नाचावा लागतो. असे दररोज लग्नाचा दिवस येईपर्यंत नाचावा लागतो. लग्नाचा दिवस आले की पहिल्या दिवस जमलेले लोकांना भाजीपाला व वरण याचाने जेवन द्यावा लागतो. दुसऱ्या दिवस मग चिक्काण ,मट्टण व भाजीपाला याचाने जेवन द्यावा लागतो. आणि मुख्या म्हणजे लग्नाचा दिवशी दारू, मट्टण, चिक्कण असावेच लागतो. लग्नासाठी येणारे सर्व लोक तांदूळ ,दारू,साखर, तिकट, हळद, मीठ,तेल आणि पतत्रळे इत्यादी वस्तू नेतात. आणि लग्न करण्याचा पद्धती तर शहरतले लग्नपैक्षा खूप वेगळा असतो. लग्न दोन दिवसाचा असते. म्हणून एक दिवस सर्व लोक जमतात. आणि दुसऱ्या दिवशी लग्न असतात. ज्या दिवशी सर्व लोक जमतात. त्या दिवशी लग्न करणाऱ्या मुलीला गावातील बाह्या तिला नदिवर मासे पकडयला नेतात. मासे जर मिळल्या तर तिच्या सर्व मैत्रिनीना बोलावून त्यांना जेवन द्यावा लागतो. आणि तिला संध्याकाळी देवात नेतात. आम्ही ज्या देवळाला माडीया भाषेने (पोचेम)म्हणतो. त्या दोवळात जातांना सर्व जण नाचत जातात आणि तिथून येतांनासुद्धा नाचत येतात. देवळात जातांना ती लग्नाला लावणारे सर्व सामान देवळात नेतात. त्या देवळात तिला कडेवर घेऊन फिरतात. आणि जो तिला कडेवर घेऊन फिरतो. तो तिला भाऊजी लागणारा व्यक्ती असायला हवा. रात्र मग तिला सर्व बाह्या मांडीवर घेऊन गाणे शिकवतात.आणि दुसऱ्या दिवशी मग लग्न असते त्या दिवशी मग मुलांकडचे लोक मुलीकडचे लोकांना विचारतात कि, तुम्हाला काय काय हवा आणि किती. तेव्हा मलीकडचं लोकांना काहिना काही वस्तू घ्यावाच सागतो. तेही एका मर्यादापलीकडचेच पैसे असेल तर पाच दहा रुपये व तांदुळ असेल तर एक दोन ओंजळभर घ्यावा लागतो. आणि ज्या लोकांना कडते, समजते व आपल्या मुलीबद्दल प्रेम असते तेच लोक एवढं वस्तू घेतात. ज्या लोकांना आपल्या मुलीबद्दल प्रेम नसते किंवा तिच्या भविष्यात होणारा त्रास ज्यांना कडत नाही. ते लोक मग हवा तितका पैसा, हवा तितका तांदूळ व हवा तितका कोणत्याही वस्तू घेतात.मग त्यांच्या लग्न करतात. लग्नात सर्व लोक त्यांना नविन संसारासाठी नविन-नविन वस्तू देतात. लग्नाचा दिवशी संध्याकाळी त्या दोघांना एकाच ठिकाणी गावाताल बाह्या अंधोळ घालतात. त्यात पण खूप गंमत असते. त्या दोघांना एकमेकांचा अंगावर पाणी ओतायला लावतात. आणि त्या दोघांना एकाच ब्रशने दात घासयला लावतात. पहिल्यादा मुलगा घासतो आणि नंतर त्याच ब्रशने मुलगीला घासयला लावतात. हे तर झालाच पण त्या दोघांना एकमेकांचा तोंडात थुंकायला लावतात. काही-काही मुली तर चेहऱ्यावर थुंकून देतात. हे सगळं त्यांना करायवच लागतो.आणि बाह्या ते करूनच घेतात. हे सगळं मी स्वत: बगितली.
माझ्या गावाला एखाद्या व्याक्तीचा मृत्यू झाला . तर त्याचा सर्व नातेवाईकांना बोलवतात. आणि जर त्याचे सर्व नातेवाईक फोचलेले नसतील. तर त्याला एक दिवस असाच ठेवतात. आणि गावातील सर्व लोकामधून प्रत्येक घरातून एक जण त्याचा रखवली करायला जातात. जर एखादी व्यक्ती खूप आजारी असून मृत्यू झाला.तर त्याचा नातेवाईक फोचलेले नसले तरीही जाडतात. आणि आजारी नसतांना मृत्यू झाला तर त्याला मातीत दफान करतात. आणि दुसऱ्या दिवसी मग सर्व जण त्याच जागेत जाऊन पूर्व दिशेला सपाट आणि मोठ असा दगड ठेवतात. व तांदूळ आणि वालेचे शेंगा यांचा मिश्रण करून एका टोपलीत ठेवतात. मग आलेले सर्व जण आपल्याला हावा तेवढा पौसा आणि मिश्रळलेले तांदूळ त्या दगडात टाकतात. आणि ते सर्व जमा करून त्यांच घरचाना देतात.
संगीता विडपी ( मु. हिदूर )
वर्ग 9 वा
No comments:
Post a Comment