आदिवासींच्या शोषण

मी महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यात छोट्याशा आदिवासींच्या गावात राहणाऱ्या एका आदिवासी बाईनी मला जन्म दिल आहे. मी आदिवासींच्या पोटातून जन्माला आलो म्हणून मला थोडा तरी द्वेष वाटत नाही. मी या आदिवासींच्या भागात आहे म्हणून मला समाधान वाटते, मी पुण्य झालो.मी या जंगलाची व या आदिवासी संस्कृतीची लाभ आहो.


मी आदिवासी संस्कृतीच्या लाभ घेतला मला असे आढळून आले की, आदिकाळात आदिवासी मानवांनी त्यांच्या डोक्यात जे काही प्र9श्न उमटत होत्या, त्या प्रश्नांची उत्तरे त्याकाळी विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकास झाल्या नसल्यामुळे किंवा नीरक्षरतेमुळे त्याना सहाजासहजी मिळत नव्हत्या. त्यामुळे ते आपल्या डोक्यातील प्रशनाची तान कमी करण्यासाठी ते आपल्याला जसं वाटत होतं, तसे ते खरे नसताना सुद्धा समाजापुढे मांडली, आणि तीच प्रशनांची उत्तरे आज समाजामध्ये जसाच्या तसाच रुढ झाली आहे. सर्व आदिवासी लोक त्याच मांडलेल्या उत्तरांच्या, विचारांच्या, भावनांच्या वापर करुन आपल्या कामे पुर्ण करतात. या सर्वांच्या दुष्परिणाम लोकांच्या समोर होत असताना देखील ते त्याच रुढी-परंपरेचा वापर करतात. यासर्वांमुळे आदिवासी समाजात अंधश्रद्धा वाढत जातना माझ्या डोळ्यांना दिसते.


आदिवासी समाज हा अंधश्रद्धे मुळे गोंधळून गेला आहे. तरी पण मला अजून माझ्या डोळ्यांना दिसलं नाही की गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींना अंधश्रद्धेपासून मुक्त करावी म्हणून अंधश्रद्धा होणारा. अंधश्रद्धेमुळे चांगल्या तरुण-तरुणींची शिक्षण मोडते. स्त्रियांना कमी स्थान प्राप्त झालेलं दिसतं, या आदिवासींच्या रुढीपरंपरेमुळे स्त्रिला स्व:ताच्या घरच नाही. ती सासऱ्यातुन माहेरी गेली, की माहेरीवाले राहू देत नाही. सासरीत काही चूक झाल्यास तीला घराबाहेर अकलून देतात. तिला आपल्या घरी संपत्ती वाढवण्याची व आपल्या मुलंबाळांला आपल्या पायांनी उभ्या करण्याची खुप उत्सुक्ता असते. पण काही करील बिचारी तिला स्व:ताच्या मालकीची घरच नाही. या सर्वांमुळे समाजातील स्त्रिया गोंधळून गेल्या मी पण सर्व प्रकरणं पाहून गोंधळून गेलो.


मी माझ्या गावात आदिवासींच्या लग्न नेहमी बघतो. पण मला लग्न बघून दु:खच वाटतं. घरी लग्न जेव्हा असतं. तेव्हा घरातील सगळं संसार घरचे मालकबघू शकत नसतात, त्यामुळे  गावकऱ्यांवर विश्वास ठेवून तो मालक आपल्या संसारत असणाऱ्या कामे त्या गावकऱ्यांवर सोपवतात, पण गावकऱ्यांनी त्या मालकाच्या संसारस चोर-लुटारी करुन त्याच्या नील बनतात. तो बिचारा आपल्या पोराच्या किंवा पोरीच्या लग्न करुन पुर्ण नीलच बनतो . तो आपल्या पोरा पोरीच्या लग्न चांगल व्हाव म्हणून अनेकांकडून विविध प्रकरच्या संपत्ती मागवलेला असतो. गावकऱ्यांच्या धोक्यामुळे व संपत्तीच्या परतपोडीमुळे तो गोंधळून जातो, आण आत्महत्याला सामोरे जातो. बिचारे त्याचे पत्नी-मुलं-बाळं वाऱ्यावर असतात. हे सगळं प्रकरणं पाहून सला खंरच माझ्या डोळ्यात पाणी येते.


मला माझ्या आदिवासी समाजाविषयी कुठेही बोलायला लाज वाटत नाही. कारण माझ्या जर आदिवासींना सुधरवायचं असेल. तर आपण एकटे सुधरवू शकत नाही. एक-दुसऱ्याची मदत घ्यावीच लागते. त्यामुळे आदिवासी समाज कसा आहे ? हे सर्वांसमोर मांडणे अत्यंत आवश्यक आहे. समाजाची स्थिती बघुनच लोक मदतीला पुढे येतात.               


महाराष्ट्रातील आदिवासींच्या जिल्ह्या-म्हणून नंदुरबार-व गडचिरोली या दोन जिल्ह्यांना ओळखली जाते. या दोन जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या प्रमाण अतिशय जास्त आहे. त्यात मी पण एक आदिवासी आहे.माझ्या या गडचिरोली जिल्ह्यात व नुदुरबार जिल्ह्यात साक्षरतेची प्रमाण अतिशय कमी आहे, म्हणूनच आदिवासीं अंधश्रद्धेत गुंतून आहेत. पण माझ्या आदिवासींना जे लोक कमी समजतात, त्यांचा मला खुप राग यातो. कारण माझ्या पण आदिवासींच्या काही ना काही कौशल्ये असतात आवडी-निवडींमध्ये व कौशल्यांमध्ये पठाईत असतात, हुशार असतात, तर त्यांना कमी समजण्याची कारण तरी काय ? कमी समजण्याऱ्यांना पण त्यांना आवडलेली व नीवडलेली गोष्ट जमते, पण सगळ कोणालाच जमणे कठीण आहे
                                                                         

   *धन्यवाद *

  -  बालाजी आत्राम (मु. बेजूर)
      वर्ग 09 वा

No comments:

Post a Comment