भामरागड तालुक्यातील लोकांचे जीवन

मी या भामरागड तालुक्यात राहते. भामरागड म्हटलं की सर्वांचा डोळ्या पुढ जंगलच उभ असतं. तरी पण मी या जंगलात राहते. म्हणून मला खूप अभिमान वाटते. 

या भागात आदिवासी लोक राहतात. या भागात खूप जंगल आहे. या जंगलात वेगवेगळया प्रकारचे झाडे आढळतात.भामरागड तालुक्यात लहान-लहान खेडे गाव आहेत. या खेडे गावातच आदिवासी लोक राहतात.इथले लोक कसे राहत असतील? ते काय खात असतील? ते कोणते भाषा बोलत असतील ? अशा प्रश्न कोणालाही पडू शकतील.तर स्त्रिया अंगावर साडी, लुगडा नेसतात. तरुन मुली सलवार घालतात. पुरुषांनी पॅंट, धोतर, शर्ट हे वस्त्र वापरतात. पशुपालन, शेती, कुकूटपालन हे व्यवसाय करतात. या भागात जास्त प्रमाणात शेती हे उत्पादन केली जाते. त्याचबरोबर मकाचेही उत्पादन केले जाते. इकडचे लोक माडिया, गोंड, हलबी, गोंडगोवारी अशा प्रकारचे भाषा बोलली जातात. या भागातील लोकांना सगळे दिवस सारखेच असतात. इकडचे लोक जास्त अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत होते. 

पुर्वीचे लोक दररोज शिकारी करायला जंगलात जात होते. जर एखादी प्राणी भेटला की त्यांना खूप आनंद व्हायचा. नंतर मग सर्व लोक एकत्र  येत होते आणि स्वयंपाक बनवत होते. नंतर  जेवन करायचे आणि रात्री नाचतं अशा प्रकारे मनोरंजन करत होते. काही वर्षानंतर आदिवासी लोकांना कळायला लागला की बाहेरचे लोक कसे राहतात? त्यांना बघून हळूहळू बदलत गेले. या भागात शिक्षणाचा प्रसार झाला. तरी पण यांना शिक्षण म्हणजे काय ? हेच कळत नव्हता. तरी पण नंतर हळूहळू इकडचा लोकांनी आपआपल्या मुलांना शाळेत घालू लागले . अशाच प्रकारे प्रत्येक गावातील मुल शाळेत शिकायला जावू लागले. शाळा शिकून या भागातील आदिवासी लोक बदले. तरी पण अशिक्षित लोक जास्त आहेत.  

या भागातील लोकांना खूप अडचणी येतात. इकडचे रस्ते चांगले नाही .आणि गावांच्या जवळपास दवाखाना नाही. जर एखद्या गावातील माणूस आजारी असला. तर त्याला प्रथम पुजारीकडे घेवून जातात. तो आजारी माणूस बर झाल्या नाही . तर त्याला दवाखानात घेवून जायचे म्हंटल तर दूर-दूर अंतरावर चालात न्यावा लागत होते आणि पावसळ्यात तर खूपच अडचण येतात. कोणकोणत्या गावाला तर नद्या ओलांडून न्यावा लागतो. जर एखादी दिवशी खूप पाऊस आला तर नद्या पूर्ण  भरलेले असेल तर एक-दोन दिवस नद्यांन मधल्या पाणी उतरतच नाही. जर आजारी माणसाजवळ गोळ्या  औषध नसेल तर तो मेलाच समजायचा कारण नद्याना पूल बांधलेला नाही. लोकांना एवढा अडचणी येतात. तरी हे लोक कोणालाही तक्रार करत नाही.मला असा वाटते कोणालाही न घाबरता .जे शिकलेले लोक आहेत .त्यानी तक्रार करायला पाहिजे. असाच चुप बसून काही उपयोग होणार नाही. जे शिकले नाही  त्या लोकांचे काही  प्रश्न किंवा अडचणी असतील .ते आपण समजून घ्यायला पाहिजे.
 * धन्यवाद *
मंजु मडावी (मु .इरपनार)
वर्ग 0९वा



No comments:

Post a Comment