शिकार

आदिवाशींच्या शिकारी करण्याचा उद्देश म्ह़णजे एक तर खाण्यासाठी आणि गावाच्या एखाद्या माणूस मेला तर त्याच्या शोध घेण्यासाठी शिकारी करावी लागते. जर शिकारीवेळी कोणत्याही गर्भाशाही मादी प्राणी भेटलं असेल तर  त्या माणसाला कोणीतरी जादू केली आणि त्यामुळे तो माणूस मेला असे समजूत काढतात. जर प्राणी भेटलं नाही तर पुन्हा पुजारी केली जाते आणि परत शिकारीला जंगलात जातात. हे प्रकरण पुजारी लोक सांगत असतात. हे आदिवाशींच्या रूढीपंरपरेच्या अंधश्रद्धा आहे.

आता आपण शिकारी कशी केली जाते याची माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम गावकरी लोक संध्याकाळी एकत्र जमतात. त्यामध्ये गावाच्या मुख्यमाणुस पाटील असतो. ही सभा गावाच्या गोटुलात किंवा चौकात बसली जाते. त्यामध्ये गावकरी लोक एकमेंकाच्या विचार आणि मते व्यक्त करत असतात. मते ठरवत असताना मात्र काही गोष्टींची विचारत घ्यावा लागतो. ते म्हणजे शिकारी करायला कोणत्या बाजूकडे जायचा. शेवटी कोणत्या ठिकाणाहून परत यायचं. सकाळी किती वाजता निघायचं इत्यादी गोष्टींची विचार केली जाते.

शिकारीला जाण्यासाठी एका घरातून फक्त एक व्यक्ती किंवा त्यापेक्षा कितीही गेल तरी चालेल. जर एका घरातून एकही व्यक्ती शिकारीला गेले नाहीत तर त्या घराच्या व्यक्तीकडूंन दंड घेतली जाते. म्हणून प्रत्येक घरातून एकतरी व्यक्ती शिकारीसाठी जात असतो. सकाळी शिकारी जाण्यापूर्वी प्रत्येकाच्या घरी जेवण बनवली जाते. कारण शिकारीला जाणाऱ्या लोकांसाठी . काही माणसे जाताना जेवणाचा डबा , कुऱ्हाड आणि पाणी पकडतात. शिकारीला जाण्यासाठी मात्र स्त्रियांनाही परवानगी असते. नंतर ठरवलेल्या वेळेनुसार शिकारीला जातात. मात्र सोबत कुत्रे नेत नाहीत. महत्त्वाचा सुचना म्हणजे कोणीही जोरजोरात ओरडायचं किंवा जोरात गोंधळ आणि बोलायचं नसते.

शिकारीसाठी मोठी जाळी बनवली जाते. अशा प्रत्येक गावात चौदा किंवा पंधरा जाळे असतील. जाळे लावण्यासाठी बांबूचे मोठे काठी बनवलेले असतात. सोबत एक भाला घेतात. जाळ्याचा उपयोग शिकारी करण्याचा दोन पद्धती आहेत. १)यामध्ये position जसे पोलीस पूर्णपणे शुत्रांना घेर लावतात त्या प्रकारे असते. ज्या जागेत आपण शिकारी करणार आहोत, त्या जागेला माडीया भाषेत गुंदा असे म्हणतात. गुंदा म्हणजे विविष्ट अशा खुप अंतरवरचा गोल जागा होय. पहिल्या पद्धतीमध्ये संपूर्ण माणसे गोल करतात. एका बाजूला मात्र जाळे लावतात. जाळे लावतांना मात्र दोन जाळी एका ठिकाणी आडवे बांधली जाते. अशा काही दोन दोन जोडी जाळी विविष्ट अंतरावर बांधली जाते. दोन जोळी एका ठिकाणी बांधली जाते. त्याला माडिया भाषेत (हुंदीओंढोळ)असे म्हणतात.हुंदी ओंढोळ म्हणजे दोन जोडी होय. आणि पूर्णपणे माणसे गोल केली जाते. मध्ये कोणता प्राणी आहे की नाही हेच कळत नाही. काही सात-आठ माणसे जाळी लावलेल्या जागेकडून जिकडे माणसे पूर्णपणे गोल केले असते. त्या दिशेला आवाज करत जातात. जर मध्ये प्राणी उठला तर गोल केलेल्या माणसांना ओरडायला मिळतो. मात्र जाळी लावणाऱ्या माणसांना ओरडायला भेटत नाही. त्यांना मात्र चुपचाप राहवा लागते. गोल केलेल्या माणसांनी जर जास्त ओरडले तर प्राणी पूर्णपणे घाबरून जातो. प्राणी घाबरून गेल्यामुळे मधुन जाणाऱ्या माणसांच्या विरूद्ध दिशेने प्राणी सरळ जिकळे जाळी लावले आहेत. त्या दिशेला पळत सुटतो. त्यामुळे प्राणी जाळीवर पडू शकतो. या पद्धतीला माडिया भाषेत (होल्ले)असे म्हणतात.

दुसरी पद्धत म्हणजे एका साईटला जाळी लावली जाते. दोन कि.मी इतक्या अंतरावर जाळे लावले जाते. यामध्ये गोल करत नाही. यामध्ये माणंसाची position आडवी असते. म्हणजे सगळे माणसे आडव्या पद्धतीत विविष्ट अंतरावर उभे राहून ज्या साईटला जाळे लावली आहेत. त्या दिशेला आवाज करत किंवा ओरडत-ओरडत चालत जातात. जर मध्ये प्राणी उठला तर  तो प्राणी सरळ जिकडे जाळे लावले त्याच दिशेने पळते. पण केव्हा–केव्हा उलटाही धावण्याची शक्याता असतो. सरळ प्राणी धावला म्हणजे ते जाळीवर पडू शकतो. पण एक–एक वेळ प्राणी  पळून जातो. तेव्हा मात्र लोक खुप चिडलेले असतात. ज्या व्यक्तींमधून प्राणी पळून गेला तर त्याला खुपच शिव्या  देतात. बहुतेक लहान मुलांना शिव्या देत नाही. परंतु मोठ्या माणसांना तर नक्कीच.

शिकारी करण्यासाठी गावातून खुप लांब जात असतात. केव्हा–केव्हा हरवण्याची शक्यता असते. तिकडे थोडा सात– आठ मिनिटांचा आराम मिळतो. तेव्हा जाळी पकडलेले माणसे आणि बाकीचे माणसे एकत्र भेटतात. तेव्हा जाळी कोठे-कोठे लावायचा आणि कितक्या अंतरावर लावायचा याची मॅनेजमेंट केली जाते. सायंकाळी वापस घरी येतात. जर एखादा प्राणी शिकार झाला असेल. तर त्या प्राण्याला गावात आणतात. परंतु त्या प्राण्याला गावाबाहेरच ठेवतात. प्राणी ठेवलेल्या जागेवर रखवली म्हणून दोन–तीन माणसे ठेवतात. बाकीचे माणसे अंघोळ वगैरे करुन येतात. येथे मात्र स्त्रियांना यायला देत नाही. प्राण्याला कापतात. कापल्यानंतर मासाचे लहान–लहान तुकडे केली जाते. नंतर शिकारीसाठी आलेले माणसे मोजली जाते. त्यानुसार पत्रवळे टाकली जाते. पत्रवळ्यांवर मासाचे लहान तुकडे टाकली जाते.त्यानंतर प्रत्येक घरातून किती व्यक्ती शिकारीला आली होती. त्यांची मोजणी केली जाते. त्यानुसार पत्रवळावर ठेवलेली मास देतात. ज्या व्यक्तीचा जाळीवर प्राणी पडला त्याला मात्र प्राणीचा एक किलो वजनचा मासाचा तुकडा हिसा म्हणून दिली जाते. आणखी तिकडून प्राणी आणलेल्या
केतन मडावी (मु. बोटनफुंडी)
वर्ग 09 वा

No comments:

Post a Comment