ज्या
वेळी निवणूकी पोहचतात.त्यावेळी नेते लोक या आदिवासी विभागात येतात. जेव्हा त्यांना
निवडून यायच्या असतो.त्यावेळी ते गावातील लोकांना म्हणतात की,आम्हाला निवडून द्या.आम्ही तुम्हाला
तुमच्या विभागाला विकसित करून देणार आहोत. तुम्ही आमच्याकडे व्होट द्या असे
म्हणतात.या आदिवासी विभागात त्या आदिवासींच्या अशिक्षितमुळे त्यांना
फसवतात.त्याच्या हातात शंभर रूपये देतात.आणि त्या आदिवासी लोकांना आमच्याकडे व्होट
टाका असे म्हणतात. त्या आदिवासीना शंभर रूपये भेटात असल्यामुळे त्यांच्या बाजूने
व्होट देतात.
ज्यावेळी
आमदारांसाठी निवडून येतात.त्यावेळी ज्या लोकांनी व्होट दिले त्या लोकांच्या गावात
येणे सुद्धा विसरतात.त्याच्या असाच असतो. जेव्हा पर्यंत आपल्याला लोकांनी निवडून
देत नाही. तेव्हा पर्यंत लोकांना नमस्कार करायचा.निवडून आल्यानंतर ते म्हणतात की, तुमच्या विभागाचा विकास करणार.असे फक्त
त्या आमदार लोकांच्या तोंडातून शब्द निघतय. पण ते काही कार्यामधून दिसत नाही.
आपल्या देशातील या नेता लोकांच्या हाच प्रॉब्लेम आहे. जर आपल्या विभागाचा असाच लुट
करणारा राजकारण असल्या तर आपल्या देशाच्या किंवा आपल्या विभागाचा कधिच विकास होणार
नाही. जर विकास करायचा असेल तर या सर्व नेता लोकांचा भ्रष्टाचार मिटवून द्यायला
पाहिजे.काही नेता लोक फक्त संपत्तीसाठी नेता बनतात.जर आपल्या समाजाचा विकास करायचा
असेल तर या नेतांच्या चुकीच्या गोष्टी सुधारणा केली पाहिजे.
आपल्या
देशाच्या नेता लोकांच्या अत्यंत वाईट स्थिती आहे. नेता होण्यासाठी ते काही पक्ष
तयार करतात. त्या पक्षांमधील लोकांना अशा वाटते की आपल्या पक्ष निवडून
याव्हा.यामुळे त्या पक्षांमध्ये वाद निर्माण होते. त्यामुळे देशाच्या किंवा
समाजाचा विकास होत नाही. या सर्व गोष्टीमुळे समाजामध्ये वाद निर्माण करून
देतात.आणि व्होट मिळवण्यासाठी प्रयत्न करतात.
- विलास वेलादी (मु. चंद्रा)
वर्ग १० वा
No comments:
Post a Comment