आम्ही मुले एक एक पाऊल पुढे जाऊया ,
येणारा पिढीच्या भविष्या घडवूया.
लोक बिरादरी प्रकल्पात नेहमी प्रमाने कॉंम्प्यूटर हा क्लास घेतला
जातो. त्यात फक्त कॉंम्प्यूटर विषयाच शिकवणे किवा शिकणे इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या
विषयावर चर्चा करने,वेगवेगळ्या पुस्तक वाचने त्यावर स्वतःच्या मत मांडणे, याशिवाय
पेपर वाचने, कॉमकीनवर बसने, नेटवर आवश्याक माहिती शोदणे, स्कायपवरून बोलने अश्या
वेगवेगळ्या पध्दतीने कॉम्प्यूटरच्या आम्ही वापर करतो. आम्ही आमच्या आवडीने
कॉम्प्यूटर शिकतो. नूकतेच सरांनी एक कादंबरीच्या पूस्तक आणले या पूस्तकाच्या नाव
आहे शोद यात १९६० पासून गोष्टाला सुरवात होतो. त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळ
होतो. पुस्तक वाचल्याने फक्त ज्ञान वाढते इतकेच नसतो. त्यापासून आपल्याला नविव
शब्दांच्या अर्थ कळतो, वेगवेगळ्या माहीती मिळतो. तर पाऊया या शोद कादंबरीत काय
आहे.
गोंदाजी नारो हा शिवाजी महाराजांच्या काही तरी माहिती
त्यांच्यापर्यत पोहचवण्यासाठी जीवाचा परवा न करता तो धावत सुटतो. मध्येच
मुघलांच्या ताब्यात सापाडतो.
साहील नावाचा मुलगा तो कॉम्प्युटरचे इंजिनीयर असतो. त्याला पहाडावर
दोरीद्वारे चढायला लहानपणापासुन आवड होती. परंतु विकीने साहीलला सालेरी कील्लावरून
ढकलून दिले.
केतकी ही
मुलगी सतत खोट बोलते, खोट बोलणं, खोट नावाने काम करणं, वेळ प्रसंगी कसे त्यापासुन
सुटका व्हायचे या सर्व शिक्षण आधिच केतकीचे काकांनी केतकीला दिले होते. केतकी,
शौनक, क्लारा, निनाद हे चौघे मित्र असतात. यांनी हरवलेला इतिहासाच्या शोद घेतात.
यांना इतिहासाच्या खूप आवड असतो. यांच्यामधुन विकीने क्लाराचा खून करतो. या
खुनेच्या केस या तिघ्यांवर टाकून देतात. या तिघ्यांमधून पोलीसांनी निनादला अटक
करतात.
स्कायलर
कंपनी या कंपनीचे मालक आबाजी आहेत. या कंपनीने सूरवातीला दारू पासून तर आता शिवाजी
महाराजांचे सुरात लूटीचे खजिन्या शोदायला सूरवात केलेला आहे.
मला हा कादंबरी
संपूर्ण वर्णन, इतिहास, रहस्य, केतकीच्या हूशारीपणा, खोटेपणा अशा कादंबरी मी
पहीलांदा वाचली म्हणून खूप आवडला. पूस्तक वाचत असतांना सारखा पूढे काय होणार हेच
विचार यायचे. पेपर सूरू झाले तेव्हा तर मी म्हणात होती की, आता पूढच्या गोष्ट
वाचायला मिळणार नाही. हेच विचार मनात यायचे. पूस्तक वाचतांना केव्हा केव्हा कंटाळा
पण यायचा तर केव्हा केव्हा मज्ज पण यायचा.
- सुनिता वाचामी (कारमपल्ली)
वर्ग ११ वा
No comments:
Post a Comment