हरवलेल्या खजिन्याचा " शोध "

आमच्या संगणक वर्गात  ' शोध ' नावाच्या कादंबरीचं अभिवाचन सरांनी केलं, आम्ही रोज रात्री ऐकत होतो. ते कादंबरी १६६० साली शिवाजी महाराजांचा सुरत लुटीच्या काही हरवलेल्या खजिन्याचा शोध घेण्यात लिहिलेल आहे.
 
त्यात अस आहे की एकीकडे केतकी शोध लावते तर दुसरीकडे बलढया शक्तीचा आबाजी आहेत हेएकमेकांचे शत्रुच आहेत. केतकीला दोन मित्र आहेत पण तेही इतिहासात आवड असणारे पण केतकी मात्र खोजणार आहे.
इकडे आबाजी मात्र केतकी व तिचे मित्र काय काय करतात हे लपुन माहिती मिळवत ते हे कळलामुळे ते कुठे कुठे जतात तेही माहिती मिळवायचे आणि एका ब्रिटिश तरुणीचा खुनाच  त्याच्यांवर खोट आरोप लावुन पोलिसाना पकडण्यास सांगितले त्यातच आभजी राजकारनात असल्यायुळे ते शक्य झाल.केतकी सोबत आता शौनक होता पण ते दोघ पोलिसांच्या हाती सापडले नाही ते हुशार होते त्यातला त्यात केतकीला वेळ आली तर काय काय करायच हे तिला तर ट्रेनिंग  दिलेलच होत त्यामुळे ती कोणत्याही काम करायला घाबरत नव्हती अशी ती धाडसी होती.
 
असं झालं की आबाजी जे शोधतात त्यातलं केतकीला काय हवंय हे मात्र माहित नाही पण आबाजी मात्र त्या शौनक व केतकीला पकडण्यास अगदी जवळ पोहोचलेले आहेत. पण यांनीही त्यांच्या कामत अगदी शेवट पोहचलेल असल्यामुळे केतकीचे डोळे तर रात्रीपण चमकत असे पण आभजीना मात्र ते दोघ आपल्याहुन पुढे आहेत म्हणुन कळल आहे. शौनक व केतकी हे पोलिसांच्या हाती सापडतात का ? जर नाही सापडले तर खजिना कोणाला पाहिले सापडेल हे वाचण्याची खुप उत्सुक्ता आहे.
 
सुरुवातीला तर गोष्टी ऐकताना कधी कधी बोर वाटतं पण आता शेवट असल्यामुळे असं वाटतं की आज आता वाचावं. झाल अस आमचा सामाईक परिक्षा असल्यामुळे वाचन थांबवल होतो. पण परिक्षा झाला नंतर ते पुस्तक वाचलं, मला लक्षात आलं की ज्यांच्याकडे कितीही शक्ती आपल्या पाठीशी असली तरी त्यांनी जर योग्य मार्गाने वापर केला नाही तरते कधीच शक्य होणार नाही. म्हणजेच आबाजीकडे खुप शक्ती व साधन असूनही त्याना जे कामकरायचे होते ते काम शक्य झालच नाही. ते खोट कारणाने माहिती देत आले पण शेवट मात्र जे घडणार होत तेच घडलं.

- डिंपल  कुरसामी  (मु. हिनभट्टी)     
   वर्ग  ९ वा

1 comment:

  1. खूप सुंदर लिहीलं आहेस डिंपल!

    ReplyDelete