गावाचे समस्या

माझा गाव हा गडचिरोली जिल्हात भामरागड तालुक्यात अंतिम टप्प्यात नक्षालवादींचा आतिदूर्गाम भागात आहे. आणि त्या भागातील माणंसानी नक्षालवादींचा भागात आसल्यामुळे कमीत कमी शिक्षाणाचा महतत्वा कळत पण पूर्वीच्या काळात शिक्षाणाचा महतत्वा नसे. आता खूप शिक्षाणाचा महतत्वा आहे. मन्हूण आता शिक्षाणाला खूप महतत्वा दिले जाते. मन्हून आदिवासी लोकांना कमीत कमी शासनाचा नौकरी मिळतात. आणि नक्षालवादी भागात आसल्यामुळे सर्व लोकांना त्यांच्या  भागात आसल्यामुळे लोकांना गुप्तापणे रहावा लागतो. आणि आपल्या कडील लोकांनी जास्ता प्रामाणे शेतीचा व्यावसाय करतात. आणि त्या व्यावसायात शेतकरी जेवढा कष्टा करेल तेवढा शेतकरीला फळ मिळतो. आणि आता आदिवासी लोकांनी शासनाचा हातावर जात आहे. मन्हूण आदिवासी लोकांनी हळूहळू सुधरू लागत आहे. तरी पण आदिवासी लोकांना नक्षालवादि गावात येऊन लोकांना किंवा मुख्या म्हणजे गावातील मुख्या माणसाला ठेवतात. म्हणजे गावतला त्यांच्या काम करून देणारा. उदा त्याना जेवन नेऊन देणे.आशा प्रकारे नक्षालवादींचा कायद्यात रहावा लागतो. जर एखादा चूक आपण केलो तर काही करं नव्हे रे बबं. मन्हूण नक्षालांच्या गुलामावर आदिवासी लोक राहतात.
तरी पण आदिवासी लोक आंतिम भागात आसल्यामुळे सागळा त्या भागातील लोकांना नक्षालांच्या भीतीमुळे त्याच्या विरूद्धा ज कोणी असेल त्याच्याकळे गेला तर त्या माणसांना रात्री झोपलेल्या आसतात. तेव्हा नक्षालांनी येतात जो माणूस असेल त्याला पकडून नेतात. आणि त्याचा डोळयांना बांधतात आणि  खूप जंगलात फिरवतात. कोठेही कोणत्याही जागवर मरून टाकतात. म्हणून नक्षालांचा हाताखाली त्या कडील लोक राहतात. आणि माझ्या गावातील लोकांना त्या परिस्थिती करतात. म्हणूनच आपल्या कडील लोक नक्षालां पासून गुप्ता पणाने राहतात. आशा प्रकारे माझ्या गावातील समस्या आशा प्रकारे आहेत.  
                                                              नावः मनोज महाका                                                                                                                                        

No comments:

Post a Comment